नमस्कार मित्रांनो, असे म्हटले जाते की मुलगी झाली लक्ष्मी आली, पहिली बेटी धनाची पेटी, भगवंतांनी सर्वांच्याच घरी मुली पाठवल्या नाही, जे नशीबवान असतात, मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात. जे लहान मनाचे असतात, जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीही मुलगी पाठवत नाही. ज्यांची दान करण्याची नीती असते अशा व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात व त्यामुळेच त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना, त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला, शेतकऱ्याबरोबर दोन मुली होत्या, त्यातील जी लहान होती तिला त्यांनी खांद्यावर बसविले होते तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते.
तर स्वामिनंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा कुठे जात आहात? तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे, त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले की तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल, असे करा माझ्या खांद्यावर तिला द्या वरती मंदिरात गेला की तेथे मी तिला तुमच्या कडे देतो. त्यावेळी त्या शेतक-याने खूप सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले की स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही, उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भारही हलका करते. अशा असतात मुली. मुलगी ओझे नाही. ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो मनुष्य बाप असू शकत नाही. एकवेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुखात बघू शकतो परंतु मुलगी कधीच नाही.
आई-वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत बागडत असते, उडत असते, परंतु एकदा ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करीत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांबरोबर बसून जेवण करेल, वडील बाहेरुन दमून थकून कामावरून आले की लगेच पाणी दे चहा आणून देईल. वडिलांचे विचारपूस करेल. मुलीच्या हृदयात उपजतच प्रेम असते. आपण लहान मुलाच्या हातात बाहुली दिली तर तो तिचा हात पाय थोडे कपडे काढून तिला फाडून वैगरे देईल परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली तर ती तिला कपडे नेसवेल आणि थोपटून झोपी लावेल म्हणजे मुलीमध्ये उपजतच माया असते.
लग्न होऊन जर मुलगी सासरी गेली तरी तिथून ती दहा वेळा फोन लावून वडलांना गोळ्या घेण्याची आठवण देईल. जेवण केले का? काय केले या गोष्टी विचारते. जर मुलीला खूप लांब दिले असेल तर तिला लवकर येणे शक्य नसेल, तर तिला सारखी आपल्या आईवडिलांची माहेरची आठवण येते आणि मुलगी जर एखाद्या सण-उत्सवला माहेरी येणार नसेल ना तर आई आसपासचे कोणी तिच्या गावाला जाणार असेल तर त्याच्याकडे तिच्यासाठी आपल्या हाताने बनवलेले लाडू, चिवडा जे काही तिला आवडत असेल ते, साडी बांगड्या अशा सर्व वस्तू पॅक करून त्या व्यक्तीकडे देते व सांगते की माझ्या मुलीला द्या व तिला सांगा तुझी खुप आठवण येते.
आणि ज्यावेळी तो व्यक्ती ती पिशवी घेऊन त्या मुलीच्या घरी जातो आणि तिच्या हातात ती पिशवी देतो तेव्हा तर तिला इतका आनंद होतो की तिच्या आनंदाचे काय वर्णन करावे. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि ती त्या व्यक्तीला विचारते की माझे आई बाबा कसे आहेत? मुलींचा वडलांवर खूप जीव असतो आणि मुलांचा आईवर. मुलगी सर्वात आधी वडिलांबद्दल विचारते म्हणते की माझे बाबा कसे आहेत? त्यांची तब्येत ठीक आहे ना? औषध पाणी वेळेवर घेतात ना आणि ती समोरची व्यक्ती जेव्हा वडिलांचा शुभ समाचार मुलीला देते त्यावेळी मुलगी आनंदाश्रूनी न्हाऊन निघते.
आपण म्हणतो की मुलीच्या पाठवणी मध्ये सर्वात जास्त आई रडते परंतु शिव महापुराण मधे दिले आहे की ज्यावेळी देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली त्यावेळी सर्वात जास्त हिमालय राजा रडले होते, परंतु असे समोर येऊन ते रडत नाही, पाठवण्याच्या वेळीही वडील दाराच्या पाठीमागे उभे राहून रडतात कारण ते मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाही. आई मुलीच्या गळ्यात पडून रडू शकते परंतु वडील तसे करीत नाहीत ते आतल्या आत रडत असतात. जोपर्यंत मुलगी घरात आहे, आनंद साजरा करा. मुलगी घरात असेल तर फक्त आनंद असतो. लग्नात ही जर मुली किंवा नंदा आल्या नाहीत तर ते घर लग्नघर वाटत नाही.
त्यांना तुमच्याकडून काही नको असते, आपल्या प्रॉपर्टीचे वाटेकरी तर मुले असतात, मुली प्रेमाच्या भुकेल्या असतात. त्यांना फक्त माहेरी आल्या नंतर प्रेम माया व दोन गोड शब्दांचीच अपेक्षा असते. जितके सुख मुलांकडून मिळत नाही तितके सुख मुलीचे तोंड बघूनच मिळते. मुलीला कितीही दुःख त्रास असेल तरीही ती आपले दुःख कधीच माहेरी सांगत नाही. नेहमी आनंदात असल्याचे दाखविते. अशा प्रकारे ज्यांची देण्याची नीती असते, जे मोठ्या मनाचे व नशीबवान असतात अशा व्यक्तींच्या घरीच मुली जन्म घेतात. तर मित्रांनो हा लेख तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.