ना पोळपाट, ना लाटणं चपात्या बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत पाहून तुमचेही काम हलके होईल.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण खूपच महत्त्वाच्या नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तर इथे आपली सर्वात पहिली महत्त्वाची टिप आहे भांडे घासण्यासाठी. अगदी न चुकता दिवसभरामध्ये दोन तीन वेळा तरी आपल्याला भांडे घासावे लागतात आणि भांडे घासताना सर्वात मोठी अडचण येते. बऱ्याच वेळा आपण पाहतो आपला जो सिंक एरिया आहे तो कधी कधी ब्लॉक होतो आणि त्यामधून पाणी जात नाही, घाणेरडा वास यायला लागतो.

आपण ठीक करायला गेलं तर खूप जास्त पसारा होतो, घान पाणी पडतं, त्यासोबतच जर प्लंबरला बोलवून हे ठीक करायचं म्हणलं तर पैसे खर्च होतात पण अशी वेळच येऊ नये यासाठी एक छोटसं काम करा, हे केल्याने तुम्हाला कधीच सिंकचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे एक प्लास्टिकची बॉटल तुम्हाला कट करून घ्यायची आहे. छोटी किंवा मोठी बॉटल तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर एक वस्तू आपल्याला गरम करून घ्यायची आहे ज्याने तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलला भरपूर छिद्र पाडू शकता.

जास्त मोठे पण छिद्र पाडायचे नाहीत. तुमच्याकडे जर पाण्याची बॉटल नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा कोणताही जुना डब्बा पण वापरू शकता. आता दररोज जस आपण भांडे घासतो तसं काही ना काही खरकट असत, चहा पावडर असते, काही ना काही तरी आपलं थोडफार खरकट जे आहे ते आपल्या सिंक मधून पाईपमध्ये जात आणि पाईप जाम होतो.

पण हेच खरकट पाणी जर आपण अशाप्रकारे गाळून घेतलं या प्लास्टिकच्या बॉटलने किंवा डब्याने तर अगदी एकही कण आपला अन्नाचा आपल्या पाईपमध्ये जाणार नाही, खरकट जाणार नाही, पाईप ब्लॉक होणार नाही, खानेरडा वास येणार नाही, त्यासोबतच आपले भांडे देखील लवकर स्वच्छ होतात. नक्कीच अशा प्रकारे तुम्ही हे बनवून ठेवा आणि भांडे घासताना वापरा.

हे वाचा:   प्लॅस्टिकची तुटलेली भांडी जोडा मीठाने; तेही एकही रुपया खर्च न करता.!

यानंतरची आपली ट्रिक आहे की आता आपण बऱ्याच वेळा बटाट्याची भाजी बनवतो किंवा बटाट्याचे जसे पराठे बनवतो त्यासाठी भरपूर बटाटे उकडले जातात आणि त्यामध्ये राहिलेल जे गरम पाणी आहे ते आपण फेकून देतो किंवा याला आपण असच ठेवतो आणि हे थोड्या वेळानंतर थंड होत. तर आता याला वाया न घालता आपण बटाट्यामधील जे गरम पाणी आहे त्याला योग्य पद्धतीने जर वापरलं तर आपल्याला भरपूर बचत करता येते. जस की गॅसची बचत होते आणि अवघड किचकट कामे सोपी होतात. आता इथे पहा हे गरम घेऊन एक तर तुम्ही या गरम पाण्यामध्ये थोडासा वॉशिंग पावडर आणि थोडस मीठ टाकून तुमचे जे किचनचे कपडे आहेत ते देखील धुऊ शकतात.

गरम पाण्याने हे कपडे खूप छान निघतात. जर तुम्हाला आता किचनचे कपडे धुवायचे नसतील तर यात तुम्ही सरळ थोडस मीठ टाका आणि हे पाणी तुमच्या सिंक मध्ये टाका. जेणेकरून तुमच्या सिंकमध्ये काही अडकल्याने ते ब्लॉक झालं असेल तर ते पूर्णपणे गरम पाण्याने निघून जातं. चिकटपणा जो असतो तो निघून जातो आणि तुमच्या सिंकचा घानेरडा वास येत नाही.

यानंतरची आपली जी ट्रिक आहे, यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन पीठ घ्या आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी. थोडीशी तुरटी आपल्याला घ्यायची आहे. अगदी थोडी तुरटी पावडर यामध्ये टाका, त्यांनतर यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक करून यामध्ये टाकू शकता. यानंतर यामध्ये आपल्याला टाकायच आहे थोडासा शाम्पू. हे जे आपण सोलुशन किंवा पेस्ट बनवत आहोत ते आपल्याला खूप कामी येणार आहे.

हे वाचा:   या सैन्य अधिकाऱ्याच्या लग्नाची होत आहे प्रशंसा, ना वरात, ना बॅड, लग्नाला आला 500 रुपये खर्च.!

फक्त एकदा करा आणि सर्वात मोठी अडचण, त्रास, समस्या तुम्ही याने दूर करू शकता. पुढे यामधे थोडीशी साखर टाका. पुढे यामधे तंबाखू पावडर असेल तर ती थोडी टाका. त्यानंतर थोडसं आपल्याला वॉशिंग पावडर यामध्ये टाकायच आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करा. आपल्या घरामध्ये जे उंदीर होतात, त्यांना घालवण्यासाठी ही पेस्ट खूप कामी येते. ही पेस्ट तुम्ही पॉलिथीनवरती किंवा कागदावरती ठेवा.

यानंतरची आपली ट्रिक अशी आहे की आता आपण दररोज चपात्या बनवतो किवा इतर काही तरी तव्यावर आपलं सुरूच असतं. जसं भाकरी, चपात्या आणि त्यानंतर काय होतं तर तवा खूप जास्त जळला जातो, काळा कुट्ट होतो आणि त्यांनतर जर याला आपण व्यवस्थित घासलं नाही तर आपली जी चपाती आहे ती तव्याला चिटकते आणि चपाती खूप जास्त कडक होते किवा फुगत नाही, मऊ होत नाही. काळाकुट्ट झालेला तवा घासायचं म्हणलं की खूपच अवघड किचकट आणि वेळ खाऊ काम आहे अस वाटतं.

पण हे काम आपलं खूप लवकर होऊ शकतं जर आपण घरातीलच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून वापरली तर. तर इथे आपल्याला एक्सपायर झालेल्या गोळ्याच पाकीट घ्यायच आहे. त्यांनतर त्याला एक दोन वेळा दुमडून घ्या आणि त्यावर थोडीशी साबण लावून, थोडसं पाणी टाका आणि त्यानंतर रेगुलर जस आपण घासणीने घासतो तसाच तवा तुम्हाला घासायचा आहे. चांगलं एक दोन वेळा फिरवल्यानंतर तव्यावर साचलेला पूर्ण काळेपणा निघून जातो. तर मित्रांनो या होत्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स. तुम्हाला सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली ते आम्हाला कमेंट मधे नक्की सांगा.