नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे आणखी एकाने नवीन लेखात. तर माझ्याकडे हा जो हंडा आहे तो तांब्याचा आहे आणि आपण जेव्हा तांब्याच कोणतही भांड वापरतो तेव्हा ते काही काळानंतर काळपट व्हायला लागतात. असे भांडे बरेच दिवस न घासल्याने काळपट होतात. आता जसं आपण फेस साठी फेसपॅक लावत असतो तसेच आपल्याला घरी बनणारे मस्त एक पॅक बनवायचे आहे. काय करायचे एखादी प्लेट किंवा कटोरी घ्यायची आहे. वाटीही तुम्ही घेऊ शकता. यामध्ये घालायचा आहे एक चमचा भरुन बेसन. यामध्ये जेवढ आपण बेसन घेतलं तेवढीच हळद घ्यायची आहे, म्हणजे एक चमचा बेसन घेतल तर एक चमचा हळद घ्यायची आहे.
आता तुमच्याकडे किती तांब्याची भांडी आहेत त्यानुसार कॉन्टिटी बघायची. यामध्ये आता आपण मीठ घेतलं आहे. प्रत्येकी एक चमचा घ्यायचं आहे आणि हे छान पैकी मिक्स करायचं. हे पावडर तुम्ही असं कितीही दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला आयत्या वेळी फक्त काही तरी त्यात अॅड करायचे आणि हे लावायच आहे. तर यामधे घालायचे आहे दोन चमचे दही. दही पातळ असल्या कारणाने मी दोन चमचे घातले आहे, तुमच्याकडे जर घट्ट दही असेल तर तुम्ही एक चमचा सुद्धा घालू शकता. आता व्यवस्थित रित्या याला मिक्स करायच आहे. यामधे कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये.
जर तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन होत नसेल तर तुम्हाला दह्याचा वापर करायचा आहे. पाणी यामध्ये घालायचं नाही. बघा आपण फेस पॅक लावतो तसंच याची पेस्ट तयार झालेली आहे. आता सगळ्यात भारी पदार्थ तो म्हणजे लिंबू. लिंबू सगळ्यांच्या घरामध्ये असतं. एका लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता जे आपण पावडर बनवलं बेसन हळद आणि मिठाचं ते पावडर जे आहे ते तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळी त्यात दही आणि लिंबू ऍड करू शकता.
तर आता बघा हा हांडा घेतलाय मी आणि जसा आपण फेसपॅक लावतो ना बस तसं याला मी हे लावून घेते आणि बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे. सेम पद्धतीने आपल्याला काय करायचंय पूर्ण पॅक लावायचा आहे. तुम्हाला असं वाटलं की ही पेस्ट लावताना खूप घट्ट आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी अड्जस्ट करू शकता. हे लावल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपल्या हे असच सोडून द्यायचं आहे.
तर बघा आता मी तुम्हाला हा पॅक पुसून दाखवते. आपण फार काहीच केलेले नाही. आता काय करायचं आपल्याला डायरेक्ट हे पुसून काढायचे आहे आणि आता आपण फक्त हा हांडा धुणार आहोत. बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे, एकदम नवा कोरा असल्यासारखा हा हांडा स्वच्छ निघाला आहे. आता हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एकदा हे घासून घेऊया कारण जर आपण हे भांडे वापरत असू तर ते घासून घेतलेले बरे. तर बघा आता आपलं सगळं घासून झालं आहे,
आता काय करायचे ते लगेच ते एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे. आता आपण तांब्याचे भांडे मस्त असे पुसून घेतले आहे आणि आता बघा त्याच्यावर एकही डाग नाही. एकदम स्वच्छ निघालं आहे हे. तर मित्रांनो हा लेख तुमच्या साठी थोडाही हेल्पफूल ठरला असेल तर एक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.