धान्याचा 1 दाना देखील खराब होणार नाही; बघा हा नैसर्गिक पावरफुल उपाय, ना केमीकल ना औषध.!

ट्रेंडिंग

100 वर्ष धान्याला कीड लागणार नाही, त्यासोबतच धान्य खराब होणार नाही, तेही कोणत्याही केमिकलचा, कोणत्याही औषधाचा, पावडरचा उपयोग न करता. अगदी घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून इथे आज आपण असे काही उपाय बघ‌णार आहोत ज्यामुळे तुम्ही 100 वर्ष देखील धान्य तुमचे टिकवून ठेवू शकता. जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्या उपायानुसार तुम्ही तुमचे सर्व डाळी किंवा धान्य, कडधान्य सर्व साठवून ठेवा.

म्हणजे पैस ही वाचतील, तसेच सारखं सारखं आपल्याला याला साफ करायचीही गरज पडणार नाही. आणि हे आपले उपाय असे आहेत की यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही, अगदी घरातीलच वस्तूंचा आपण उपयोग करणार आहोत आणि सर्व धान्य व्यवस्थित टिकवून ठेवणार आहोत.

जास्त करून तर घरामधील धान्य किंवा कडधान्य डाळी खराब होण्याच कारण असं असतं की आपल्या घरामध्ये ऊन येत नाही. कुबट दमट असं वातावरण असत, एक ओलसरपणा असतो. जास्त करून तर फ्लॅट मध्ये हा प्रॉब्लेम येतो. असं ऊन न आल्यामुळे डाळी किंवा धान्य खराब होतात. आता स्पेशली घरामधे ऊन आणणं तर शक्य नाही. उन्हामध्ये आपण बरीच धान्य किंवा डाळी वाळवतो, पण तरीही ते खराब होतात. पण ते खराब होऊ नयेत यासाठी काय करायचं? चला बघूयात.

तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्ता, हा आपला पहिला उपाय आहे. तुम्ही नक्कीच ऐकल असेल की तेजपत्त्याची पान टाकायची आणि आपलं जे धान्य आहे किंवा कडधान्य आहे ते खराब होत नाही. पण चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही तेजपत्ता वापरला तर नक्कीच ते धान्य देखील खराब होणार आहे.

पण याला टाकायचं असं की, याला कट करायचं. आता पूर्ण तेजपत्त्याच पान का नाही टाकायचं? तर त्याचा फायदा होत नाही कारण की त्यामधून वास येत नाही. त्यामुळे तेजपत्त्याची पान अशापकारे तोडून आपल्या धान्यामध्ये टाकायची.

हे वाचा:   महिलांनो चांदीचा एकही दागिना आता काळा पडणार नाही.! ज्यांना हवे आहेत चांदीचे स्वच्छ दागिने त्यांनी त्याला लावायचे आहे हा एक पदार्थ.!

तुम्ही याला कोणत्याही डाळीमध्ये वापरू शकता किंवा हरभरा, वटाणा किंवा मोठे जे काबुली चणे असतात त्यामध्ये देखील, त्यांना साठवून ठेवण्यासाठी या तेजपत्त्याच्या पानाचा अशा प्रकारे उपयोग करू शकता. जास्त करून तर डाळीपेक्षा कडधान्य साठवण्यासाठी तेजपेत्त्याचा जास्त फायदा होतो. आता इथे बघा मी घेतलेली आहे दालचिनी जी की आपल्या मसाल्यामध्ये नक्कीच आपण वापरतो आणि आपल्या घरामध्ये देखील असते.

दालचिनी हे तुम्ही ऐकल असेल पण दालचिनी चुकीच्या पद्धतीने वापरली की याचा काहीच फायदा होत नाही. याला वापरण्याची पद्धत अशी की याला थोडसं कट करून तोडून टाकायचे कारण की याला तोडल्यानंतर खूप छान यामधून वास येतो. तर याचा जो सुगंध आहे, याचा जो वास आहे तो आपल्या धान्यांना टिकवून ठेवतो.

आता तेजपत्ता घ्यावा? किती दालचिनी किंवा काय वस्तू किती प्रमाणात घ्याव्या हे धान्यावर डिपेंड आहे. धान्य जर जास्त असतील तर तुम्ही दालचिनीच प्रमाण किंवा इतर वस्तूच प्रमाण देखील त्याप्रमाणेच वाढवा. म्हणजे जर अगदी पोत्यामध्ये तुम्हाला जर दालचिनीचे तुकडे टाकायचे असतील, तर सात आठ मोठे तुकडे टाकावे लागतील. तेजपत्ता देखील बराच टाकावा लागेल.

आता आपला तिसरा जो उपाय आहे तो आहे तुरटी. तुरटी ही डाळीला धान्याला कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी खूपच जास्त प्रभावशाली आहे. याचा उपयोग फक्त तुम्ही एकदा करून करून बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. याला व्यवस्थित योग्य पद्धतीने वापरा. कडधान्य असो, गहू, ज्वारी त्यामध्ये देखील तुम्ही हे तुरटीचे खडे असे टाका म्हणजे कसं त्यांना जाळी पडणार नाही किंवा त्यामध्ये ओलसरपणा येणार नाही आणि कीड लागणार नाही.

हे वाचा:   सासू सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, सुनेला पाय दाबवण्यास बोलवले आणि...

इथे आपला हा चौथा उपाय आहे हळद. हळद अगदी सर्वांच्याच घरी असणारा पदार्थ आहे आणि हळदीचे उपयोग खूप जास्त आहेत, तसेच ओषधीय गुण देखील आहेत. पण हळदीचा उपयोग आपले कडधान्य साठवण्यासाठी देखील होतो. फक्त थोडीशी हळद घ्यायची, धान्याच्या प्रमाणे हळद घ्यायची आहे आणि लावून फक्त अशा प्रकारे याला हलवून घ्यायचं किंवा हाताने चोळून घ्यायचं. हळदीचे कोटिंग यावरती तयार होते आणि यामुळे ह्याला कीड लागत नाही किंवा जाळी पडत नाही आणि हे खराब होत नाहीत.

यानंतर बघा सर्वात रामबाण उपाय आणि सर्वांनाच माहित असणारा खूपच जुना उपाय म्हणजे कडूलिंबाची पान. हा आपला पाचवा उपाय आहे. कडुलिंबाची पाने वापरण्याची पद्धत खूप वर्षापूर्वीची आहे. कडुलिंबाची पान कधीही स्वच्छ धुऊन वाळवून त्यानंतर अशाप्रकारे टाकायची म्हणजे काय यामध्ये असणारी धूळ आपल्या धान्याला लागत नाही आणि कडूलिंबाची पान टाकण्याच्या दोन तीन पद्धती आहेत. एक तर तुम्ही टिशू पेपर किंवा एखादी पॉलिथीन घ्या, कॅरी बॅग घ्या, त्यामध्ये गुंडाळून आपल्याला कडुलिंबाची पान टाकायची आहेत.

तुमच्याकडे जर टिशू पेपर नसेल तुम्ही साधा पेपर वापरत असाल, तर त्या पेपर वरती तुम्हाला सुईने दोन चार छिद्र करावे लागतील, सात आठ छिद्र करून घ्या, म्हणजे त्यामधून याचा सुगंध येत राहील. तर मित्रांनो वरील सर्व उपाय खूप परिणामकारक आहे जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही 100 वर्ष काय त्यापेक्षा जास्त धान्य साठवून ठेवू शकता आणि हो ह लेख थोडासा जरी आवडला असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.