कोणी तरी म्हणले आहे की सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपवू शकत नाही. आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्या वेळी आपल्याला माहित असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे, आपल्याला मुर्खात काढत आहे, पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही, कारण समोरचा कधी सांगणार नाही की खरं काय आहे. खरं काय ते एकतर त्याला माहीत असतं किंवा समोरच्याला माहीत असतं आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोल गोल फिरवत असतो. समोरचा खोट बोलू शकतो, खोट्या शपथा घेऊ शकतो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सर्रास खोटे बोलू शकतो. मग आपण स्वतःमध्येच असं काही कौशल्य आणुया जेणेकरून समोरचा खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे हे त्याच्या बोलण्यातून आपण अगदी काही मिनिटांमध्ये ओळखू शकतो.
समोरच्याच खोटं बोलणं आपल्याला पकडता यायला हवं. आजच्या काळात हे गरजेचे झाल आहे. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचा इंटरव्यू घेत आहात किंवा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर समोरचा खोटं बोलत आहे हे तुम्ही ओळखू शकता. तुमच्यासाठी इतरांचे खोटं वागणे ओळखणे फार महत्त्वाच आहे. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल नसेल, काहीही फरक पडत नाही, पण समोरचा तुमच्याशी खोटं वागत आहे का हे तुम्हाला ओळखता यायला हव.
आयुष्यात खूप सारे धोके मिळण्यापासून तुम्ही वाचू शकता, कारण माणसाला आयुष्यात एक टाइम खायला मिळालं तरी हरकत नाही. त्याला असं वाटतं कि समोरच्याचं खोटं मी सहन करू शकत नाही. माझ्याकडे पैसा कमी असेल तरी चालेल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस पचवू शकत नाही. तेव्हा त्याला वाटत की आपण हे अगोदरच ओळखू शकलो असतं तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहेत यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता.
या पाचही गोष्टीत आयुष्यात शंभर टक्के लागू होतील असे नाही. जे काही करायच आहे ते स्वतःच्या रिस्क वर करा. कुणाचं नुकसान होऊ नये एवढाच यामागे हेतू आहे. चला तर मग बघुया पाच गोष्टी.
नंबर एक खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा, चढवून विचारा. आता हे कसं करायचं तर उदाहरण घेऊन समजूया. तुमच्याकडे पाच हजार रुपये आणि तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचं पाकिट चेक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये फक्त तीन हजार रुपये दिसले, दोन हजार रुपये गायब झाले आणि बाकीचे एटीएम कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आहेत, फक्त पैसे चोरी झाले आहेत. आता तुम्हाला शंका आहे की तुमच्या सोबत जो मित्र म्हणून तुमची रूम शेअर करतो त्याने ते पैसे घेतले आहेत.
तुम्ही त्याला विचारा तू माझे पैसे का घेतले. आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही. एक तर तो म्हणेल मी काहीही चोरी केलेलं नाही आणि तुझ्या पॉकेट मधून पैसे देखील काढलेले नाही. एटीएम कार्डही चोरले नाही. आपलं खोटं पकडले जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो. समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाही. मग तुम्ही त्याला विचारा पाच हजार नाही काढले तर किती काढले आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन घाबरून तो ते बोलून जातो जे तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं. मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करु शकतो.
नंबर 2 घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा. ज्याचं खोट तुम्हाला पकडायच आहे त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही. त्यांनी दिवसभरात काय काय केलं याचा क्रम तो नियोजनबद्ध पद्धतीने लावतो मी कुठे गेलो मी काय काय केले या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असतो. आता तुम्हाला काय करायचं एकदा ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा. तुम्ही त्याला उलटसुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या. त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल, गडबडत असेल तर समजून जा की समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे. सत्य बोलण्यासाठी, खरं बोलण्यासाठी विचार करण्याची गरज पडत नाही. जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर टाकण्याची गरज नाही. कारण सत्य घटनांचा क्रम पाठ करावा लागत नाही.
नंबर 3 समोरच्याचं खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केल आहे ते बरोबर केल आहे. त्याच्या जागी आपण असतो तर आपणही हेच केलं असतं. माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या. माणूस तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी स्वार्थ असतो, फायदा असतो आणि दुसरी म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण जर ते सांगितलं तर लोक आपल्याला अपराधी समजतील, आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं सांगत नाही मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्यासाठी आहात असं दाखवावं लागेल. तसा अभिनय करावा लागेल. माझ्यासोबत पण हेच घडलं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगतात तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्या सारखाच आहे. मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे, मी तर उगाच घाबरत होतो. जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे पटवून देऊ शकलात तर तो कधी न कधी त्याच सत्य तुम्हाला सांगेलच.
नंबर 4 समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य पूर्ण करू द्या. आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिल म्हणजे तो खरं सांगेल हे कशावरून? जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देतात तेव्हा त्या गोष्टीची जास्त शक्यता की तो आपलं बोलणं सतत बदलेल. जर तो असे वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी अशी गोष्ट बोलून जातो ज्याने ती अगोदर बोललेली नसेल, प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल, तेव्हा समजुन जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे.
नंबर 5 समोरच्याचं पटापट बोलणं, घाईगडबडीत बोलणे आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसरच काहीतरी बोलणं अशा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलत आहे. तेव्हा तुम्ही समोरच्याला घाईगडबडीत एखादा प्रश्न विचारता, की तू तर असं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधळून जातो, पटापट उत्तरे देतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येतात त्याला विचारतात तेव्हा तो दुसऱ्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो किंवा किंवा मग जास्तीचे एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतो. खोटे बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्द्याच बोलत नाहीत. जे खरं आहे ते बोलत नाहीत. इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकवून ठेवतात. तर मित्रांनो या काही गोष्टी तुम्ही अवश्य लक्षात ठेवा आणि नक्की त्याचा तुमच्या जीवनात वापर करा. बाकी आजचा हा आमचा लेख तुम्हाला आवडला असेलच. आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.