अनेक लोकांच्या शरीरावर तीळ असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या स्थानावर असलेल्या तिळाचे महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले गेले आहे. समुद्र शास्त्रामध्ये याबाबतचा उल्लेख केला गेला आहे. यामध्ये नाकावर असलेल्या तिळा बद्दल देखील बरेच काही सांगितले आहे. नाकावर तीळ असेल तर याचा काय अर्थ होत असतो हे आपण जाणून घेऊया.
अनेकांना हे माहिती नसेल परंतु नाकावर तीळ असेल तर हे तुमच्या भाग्याचे संकेत देत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची सविस्तर पणे अशी माहिती देणार आहोत. नाकाच्या कोणत्या बाजूला तीळ असल्यास कोणते लाभ होत असतात तसेच अशी व्यक्ती मध्ये कोणते गुणधर्म असतात हे आपण जाणून घेऊया.
नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणे: तुम्ही बघितले असेल की अनेक लोकांच्या नाकाच्या उजवा बाजूला तीळ असतो.! अशाप्रकारे तीळ ज्या लोकांच्या नाकावर आहे असे लोक विविध कला क्षेत्रांमध्ये सर्वात पुढे असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर अशाप्रकारे तीळ असलेले लोक खूपच कलाबाज असतात. अशा प्रकारचे लोक वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यात रस दाखवत असतात.
नाकाच्या डाव्या बाजूला असेल तीळ: ज्या व्यक्तींच्या नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असतो अशा व्यक्तींचा स्वभावाबद्दल आपण जाणून घेऊया. अशा प्रकारचे लोक आपल्या वाणी दारे सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकत असतात. आपल्या मनामध्ये असलेली एखादी गोष्ट समोरच्या पुढे ठेवून त्याला आपण किती सत्य आहोत हे अगदी सहजपणे सांगू शकतात.
एवढेच नाही तर अशा प्रकारचे लोक अतिशय भाग्यशाली असल्याचे सांगितले जातात. हे एक प्रकारचे सौभाग्य सूचक देखील आहे. ज्या लोकांच्या नाकाच्या डाव्याबाजूने तीळ असतो असे लोक खूपच प्रेमळ असतात तसेच, इतरांशी ते खूपच प्रेमाने व्यवहार करत असतात. अशा लोकांना संतान सुख प्राप्त होत असते.
नाकाच्या मधोमध असेल तीळ: अनेक लोकांच्या नाकाच्या शेंड्यावर म्हणजेच मधोमध तीळ असतात अशा लोकांबद्दल आपण जाणून घेऊया. अशा प्रकारचे लोक नेहमी मी ठरवलेल्या ध्येयाकडे वाटचाल करत असतात. त्यांनी एखादे ध्येय ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नसतात. अशा प्रकारचे लोक आपले कोणतेही काम अपूर्ण सोडत नाहीत. पूर्णपणे जीव ओतून काम करत असतात. असे लोक खूपच कष्टाळू देखील असतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.