उन्हाळा म्हटलं तर घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला अगदी मच्छरांची फौज घरामध्ये यायला सुरुवात होते आणि मग रात्री तर विचारूच नका. मग अशावेळेस आपण काही घरगुती उपाय केले तर हे मच्छर आहे ते कधीच येणार नाही. घरामध्ये मच्छर आले असतील तर ते मच्छर घरांमधून नक्की जातील. ना तुम्हाला मच्छरदानी लावायची गरज, ना कोणतही केमिकल वापरून, असं काहीही वापरायची गरज काही नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा उपयुक्त असा एक नैसर्गिक उपाय आपण बघत आहोत आणि त्यामुळे या उपायांमुळे कोणालाच काही साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही.
यासाठी लिंबाचा पाला आपल्याला लागणार आहे. इकडे लिंबाचा पाला मी घेतलेला आहे, सुकवून घेतलेला नाही. तुम्ही अर्धा सुकवून आणि अर्धा ओला अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. आता मी थोडा हा पाला वेगळा केला आहे. त्यानंतर तुम्हाला काही काड्या वगैरे घ्यायच्या आहे किंवा थोडा कचरा वैगरे जेणेकरून आपल्याला काय होईल की हा जो काही कडुलिंबाचा पाला आहे, हा ओलसर आहे. त्यामुळे तो जळण्यासाठी आपल्याला मदत होईल. आपल्याला खरे तर त्याला जाळायचा आहे. त्याचा धूर झाला पाहिजे म्हणून आपल्याला थोडा सुका पाला घ्यावा लागेल.
अशा पद्धतीने रोज जर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला दार लावून हा उपाय केला तर काही घरांमध्ये शिरलेले मच्छर असतील तर ते निघून जातील. सोबतच एकही मच्छर घरामध्ये येणार नाही आणि तुम्हाला बिलकुल मच्छरदाणी वगैरे वापरायची गरज सुद्धा पडणार नाही. त्यानंतर हा जो आपला जळत असलेला पाला आहे त्यामध्ये तुम्हाला तीन कापराच्या गोळ्या टाकायच्या आहे. हे मी यासाठी सांगत आहे की यामुळे घरामध्ये अगदी व्यवस्थित रित्या फ्रेशनेस जाणवतो. कापूर गोळ्यांमुळे मस्त सुगंध दरवळतो.
बेसिकली आपल्याला हे सगळं जाळून त्याचा धूर होणे गरजेचे आहे. जेवढा जास्त धूर होईल तेवढ आपले काम सोपे होणार आहे. सर्व संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आपल्याला त्यासाठी काय करायचं की घराच्या बाहेर जायचे आणि कडुलिंबाची पाने तोडून आणायची आहेत. घरगुती नैसर्गिक असा हा उपाय आहे. आपल्याला कोणत्या केमिकलचीही गरज पडली नाही. याउलट घरामध्ये मस्त असा कापुराच्या गोळ्यांचा सुगंध सुद्धा दरवळतो. नक्की हे करून बघा. लहान मुले असतील, वयोवृद्ध माणसं असतील, गोळ्यामुळे कोणालाच काही होणार नाही. हा उपाय करून बघा.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा आता याला व्यवस्थित ते आपल्याला जाळून घ्यायचंय. जेव्हा अशा पद्धतीने दूर होईल तर तेव्हा खरं तर हा काम करणार आहे. तुम्ही आता मी याला व्यवस्थित रित्या जाळून घेतले आहे. आता त्याच्यामधून धूर निघायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आता काय करायचे की हा गरम धूर ज्या गोष्टीत केला असेल ते कोणत्याही एखाद्या कपड्याने वगैरे पकडुन तुम्हाला हवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला देखील अजिबात विसरू नका.