नमस्कार, तुमचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे झटपट चिकन बिर्याणी. कोणतही वाटण न करता कमी वेळेत अगदी झटपट अशी ही चिकन बिर्याणी तयार होते. तर चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला चिकन मी मॅरिनेट करणार आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुऊन घेतलेल आहे. यामध्ये आता पाव चमचा हळद घालू, एक चमचा लाल तिखट घालू, दीड चमचे बिर्याणी मसाला घालू, इथं मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे.
हा बिर्याणी मसाला घातल्यामुळे खूप मस्त खड्या मसाल्यांची चव लागते. एक चमचा धना पावडर, एक चमचा गरम मसाला घालू, चवीनुसार मीठ घालू, दीड चमचे आलं लसूण पेस्ट घालू, पाव वाटी दही घालू, दही जास्त आंबट असेल तर थोडं कमी घाला म्हणजे बिर्याणी खूप छान चवीला लागते. त्याचबरोबर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घालू.हिरव्या मिरच्या मी अर्ध्या, अर्ध्या कट केलेल्या आहेत आणि हे सर्व मसाले आपण चिकनला लावून, चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत.
मसाले मिक्स करून घेतल्यानंतर हे चिकन आपण एक तास फ्रिजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ किंवा तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता. एक तास म्हणजे मसाल्यांची चव चिकन मध्ये छान उतरेल. तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी चिकन तुम्ही ठेवून देऊ शकता. आता आपण बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घालू. त्यासाठी इथे मी तीन वाटी बिर्याणीचा बासमती तांदूळ घेतलेला आहे.
दोन ते तीन वेळा हा तांदूळ आपण स्वच्छ धुऊन घेऊ. तांदूळ मी स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास हा तांदूळ भिजत ठेवू. चिकन मॅरिनेट झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपण चिकन शिजवून घेऊ. त्यासाठी भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊ. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रीच पान, दोन दालचिनी, दोन हिरवी वेलची, एक चकरीफुल, एक चमचा जिर आणि तीन ते चार लवंग घालू. हे खडे मसाले थोडे परतून घेऊ.
खडे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये तीन मिडीयम आकाराचे कांदे उभे पातळ असे चिरलेले घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ. यामध्ये आता दोन टोमॅटो घालू, उभे असे पातळ चिरलेले आहेत टोमॅटो आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो सुद्धा छान मऊसर असा परतून घेऊ. आता यामध्ये मॅरिनेट केलेल चिकन घालू.
हे चिकन चार ते पाच मिनिट तेलामध्ये परतून घेऊ म्हणजे चिकन आणि मसाले सुद्धा तेलामध्ये छान परतले जातात. मिडीयम गॅसवरती एकसारख आपल्याला चिकन चार ते पाच मिनिट् परतून घ्यायच आहे. आता मसाल्यांना थोडं थोडं तेल सुटायला लागलेल आहे. यामध्ये आता आपण पाणी घालू. तर चिकन शिजण्यापुरत मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे.
ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट केलेल त्याच भांड्यात मी पाणी घालून यामध्ये घातलेला आहे. मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर गॅस आपण बारीक करून यावरती पॅक बंद अस झाकण ठेवून देऊ आणि चिकन छान मऊसर अस शिजवून घेऊ. चिकन शिजण्यासाठी जवळजवळ 15 मिनिट लागतील तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी घेतलेल आहे.
पाण्याच प्रमाण जास्तच ठेवायचं म्हणजे भात छान मोकळा सुटसुडीत होतो. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू, दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या. तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातल्या तरी चालतील. त्याचबरोबर एक लिंबाची फोड घालू म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र असा तयार होतो. या मसाल्यांमध्ये एक तमालपत्रीच पान, दोन दालचिनीचे तुकडे, दोन ते तीन हिरवी वेलची, दोन ते तीन लवंग, एक छोटा चमचा जिर आणि चकरीफुल घालू.
भात छान मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी एक चमचा तेल घालू आणि याला आता छान उकळी येऊ देत. उकळी आल्यानंतर उकळीमध्ये आपण तांदूळ घालायचा आहे. तर बघू शकताय पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ घालू. तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला, तांदळा मधल पाणी पूर्ण निथळून काढलेल आहे. तांदूळ घातल्यानंतर चमच्याने तांदूळ मिक्स करून घ्यायच म्हणजे भांड्याला चिटकत नाही.
भाताला आता उकळी आलेली आहे. गॅस मोठा करून हा भात आपण 90 टक्के शिजवून घेऊ. जवळजवळ दहा ते 12 मिनिट लागतात भात शिजायला. तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता बिर्याणीसाठी आपला भात तयार झालेला आहे. आता चाळणीमध्ये भात मी काढून घेतलेला आहे. भातामधल पाणी पूर्ण निथळून काढलेल आहे. खडे मसाले आहेत ते तुम्ही बाजूला करू शकता. त्याचबरोबर बिर्याणीसाठी चिकन मसाला सुद्धा तयार झालेला आहे. चिकनची ग्रेव्ही सुद्धा मस्त सरसरीत अशी तयार झालेली आहे.
चिकन मसाल्याची ग्रेव्ही जास्त घट्टसर अशी करू नका. नाहीतर बिर्याणीला दम देताना ती खाली करपते. तुम्ही बघू शकताय मस्त चिकन सुद्धा छान मऊसर असं शिजलेल आहे. आता आपण बिर्याणीला दम देऊ त्यासाठी दहा मिनिट मोठ्या गॅसवरती तवा मी गरम करून घेतलेला आहे. ज्या भांड्यात चिकन आपण शिजवून घेतलेलं त्या भांड्यात मी दम देणार आहे, ते भांड तव्यावरती ठेवून देऊ आणि चिकनच्या वरती या पद्धतीने भात आहे तो पसरवून घालायचा आहे.
मस्त मोकळा सुटसुटीत असा बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे. तुम्ही हव तर दोन लेयरची बिर्याणी करू शकता. मी अस चिकनच्या वरती भात घातलेला आहे. भात घालून झाल्यानंतर यावरती आता पुदिन्याची पान घालू थोडी, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालू, एक चमचा साजूक तूप घालू, आता गॅस बारीक करून यावरती पॅक बंद अस झाकण ठेवू आणि त्यावरती जड वस्तू ठेवून देऊ म्हणजे बिर्याणीची वाफ बाहेर जात नाही, आतल्या आत मस्त बिर्याणीला दम बसतो आणि आता बारीक गॅस करून 20 मिनिट आपण बिर्याणीला दम देऊ तर जवळजवळ 20 मिनिट झालेले आहेत.
गॅस बंद करून 10 मिनिट अशीच ही बिर्याणी झाकण न उघडता ठेवून देऊ म्हणजे चिकन बिर्याणी आहे ती छान सेट होते. चिकन बिर्याणी चमच्याने मिक्स करून घेऊ. मस्त चमचमीत अशी झटपट चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. कोणतही वाटण न करता अगदी झटपट ही चिकन बिर्याणी तयार होते आणि खायला सुद्धा तेवढीच मस्त लागते. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडलाच असेल. तुम्हाला जर ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर हा लेख जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.