चांदीच्या वस्तू, दागिने स्वच्छ करण्याची ट्रिक पाहून तुम्हालाही आच्छर्य वाटेल; पहा ही सोपी पद्धत.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंड्ळी, आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत चांदीच्या वस्तू, चांदीच्या मूर्ती किंवा चांदीचे कुठलेही दागिनें अग‌दी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक आणि विशेष म्हणजे यामध्ये मार्केटमध्ये मिळणारे कुठलही केमिकल, स्प्रे, लिक्किड वगैरे अस आपण काहीही वापरणार नाही तर घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या वस्तूंचा वापर करून आज आपण हे दागिने कसे स्वच्छ करायचे जे पाहणार आहोत.

तर आज मी हे घेतलेले अग‌दी काळपट झालेले आहेत, बारीक डिझाईन असल्यामुळे अगदी काळपट अशी डर्ट यामध्ये जमा झालेली आहे, तर हेच आज आपण कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत आणि यासाठी सगळ्यात आधी गॅस वरती एक भांड आपल्याला ठेवायच आहे आणि यामध्ये थोडसं पाणी उकळण्यासाठी ठेवायच आहे. आता जे कुठले दागिने वस्तु वगैरे तुम्ही स्वच्छ करताय ते पूर्णपणे बुडतील इतपत पाणी या भांड्यामध्ये आपल्याला हवं आहे. यानंतर पाणी चांगलं उकळलं की यामध्ये सगळ्यात आधी एक मोठा चमचाभर आपल्याला चहा पावडर टाकायची आहे.

याऐवजी जर तुम्ही जस्ट चहा बनवला असेल आणि त्या भांड्यामध्ये जर चहा पावडर शिल्लक असेल तर ही वापरलेली चहा पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. यासाठी ही चहा पावडर एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आता हीच वापरलेली चहा पावडर सुद्धा तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता, त्यामुळे ही चहा पावडर सुद्धा वापरात येईल, वेस्ट जाणार नाही.

तर आज आपण इथे फ्रेशच चहा पावडर घेतली आहे ती पाण्यामध्ये चांगली उकळू दिली आहे. यानंतर दोन महत्त्वाचे पदार्थ आपण यामध्ये वापरणार आहोत एक म्हणजे डिटर्जंट पावडर. जी कुठली कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर तुम्ही वापरता त्याचा एक मोठा चमचा किंवा भांडे घासण्याच लिक्विड असेल, कपडे धुण्याच लिक्विड असेल यापैकी काहीही एक मोठा चमचा भर या मध्ये आपल्याला टाकून हे उकळून घ्यायचं आहे.

हे वाचा:   तुमची बदनामी करणाऱ्याचे तोंड असे बंद करा.. पुन्हा कधी तुमच्या वाट्याला जाणारच नाहीत.!

यासोबतच आपल्याला लागणार आहे लिंबू, अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. आता इथे फक्त लिंबाचा रसच नाही तर याची जी साल आहे ती सुद्धा आपल्याला वाया घालवायची नाही. ती सुद्धा आपण यामध्येच टाकून हे उकळून घेणार आहोत. तर आता काही मिनिटासाठी हे सगळे पदार्थ टाकल्यानंतर पाणी मी व्यवस्थित उकळून घेतलय.

आता यानंतर जे कुठले दागिने तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत ते एक एक करून या पाण्यामध्ये ऍड करा. पैंजण पाण्यामध्ये टाकल्यानंतर फक्त मिनिटभरासाठी आपण या पॉण्यात उकळून द्यायचेत लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याच गरम पाण्यामध्ये हे पैंजण कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला असेच ठेवायचेत.

20 मिनिटानंतर या पाण्यातून हे पैंजन आपल्याला काढून घ्यायचेत म्हणजे पाणी सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेल असेल, पैंजण सुद्धा बऱ्यापैकी थंड होतील, ज्यामुळे आपल्याला ते क्लीन करायला सोपे जातील तर पाणी पूर्णपणे सुद्धा थंड करायचं नाही, थोडस कोमटच ठेवायच आहे, ज्यामुळे हे स्वच्छ करणं आपल्याला सोपं जाईल.

तर पहा पैंजन आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेत, तुम्ही पाहिल की अगदी पाण्यामध्ये उकळल्यानंतर बऱ्यापैकी ते स्वच्छ झालेत चमकू लागलेत परंतु यावरती अगदी बारीक अशी डिझाईन असते ज्यामध्ये जमा झालेली डट सहज स्वच्छ व्हावी यासाठी जुन्या टूथ ब्रशच्या मदतीने आणि याच सोलुशनच्या मदतीने हे मी काही मिनिटासाठी घासून घेतले आहे, म्हणजे याच्या डिझाईनमध्ये जमा झालेली घाण अगदी सहज बाहेर निघेल जी सहज स्वच्छही होईल.

हे वाचा:   5 मिनिटांत सर्व उंदीर पळून जातील; चहाची कमाल.! उंदीर घालवण्यासाठी घरगुती उपाय, फक्त एकदा वापरा.!

या प्रोसेसने तुम्ही चांदीच्या वस्तु, चांदीचे भांडे, चांदीचे कुठल्याही प्रकारचे दागिने अगदी सहज स्वच्छ करू शकता. एकदाच ही ट्रिक तुम्ही वापरून पहा, हे वापरल्यानंतर तुम्ही स्वतः सगळ्यांना सांगाल की इतकी ही जबरदस्त ट्रिक आहे. आपल्याला कुठेही सोनाराकडे चांदीच्या वस्तू स्वच्छ करायला जावं लागणार नाही. अगदी सहज तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ करू शकता. तर ब्रशने हे दोन्ही पैंजण घासून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा मी हे धुऊन घेतलेले आहेत. हे धुतल्यानंतर नॅपकिनने एका स्वच्छ कपड्याने आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत.

लक्षात ठेवा, तांब्या पितळाचे भांडे असोत किंवा चांदीच्या वस्तू किंवा सोन्याचे दागिने काहीही स्वच्छ केल्यानंतर ते कधीही असे ओलसर ठेवायचे नाही ते पटकन सुकवायचे आहेत, त्यामुळे यावरती कुठल्याही पाण्याचे वगैरे डाग राहत नाही आणि राहिला प्रश्न या लिक्विडचा. तर आता हे अजिबात फेकून द्यायचं नाही. हे खूपच उपयोगी असं लिक्विड आहे. याने तुम्ही काचेची भांडे, रोजची स्टीलची भांडे सुद्धा स्वच्छ करू शकता, ज्यामुळे त्यांची जी चमक आहे ती पुन्हा येते. काचेची भांडी तर अगदी नव्यासारखी स्वच्छ होतात.