कुरकुरीत अळूवडी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.. रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स.!

ट्रेंडिंग

मित्रांनो, पावसाळाच्या दिवसांमध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. तुम्हाला सुद्धा आवडत असतीलच, तर आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत कमी तेल शोषणारी आणि भरपूर लेयर्स वाली, एक पाच सहा दिवस स्टोर करून खाता येणारी मस्त अळूवडी बघणार आहोत. बऱ्याच जणांच्या अळूवड्या अशा अख्या होत नाही, त्याचे तुकडे होतात किंवा खूप जास्त तेलकट, तेल शोषणारे होतात आणि तेलामध्ये वड्या घातल्यानंतर अगदी ते पसरतात किंवा त्याचे तुकडे पडतात. हे सगळं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्ससह ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. म्हणून अगदी शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा.

आता अळूवडी आणि अळूच्या भाजीची अशी दोन प्रकारची पानं आपल्याला बाजारात उपलब्ध होतात. अळूच्या वड्यांची पान थोड्या डार्क रंगावर आणि हातामध्ये घेतलं की थोडसं जाड सालीचं आणि मस्त गडद हिरव्या रंगाच असतं आणि देठाचा भाग बघितला की असा हा गडद चॉकलेटी रंगाचा आणि खूप जास्त कडक असतो. अशी पान दिसली की ती वड्यांची पान आहेत असं समजावं. अशी ही पान बाजारामध्ये अगदी भाजीवाल्याकडे तुम्हाला सहज उपलब्ध होईल. बाजारातून आणल्यानंतर आपल्याला ही पान स्वच्छ धुऊन घ्यायचे, त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये भरपूर पाणी घ्यायच आहे आणि एक चमचा आपल्याला मीठ घ्यायचय. मीठ संपूर्ण पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ही सगळी पान अशी मोकळी करून आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे.

मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही पान घातल्यामुळे याला छोटे मोठे जे कीटक किंवा धूळ माती घाण अडकलेली असते अशी सगळी स्वच्छ होते. कमीत कमी अर्धा पाऊन तास आपण या पाण्यामध्ये याला ठेवून देणार आहोत. साधारणत अर्धा पाऊन तास झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता अशी ही स्वच्छ पान आपली निघालेली आहेत. आता ही पान मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत. आता घरातला तांब्या किंवा ग्लास घ्या त्याने आपल्याला असं हे छान स्मूथ किंवा असं हे चपट करून घ्यायच आहे म्हणजे रोल करताना मध्ये याचा अडतळा येत नाही किंवा हव असेल तर लाटण्याने सुद्धा तुम्ही असं हे करून घेतलं तरीही चालू शकेल, म्हणजे हे पान अगदी पोळीप्रमाणे गुळगुळीत पातळ होईल.

त्यामध्ये वड्या मस्त कुरकुरीत आणि त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी दोन गच्च चमचे भरून तांदळाच पीठ घेतलेल आहे. तुमच्याकडे जर ज्वारीच पीठ असेल तर ज्वारीच पीठ सुद्धा चालू शकतं, दोन्ही पिठांमुळे मस्त कुरकुरीत आपली वडी तयार होते. एक चमचाभर आपण यामध्ये तिखट घेतलेल आहे, अर्धा चमचा हळद घेणार आहोत. त्याचबरोबर अगदी पाव चमचा गरम मसाला पावडर घेणार आहोत आणि इथे आपण दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढऱ्या तिळाशिवाय अळूवडी होऊ शकत नाही कारण ती खूप कुरकुरीत होते. अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. नसेल घालायची तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता.

हे वाचा:   घराच्या चारी कोपऱ्यात ही एक गोष्ट ठेवा एकही उंदीर घरात पाय सुद्धा ठेवणार नाही.! उंदरांना पळवण्याची सगळ्यात सोपी पद्धत.!

अळूच्या किंवा भाजीच्या पानाला थोडीशी खाज असते म्हणून इथे आपण चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. तुम्ही दोन चमचे चिंचेचा कोळ किंवा एक चमचा गूळ जरी घातला तरीही चालू शकेल. इथे आपण रेडीमेड चटणी वापरलेली आहे. चवीपुरत मीठ घालणार आहोत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ही सगळी जिन्नस अशी छान आपल्याला एकजीव करून घ्यायच आहे म्हणजे पिठामध्ये हे सगळं असं छान एकजीव होतं. आता साधारणतः पाच सहा चमचे पाणी घालायचंय आणि जसं आपण भजांसाठी पीठ भिजवतो अगदी तसच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायच आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही. असं हे पानांना सरकवून सरकवून आपल्याला परफेक्ट असं लावता आलं पाहिजे इतकी याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे.

आता पानांपैकी सगळ्यात मोठं पान असं हे तळावर आपल्याला ठेवायच आहे. याच्या शिरा आपण लाटून व्यवस्थित गुळगुळीत करून घेतलेल्या होत्या त्या बाजूला थोडं थोडं आपल्याला हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. बेसन पीठ लावताना असं हे संपूर्ण एकसारखं लावायचं आहे आणि सगळ्यात शेवटी असं सगळीकडे व्यवस्थित लावून झाल्यानंतर असं हे आपल्याला बोटाने पुसून पुसून म्हणजे सगळीकडून अगदी एकसारखं आपल्याला करून घ्यायच आहे. म्हणजे सगळीकडून एकसारखं असं पानाला पीठ लागलं जातं. आता यावर उलट्या दिशेने म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मगाशी फुलपाखराप्रमाणे आपण केलेलं होतं आणि दुसरं वर पान घालताना टोकाची बाजू वरच्या दिशेला ठेवायची आहे.

हाताने थोडीशी दाबून घ्यायची आणि अगदी सारख्याच पद्धतीने पीठ अस संपूर्ण पानाला लावून घ्यायच, फक्त खालचा जो बेस असतो पानाचा त्याला लावणं थोडस क्रिटिकल असत पण जस जसा यावर थर चढतो तसं ते अगदी सोयस्कर होऊन जातं. दुसऱ्या पानाला अगदी सहज आपण हे पीठ लावू शकतो. तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण पीठ लावल्यानंतर अस हे पुसून आपल्याला घ्यायच आहे आणि एकावर एक थर उलटी सुलटी पान करत एक साधारणता पाच पाच पानांचा आपण रोल करून घेणार आहोत.

10 पान घेतल्यामुळे दोन रोल अगदी याचे सहज तयार होतात. बऱ्याच जणांना अळूवडी बनवणं थोडसं कठीण काम वाटतं पण थोड्या एक दोन वेळाच्या प्रैक्टिस नंतर तुम्हाला अगदी सहज जमेल. अगदी बॅचलर सुद्धा असाल तर या पद्ध‌तीने अळूवडी तुम्ही अगदी सहज बनवू शकाल. तर थरावर थर असे पाच थर आपण घातलेले आहेत. पाचही थर झाल्यानंतर दोन्ही बाजूचे पान आपण असे फोल्ड करून घेणार आहोत. हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायच आहे, म्हणजे तुम्ही इथे बघू शकता असं हे दोन्हीकडून आपण अस फोल्ड करून घेतलेल आहे आणि वरच्या सुद्धा टोकाच्या दोन्हीही बाजू आपण फोल्ड करून घेणार आहोत.

हे वाचा:   पैज लावून सांगतो हे असे चिकन बनवले तर लोक बोट चाटून पुसून खातील.! अशी चिकनची रेसिपी कोणी नाही सांगणार.!

व्यवस्थित लाटून घेतल्यामुळे असं हे रोल करणं अगदी सहज होतं, बिलकुल याचा अडथळा होत नाही. वडा वाफवण्याकरता एका कढईमध्ये एक दीड तांबे आपण पाणी चांगले उकळून घेतलेल आहे आणि पाण्यामध्ये एक लिंबाची फोड घातली म्हणजे भांडी आपली खराब होत नाही, काळी पडत नाही. मस्त वाफाळत्या पाण्यामध्ये आपल्याला वड्यांची ही प्लेट किंवा चाळण ठेवायची आहे. अशी ही चाळण ठेवल्यानंतर याला झाकण लावून मोठ्या आचेवर एक 20 मिनिट आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे. 20 मिनिटानंतर व्यवस्थित थोडीशी कोमट झाल्यानंतर झाकण काढून बघायच नाहीतर वड्या आतून कच्चा राहतात. थोडस एक 10-15 मिनिट पंख्याखाली संपूर्ण आपल्याला अगदी कडक अशी वडी आपली तयार होते आणि व्यवस्थित ही वडी छान शिजलेली आहे. ही थंड करून घ्यायची आहे.

वड्या थंड करून साधारणत एक 10-15 मिनिट झालेली आहेत. ताटाला थोडसं तेल लावल्यामुळे अगदी पटकन ते निघालेल आहे आणि वड्या सुद्धा थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्या कडक होतात आणि कापायला अगदी सोपं होतं. वड्या कापण्यासाठी सुरीला थोडस तेल लावून घ्या. आपण असं तेल लावून कापून घेतल्यामुळे पीठ बिलकुल या सुरीला चिटकून बसत नाही आणि अगदी पातळ पातळ मस्त चिरून घ्या म्हणजे मस्त कुरकुरीत वड्या तुम्हाला तयार मिळतील. अशा वाफवून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत मस्त पीठ शिजलं जातं कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही आणि छान वाफवून घेतल्यामुळे खायलाही अगदी छान लागत आणि टिकायला सुद्धा व्यवस्थित मदत होते.

तर अशी ही छान पातळ पातळ आपण सगळ्या वड्या छान चिरून घेतलेल्या आहे. अशा या वड्या करून घेतला की एक पाच सहा दिवस फ्रिजमध्ये रोल अगदी व्यवस्थित राहतो. बिलकुल खराब होत नाही. जेव्हाही खायची इच्छा होईल तेव्हा अस हे कापा व्यवस्थित तळा किंवा शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. एक रोल आपण असा हा कापून घेतलेला आहे. कढईमध्ये चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायच आहे आणि अशा या वड्या अगदी सावकाश सावकाश आपल्याला यामध्ये घालायचा आहे.

मोठ्या आचे वरच एक दोन मिनिट एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने उलथून दोन मिनिट तीन ते चार मिनिट अस हे मोठ्या आचेवर आपण या वड्या छान कुरकुरीत हलक्याशा बदामी रंगावर होईपर्यंत मस्त तळून घेतलेल्या आहेत. अळूवडी कुठेही तुम्हाला फुटलेली तुकडे झालेली किंवा खूप जास्त तेलकट तुम्हाला इथे दिसत नसेल. अगदी परफेक्ट अशी आपली ही अळूवडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी अळूवळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीसोबत जास्तीत जास्त शेअर करा.