खोबऱ्याचं वाटण न घालता खतरनाक टेस्टी चिकन करी एकदा नक्की करून बघा.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, तर आजच्या हा लेखात आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी चिकन करी पाहणार आहोत. कोणतही खोबऱ्याच वाटण न घालता फक्त कांदा, टोमॅटो घालून अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी ही चिकन करी बनते. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. अगदी झटपट असं तयार होतं आणि खायला तेवढंच मस्त असं लागतं. तर नक्की एकदा या पद्धतीने हे चिकन बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

तर झटपट असं चिकन किंवा चिकनची करी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुऊन घेतलेल आहे. सगळ्यात पहिला चिकनला मी मॅरिनेट करणार आहे. त्यासाठी यामध्ये काही मसाले घालू तर अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. तीन ते साडेतीन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर कोणतही घरच लाल तिखट वापरू शकता आणि लाल तिखटाच प्रमाण कमी जास्त करू शकता.

चवीनुसार थोडं मीठ घातलेल आहे. दीड चमचे मी फुल भरून दही घेत आहे. दही जास्त आंबट असं घालू नका, दही घातल्यामुळे चिकन चांगल सॉफ्ट अस शिजत आणि मस्त चवीला लागतं. त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे.

आता हे सर्व मसाले आपण चिकन मध्ये मिक्स करून घेऊ, मसाले चिकन मध्ये मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनिट मसाल्यांमध्ये चिकन मुरत ठेवू. आता आपण चिकन करी किंवा मस्त तरीदार असं चिकन तयार करायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेल आहे. तेलाच प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

हे वाचा:   नळ स्वच्छ करायची नवीन घरगुती पद्धत.. फक्त 2 मिनिटात करा नळ स्वच्छ.!

तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रीची दोन पानं, दालचिनीचा तुकडा, दोन काळी मिरी, दोन ते तीन लवंग, अर्धी काळी वेलची किंवा मसाला वेलची आणि अर्ध चकरीफूल घालू आणि हे खडे मसाले आपण थोडे तेलामध्ये परतून घेऊ. खडे मसाले आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर खडे मसाले थोडे परतून घेतलेले आहेत, जास्त परतायचे नाहीत, नाहीतर करपतात.

आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे घालू बारीक असे चिरलेले, तर दोन मोठे कांदे मी बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत. आता कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होईपर्यंत परतून घेऊ. कांदा चांगला बारीक असा चिरायचा म्हणजे एकजीव दाटसर अशी चिकन करी किंवा चिकनचा रस्सा तयार होतो.

आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा घालू शकता. कांद्या सोबत टोमॅटो सुद्धा चांगला मऊसर असा परतून घेऊ तर बघू शकताय मस्त असा कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे.

आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि चिकन चांगलं चार ते पाच मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायच आहे. चिकन चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास लागत नाही चिकनला. त्याचबरोबर मसाले आणि लाल तिखट सुद्धा चांगलं परतलं जातं चिकन सोबत आणि तयार झाल्यावर चिकन सुद्धा एक नंबर असं चवीला लागतं. तर तेल सुटेपर्यंत मी जवळजवळ चार ते पाच मिनिट हे चिकन मसाल्यांसोबत परतून घेतलेल आहे.

हे वाचा:   घरच्या घरी सुगंधी धूप बनवायचा असेल तर करा ह्या सोपा उपाय.! फक्त फुलांच्या मदतीने बनवा सुगंधी धूप.!

आता रश्याला उकळी आलेली आहे, गॅस बारीक करून चिकन चांगलं मऊसर असं शिजवून घेऊ, चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक 20 मिनिटात मस्त मऊसर असं चिकन शिजतं तर थोड्या वेळानंतर बघू शकता की मस्त झणझणीत अशी चिकनची करी किंवा तरीदार असं चिकन तयार झालेला आहे.

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. कोणतही वाटण न घालता कांदा, टोमॅटो घालून मस्त चमचमीत अस हे चिकन बनवलेल आहे. चिकन सुद्धा चांगलं मऊसर असं शिजलेला आहे. गरम गरम भाकरी, चपाती, रोटी, भातासोबत हे चिकन खायला एक नंबर असं लागतं आणि अगदी झटपट कमी वेळेत तयार होत. तर तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर ही चिकनची रेसिपी नक्की एकदा करून बघा. लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.