गव्हाच्या पिठात हे दोन पदार्थ टाका; चपातीतुन मिळेल 10 पट ताकद.!

आरोग्य

महिला असो अथवा पुरुष किंवा मुले असो अथवा मुली चांगली उंची व व्यवस्थित वजन असले तर व्यक्तिमत्व उठून दिसते. आज-काल व्यक्तिमत्व विकासावर खूप भर दिला जातो. शहरांमध्ये तर ग्रूमिंग क्लासेस देखील घेतले जातात. आपले व्यक्तिमत्व हे आपल्या अंतरंगामधून तसेच बाह्यांगातून उठून दिसण्यासाठी आपण वेगवेगळे क्लासेस देखील करतो. मात्र काही स्त्री व पुरुष शरीराने इतके कृश व बारीक असतात की बाकीच्या लोकांना जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटतो व आत्मविश्वास देखील कमी होतो.

कितीही जेवण केले तरी अशा लोकांच्या अंगाला जेवण लागत नाही व हे लोक काटकुळेच राहतात. बारीक शरीरामुळे हे लोक कायमच चेष्टेचा विषय बनतात. एखाद्या सापळ्याला कपडे घातले आहेत की काय? अशी काही लोकांच्या शरीरयष्टी असते. आपले शरीर चांगले दिसावे व आपल्याला देखील लोकांनी वळुन पहावे असे प्रत्येकाला वाटते.

आपले शरीर सुदृढ राहावे व आपण चारचौघात उठून दिसावे याकरता अनेक लोक महत्तप्रयास करत असतात. योग्य वजन, उंची व योग्य अंगबळ असेल तर व्यक्तिमत्व उठून दिसते. अनेक लोक सुडौल शरीर मिळण्याकरता खूप प्रयत्न करतात. तासनतास जिममध्ये जाऊन घाम गाळतात व शरीर कमावण्याचा प्रयत्न करतात. जिममध्ये व्यायामाबरोबर प्रोटीन पावडर दिली जाते. ही पावडर खाल्ल्यामुळे स्नायू बळकट होतात व शरीर फुगते.

हे वाचा:   संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फेल आहे, पृथ्वी वरील अमृतच जणू, जाणून घ्या याचे अनोखे फायदे.!

मात्र प्रोटीन पावडर खाण्याचे बंद केल्या नंतर परत परिस्थिती जैसे थे होऊन जाते. याकरता कायमस्वरूपी काही तरी उपाय करावा यासाठी आपण अनेक लोकांचे सल्ले घेत असतो व उपाय ही करुन पाहत असतो. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये कायमस्वरूपी प्रोटीनची कमतरता भरून काढणार्‍या आहाराबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कधीही बाहेरचे पदार्थ विकत घेण्याची गरज पडणार नाही!

आपण रोजच्या आहारामध्ये गव्हाच्या पीठाच्या चपात्या खातो. आपल्याला फक्त दोन पदार्थ या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही व शरीराला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनचा पुरवठा होईल. ज्यामुळे शरीर चुस्त व तंदुरुस्त होईल. आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकावयाचे दोन पदार्थ म्हणजे हरभरा आणि मूग!

हरभरा आणि मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. याकरता आपण हरभरे चांगले भाजून घ्यायचे व मिक्‍सरमधून दळून घ्यायचे. ज्याला आपण सातू असे देखील म्हणतो. हे सातूचे पीठ आपल्याला बाजारात देखील सहज उपलब्ध होते. मुग आपल्याला बिना भाजता मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहेत. आता आपण जेव्हाही गव्हाच्ता चपात्या करण्यासाठी पीठ मळणार असाल त्यावेळेस हे तीनही पीठ एक सारख्या प्रमाणामध्ये घ्यावे व या पिठापासून चपात्या बनवाव्या.

हे वाचा:   जुळी बाळे कशी जन्माला येतात माहिती आहे का.? प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवी अशी माहिती.!

गहू, चणे आणि मूग यातील प्रोटीन तत्व या चपाती मध्ये उतरतील, ज्यामुळे आपल्याला प्रोटीनचा पूर्ण पुरवठा होऊन कुठल्या ही बाहेरच्या प्रोटीन पावडर खाण्याची गरज पडणार नाही.  प्रोटीन हे डायरेक्ट रक्तात शोषले जाते. आपणही हा उपाय करुन सुडौल व सुदृढ शरीर कमावु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *