नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण वेगवेगळ्या टाईपच्या साड्यांच्या घड्या पाहणार आहोत ज्यामुळे आपली साडीं अगदी व्यवस्थित राहील, प्रेस केल्यासारखी आणि पॉकेट सारखं आपण त्याला घड़ी करणार आहोत जेणेकरून त्यामध्येच ब्लाऊज राहील आणि एकाच ठिकाणी भरपूर कपडे ठेवण्यासाठी आपल्याला मदतही होईल. चला तर मग लेखाला सुरुवात करूया. रेगुलर जशी आपण साडीची घडी करतो तस सुरुवातीला आपल्याला साडीला फोल्ड करून घ्यायच आहे. त्यानंतर साडीचे जे काठ आहेत ते आपल्याला साडीच्या सेंटर मध्ये आणायचे आहेत.
दोन्ही काठ एकासमोर एक घेऊन आल्यानंतर यांना व्यवस्थित करून घ्यायच आहे. ही आपली पहिली साडीची घडी आहे. अजून बऱ्याच आपण पाहणार आहोत तर त्यानंतर हा जो कप्पा तुम्ही पाहत आहात. यामध्ये आपल्याला थोडीशी ही जी साडी आहे एका बाजूची ती आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित न चुरगळता आपण याला साफ करत करत घालून घेणार आहोत.
ज्यामुळे आपली साडी जेव्हा आपल्याला घालायची असेल त्यावेळेस अगदी प्रेस केल्यासारखी मिळेल आणि याला आपण कितीही हलवलं काहींही केलं तरी यामधून ही साडी अजिबात बाहेर निघत नाही. अगदी आपण कव्हरमध्ये साडी ठेवल्यासारखी व्यवस्थित राहते. जस आपण भरपूर साड्या ठेवल्यानंतर एक साड़ी काढायला गेलो तर दुसऱ्या साडीची घडी मोडते.
मात्र यांनतर तुम्हाला हाही प्रॉब्लम होणार नाही. त्यानंतर याच जे मॅचिंग ब्लाऊज आहे ते आपण व्यवस्थित थोड्स दुमडून यामध्ये जो कप्पा तयार झालेला आहे त्यामध्ये जर ठेवून दिलं तर अगदी साडी आणि ब्लाऊज आपल्याला वेळेवर मिळेल. जेव्हाँ आपल्याला दोन्ही गोष्टी एकासोबत पाहिजे असतील त्यावेळेस शोधाशोध करायची गरज पडणार नाही आणि नक्कीच साड्याही व्यवस्थित राहतील. अश्याने भरपूर साड्या एकाच ठिकाणी बसतील.
पुढची घड़ी जी आहे या अगोदर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या साडीची घडी पाहिली नसेल. अगदी नवीन युनिक साडीची घड़ी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खूप छानही आहे, नक्की ट्राय करा. यानंतर आपण रेगुलर जशी साड़ी फोल्ड करतो तशी साडी फोल्ड करून घ्या. साडीच जे ब्लाऊज मॅचिंग आहे ते आपण यामधून खाली ठेवणार आहोत.
आणि एक लक्षात ठेवा हे जे ब्लाऊज आहे त्यापेक्षा साडीची घडी अगदी थोडीशी छोटी असली पाहिजे आणि याला आपण जसं घातल्यानंतर हुक लावून घेतो व्यस्थित करून तसं हुक लावून घ्यायच आहे आणि एक लक्षात ठेवा हे जे आपण ब्लाऊज घातलेल आहे ते साडीच्या अगदी मधोमध असले पाहिजे, तेव्हाच ही साडीची घडी अगदी परफेक्ट येते. यासाठी आपल्याला ब्लाऊज प्रेस करून घ्याव लागेल आणि हे व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही.
त्यानंतर स्लीव्स कडील हा जो भाग आहे तो आपण दुमडून घेणार आहोत आणि अस दुमडल्यानंतर अजून एक याला आपण घडी करणार आहोत. लग्नात किंवा कोणाला गिफ्ट म्हणून साड़ी द्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला ही घडी खूप कामी येईल आणि कपाटातही आपल्या अशा प्रकारे आपण साड्या जर घड्या करून ठेवल्या तर नक्कीच आपलं कपाट सेट राहील. सोबतच भरपूर कपडे एकाच ठिकाणी बसतील.
यानंतरची जी साडीची घडी आहे त्यासाठी साडीला आपल्याला सुरुवातीला चार पदरी नाही तर फक्त दोन पदर असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर खालचे जे काठ आहेत ते आपण आतमध्ये घेणार आहोत. दुसऱ्या बाजूचे काठ जशाच्या तसे आहेत सरळच. आणि त्यानंतर याचा जो सेंटर आहे आहे तो पकडून आपण याला असं परत फोल्ड करणार आहोत. तर दोन्ही साईडने पकडून आपण याला फोल्ड केलेल आहे.
त्यानंतर चार पदरी आपण फोल्ड केलेल आहे पण फक्त त्याचे जे काठ आहेत ते एका बाजूने आतमध्ये घेतलेले आहेत आणि ते कशासाठी तर आता आपण पुढे पाहूयात. आता दुसरे जे काठ आहेत ते सरळच होते. पुढे खालचा साईडने आपण जे दुसरे काठ आहेत, पदर आहे तो आपल्याला या कप्प्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही जेव्हा हे करून पहाल तेव्हा नक्कीच तुम्हाला हा कप्पा झालेला दिसेल. त्यानंतर आपलं जे मॅचिंग ब्लाऊज आहे ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ठेऊ शकता.
तुम्हाला जी सोपी वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता. आणि परकर किंवा पेटीकोट जरी आपल्याला यामध्ये ठेवायचा असेल तर तोही यामध्ये आपल्याला छान ठेवता येईल. अगदी यामध्ये आपण ब्लाऊज आणि साडी एकत्र ठेवली असली तरीही ते ओळखायलाही येत नाही. किती हलवलं तरी ही घडी अजिबात निघणार नाही.
तर मित्रांनो वर आम्ही सांगितलेल्या साड्यांच्या घड्या नक्की ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारच्या आणखी कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला लेख वाचायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेख आवडला असेल मित्रांसोबत नक्की शेअर करा.