आपणास माहीतच असेल, दात हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ज्याचे दात मजबूत त्याचे आरोग्य मजबूत. कारण आपण जे चावतो तेच पोटात जाते. म्हणून दातांची निगा आणि सौंदर्य जपण्यासाठी अनेकजण अनेक खर्चिक उपाय सुद्धा करतात. अनेक रासायनिक औषधे सुद्धा वापरतात. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरून तोंड व दात नीट साफ करावेत.
काही लोक जेवल्यावर दात ब्रश करतात किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या करतात. दात निरोगी ठेवण्यास हे उत्तम उपाय आहेत. योग्य प्रकारचा ब्रश वापरावा. दिवसातून दोन वेळा दात घासावेत. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. आपल्या आयुर्वेदामध्ये दाताचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत.
मीठ दातांवर चोळणे, मिठाच्या पाण्याने चुळ भरणे, दाढ किंवा दात दुखत असल्यास त्यात लवंग ठेवणे किंवा लवंगाच्या तेलाचा वापर करणे. हळदीचा वापर करणे. कडुनिंबाचा उपयोग करणे. असे अनेक उपाय आपल्याकडे पूर्वीपासून अनेक लोक करत आहेत. तशाचप्रकारे आज आपण एक असा घरगुती उपाय बघणार आहोत.
या उपाय मुळे तुमच्या दातातील कीड बाहेर निघून जाईल, दात मजबूत होतील आणि तुम्हाला कोणतीही दातांची समस्या होणार नाही. हे एक प्रकारचं घरगुती दंतमंजन आहे, जेणेकरून तुम्ही हे रोज देखील वापरू शकता. चला तर बघुयात घरच्या घरी हे दंतमंजन कसे बनवायचे ते. सगळ्यात आधी आपण पूजेसाठी जो कापूर वापरतो, तो ५-६ तुकडे घ्या आणि त्याची पूड तयार करा.
कापूर हा अँटिबॅक्टरील गुणधर्म असलेला आहे ज्यामुळे आपल्या दातात कीड तयार होण्यापासून कापूर बचाव करतो. आता यात तुरटीची पूड घाला. दोन्ही पूड सारख्याच प्रमाणात असू द्या. तुरटी आपल्या दातातील वेदना कमी करते. तसेच कडुलिंब आपल्या दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. यामुळे दाट मजबूत होतात आणि कीड सुद्धा मरून जाते.
कडुलिंबाच्या झाडाची साल एक तुकडा घेऊन ते उन्हात वाळत घाला. ही साल सुकल्यानंतर एका मातीच्या भांड्यात ती जाळून घ्या. जाळल्यानंतर आता याची काळी पूड तुम्हाला तयार झालेली दिसेल. आता तुरटीची पूड तव्यावर थोडी गरम करा. आणि त्यात कापराची पूड, थोडेसे मीठ आणि कडुलिंबाच्या सालांची पूड एकत्र करून मिश्रण तयार करावे.
अश्याप्रकारे काळ्या रंगाचे दंतमंजन आपण रोज वापरू शकता. हे दंतमंजन दात, दाढ तसेच हिरड्यांच्या त्रासापासून तुम्हाला कायमच दूर ठेवेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.