बॅचलर बनवतील इतकी सोप्पी गुबगुबीत पुरणपोळी, चव इतकी भारी कि लोकं बोटं चाटत राहतील.!

ट्रेंडिंग

मित्रांनो आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी अतिशय साध्या सोप्या पद्धतीत पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो पुरण कसं बनवायचं ते आपण बघुया. तर त्यासाठी एक कप, साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे. कुकरमध्ये ही डाळ शिजवून घ्या. ही डाळ सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली आहे. आता धुतलेल्या डाळीत अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत, या डाळीसाठी मीठ खूप जास्त घालायचं नाही, नाहीतर पुरणपोळी खाताना थोडीशी खारट लागू शकते. आता जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर एक कप डाळ साठी चार कप पाणी घालायचं. कटाची आमटी करायची नसेल तर एक कप साठी, दोन कप तुम्हाला साधं पाणी वापरायचं आहे. आपण येथे डाळीसाठी दोन कप पाणी वापरणार आहोत.

आता कुकर ला झाकण लावायचे आणि मध्यम आचेवर साधारणत एक सात ते आठ शिट्टी आपण करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे पीठ भिजवणार आहोत. पारंपरिक पद्धतीत गव्हाच्या पिठापासून ही पोळी तयार केली जाते पण तुमची पुरण पोळी लाटताना चिकटली जात असेल किंवा फाटली जात असेल तर तुमच्यासाठी मैद्याची पुरणपोळी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. मैद्याची पुरणपोळी करताना अजिबात फाटणार नाही. तर त्यासाठी मी बरोबर दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणता पाव किलो प्रमाणात मैदा घेतलेला आहे.

दीड कप मैदा साठी अगदी चिमुटभर, पाव चमचा हळद घेतलेली आहे, जेणेकरून पुरणपोळीला अगदी सुंदर पिवळा रंग येतो आणि थोडे थोडे पाणी घालून अगदी मऊसूत गोळा मळून घेणार आहोत. आता यामध्ये दोन चमचे घट्ट साजूक तूप घातलेल आहे, अगदी मेल्टेड किंवा संपूर्ण विरघळलेल असेल तर साधारणपणे चार पाच चमचे तुम्हाला यामध्ये तूप वापरायच आहे. आता हे पीठ साधारणत दहा मिनिटांसाठी आपण भिजत ठेवणार आहोत. कुकरला साधारणतः सहा सात शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर झाकण काढून बघणार आहोत. आपली डाळ शिजवून तयार झालेली आहे. लक्षात असू द्या तुम्हाला डाळ पूरनियंत्रण मध्ये किंवा खुप मिक्सरला वगैरे लावायची असेल तर शंभर टक्के डाळ तुम्हाला शिजवून घ्यायची आहे.

हे वाचा:   कपडे धुतल्यानंतर कपड्यावर पांढरे कापूस चिकटून राहत असेल तर हा उपाय करा.! कपडे धुताना वॉशिंग मशीन मध्ये टाकायचा हा एक पदार्थ कधीच कपडे पांढरे पडणार नाही.!

तसेच आता डाळीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल थोडं पाणी वगैरे आहे तर ही डाळ तुम्ही चाळून घेऊ शकता. पण इथे यामधे आपल्याला अजिबात पाणी घायलचे नाही. तसेच ही डाळ एक दोन मिनिटांसाठी मॅश करून घ्यायची आहे. थोडसं घट्ट झालं की आपण यात गुळ घालणार आहोत. हा गुळ तुम्हाला चवीनुसार घ्यायचा आहे. त्यांनतर अर्धा चमचा जायफळ आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा तुमच्याकडे जर बडीशेप पूड असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता गुळ घातल्यानंतर पुन्हा मुळाला पाणी सुटतं त्यामुळे आता अगदी तळापासून ढवळत गरजेनुसार गॅस कमी अधिक करून तुम्हाला छान यातलं पाणी आटवून घ्यायच आहे. असा छान थोडासा हलका घट्ट गोळा व्हायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे.

गरम असतानाच गरम-गरम आपल्याला हे पुरण चाळणीत काढायचं आणि तांब्याने, ग्लास ने किंवा पळीने वरून छान प्रेस करत किंवा दाबत यातल सगळं पुरण चाळणीच्या खाली आल्यासारख दिसत असेल, ही पद्धत मला खूप सोपी वाटते. पाच-सहा मिनिटात डाळीच पुरण तयार झालेल आहे. छान आपलं एकसंध पुरण तयार झालेल आहे. मस्त पुरण होईपर्यंत आपल पोळीच पीठ छान मऊसुत आणि हलकफुलक पीठ भिजवून तयार होतं. आता आपण पुरण पोळी बनवायला घेणार आहोत. त्यासाठी मैद्याचे पीठ घेतलेल आहे. तुम्ही थोडं तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल.

हाताला पीठ लावून घेऊ, जेणेकरून हाताला पीठ चिकटून बसू नये आणि पिठाचे छोटे गोळे करून घेणार आहोत, आता मैद्याच्या पोळीच्या दुप्पट आपल्याला सारण घ्यायचे आहे किंवा योग्य प्रमाणात पुरण घ्यायच आहे. आता आपण या पिठाची पारी करून घेणार आहोत. आता हा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि मैद्याचे पीठ खूप जास्त लवचिक असतं, त्यामुळे पोळी तुमची फाटत नाही. त्यांनतर आपल्याला पुरणाचा गोळा पिठाच्या पारीत टाकून छान पुरचुंडी करून घ्यायची आहे आणि थोडीस भाकरी प्रमाणे आपण हे हातावर थोडसं थापून घेणार आहोत, म्हणजे सारण एकसारखं एकसंध सगळीकडे छान पिठामध्ये घोळून घेणार आहोत.

हे वाचा:   कुरकुरीत अळूवडी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.. रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स.!

त्यांनतर ही तुम्ही पोळी छोटीशी लाटून घेतली तरी सुद्धा. चालू शकते. लाटत असताना खूप जोर लावायचा नाही आणि बघू शकता ही एक पोळी मी किती वेळा उचललेली आहे, फक्त अधून मधून थोड थोड पीठ आपल्याला लावून घ्यायच आहे. एक सारखी पोळी लाटताना तुम्ही बघू शकता पोळी लाटताना मी किती वेळा उचलून घेतली तरी सुद्धा ही अजिबात फाटत नाही. अगदी कशीही तुम्ही लाटली तरीसुद्धा लाटण्याने तुम्हाला ही अगदी व्यवस्थित लाटता येते. अगदी पातळ छान लाटून घेतली की सारण सगळीकडे पसरलेले तुम्हाला दिसत असेल. पोळी भाजण्याकरता तवा छान गरम झालेला आहे, आता यावर पोळी घालणार आहोत.

आता हा तवा खूप जास्त कडकडीत करायचा नाही कारण मैद्याचे पीठ फार जास्त हलक असत, पटकन रंग बदल करतो. अजून पहिलीच पुरणपोळी असताना तुम्ही इथे बघू अगदी छान टम्म फुलासारखी छान फुललेली आहे. तर या पद्धतीने आपण पुरणपोळी नक्कीच करू शकतो. आवश्यकतेनुसार थोडं तूप किंवा तेल घातलं तरी सुद्धा चालू शकेल. अशी ही तुमची मस्त गुबगुबीत लुसलुशीत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पोळ्या आपण तयार करून घेणार तयार आहोत. कोणताही पदार्थ अगदी मनापासून केला तर तो परफेक्ट तयार होतो.

तर अशी पुरणपोळी तुम्हीसुद्धा घरी नक्की करून बघा. एकदम मस्त झालेली आहे छान गुबगुबीत आणि गव्हाच्या पिठाच्या तुलनेत बनवायला तर अगदी सोपी आहे. अगदी कडेपर्यंत सारण भरलेल आणि मस्त खुसखुशीत ही पुरणपोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे. नैवेद्यासाठी किंवा नुसतंच खाण्यासाठी सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, तसेच तुमच्या परिवारासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करायला विसरू नका.