जळालेले दुधाचे भांडे अजिबात मेहनत न करता चुटकीशीर साफ करा फक्त या सोप्प्या ट्रिक ने.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, बऱ्याचवेळा आपण गॅस वर काहीतरी ठेऊन विसरून जातो आणि ते करपल्याचा किंवा जळल्याचा वास आल्यावर आपल्या लक्षात येतं पण तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि ते भांड पूर्ण जळून जातं. तर इतका घान टोप जळालेला आहे. पूर्ण अर्धा लिटर दूध आम्ही ठेवलं आणि आम्ही विसरून गेलो तर आता हा टोप क्लीन कसा करायचा ते पाहूया.

तर सर्वात अगोदर पहा चमच्याने त्याची वरची बाजू निघते पण आतली बाजू, जो काळा भाग जळालेला आहे तो अजिबात निघत नाही. तर आता हे क्लीन करण्यासाठी मी टोप धुऊन घेतलाय. आता त्याच्यामध्ये मी पूर्ण भरून पाणी घेणार आहे. कारण की पूर्ण टोप जळालेला आहे. जर कमी जळालेला असता तर मी जेवढ जळाले आहे तेवढcg पाणी घेतल असतं.

यामध्ये मी एक चमचा कपडे धुण्याची पावडर टाकलेली आहे. हे पाणी गरम होऊ द्या आणि तर हे पाणी गरम झाल्याच्यानंतर जिथे जिथे जळालेल आहे तिथपर्यंत हे जे साबणाच पाणी आहे ते गेलं पाहिजे. त्याच्यासाठी मी चमच्याने सगळीकडे हे टाकते. नाहीतर काय होईल तो भाग जास्त कडक होऊन जाईल, यामुळेच त्यावर हे साबणाच पाणी टाकण महत्त्वाच आहे.

हे वाचा:   बॅचलर बनवतील इतकी सोप्पी गुबगुबीत पुरणपोळी, चव इतकी भारी कि लोकं बोटं चाटत राहतील.!

आणखीन यामध्ये आपल्याला एक साहित्य टाकायच आहे. आता याला एक उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहे एक चमचा खाण्याचा सोडा. म्हणजे आपला जो बेकिंग सोडा असतो ना तोच टाकायचा आहे.

यामुळे काय होईल ही जो कडक, जो घट्ट जळलेला भाग आहे ना तो सैल होईल आणि पटकन निघेल. गॅस स्लोच ठेवायचा आहे, गॅस फास्ट नाही करायचा नाहीतर पूर्ण पाणी बाहेर निघेल. आता एका पकडीने पकडून मी हे सर्व गरम पाणी जिथे जळलेल आहे तिथे टाकते. आता यानंतर तुम्ही हलक्या हाताने चमचा जरी फिरवला ना तरी पटकन ती बाजूची घाण निघते. म्हणजे हा जो टोप आहे तो नवीन सारखा होईल.

जर्मल ची ही भांडी अशी घासली ना तर ते एकदम स्वच्छ एकदम चांदी सारखे दिसतात. तर मी यामध्ये आणखीन एक साहित्य टाकल ते म्हणजे एक चमचा मी मीठ टाकलेल आहे. मीठ यासाठी टाकलेल आहे की आता हा दुधाचा टोप आहे आणि यामध्ये दूध जळलेल आहे.

हे वाचा:   इस्त्री करणाऱ्या लोकांनी एकदा नक्की वाचा, खूप फायदा होईल.! इस्त्री करताना जर वापरल्या ह्या टिप्स तर होईल फायदाच फायदा.!

नेक्स्ट टाईम जेव्हा मी दूध गरम करेल तेव्हा ते दूध फुटल नाही पाहिजे त्याच्यासाठी मी यामध्ये मीठ टाकलेल आहे. आता गॅस बंद केला आहे. 15 मिनिट मी उकळून घेतलं होतं आणि आता गॅस बंद केला आहे. त्यानंतर चमच्याने पुन्हा खरडून खरडून आतला भाग काढायचा आहे.

आता हे पाणी थंड झालय हे पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया कारण की हे पाणी आपल्याला नंतर लागेल. यामध्ये आता पुन्हा आपण साबणाच थोडं पाणी घेतलय आणि आता एक काथ्या घेऊन त्याने मी पूर्ण घासून काढते, लगेच हे निघत. जास्त अजिबात जास्त मेहनत मी केलेली नाहीये. तर हा टोप छान स्वच्छ होईल त्यानंतर पुन्हा काय करायचं ते पाहूया.

आता आंघोळीच्या साबणाचा छोटासा तुकडा घेतलाय मी आणि त्याने पुन्हा हे घासत आहे. आंघोळीचा साबणने आपण जरमल ची भांडी घासली ना अगदी नवीन सारखी दिसतात. तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट मधे नक्की सांगा. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.