मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार ,जाणून घ्या.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ संकेत आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत. आपण गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध देवांशी जोडतो आणि ते खरेही आहे. प्रत्येक प्राण्याचा काही ना काही अंशी संबंध हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भगवंताशी जोडलेला आहे. आज आपण मुंगूसा विषयी माहिती घेणार आहोत. मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो. मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू भगवंतांचे दर्शन घेण्यासारखे आहे.

ज्या दिवशी आपल्याला मुंगूस दृष्टीस पडले त्या दिवशी समजावे की आजचा दिवस आपला शुभ जाणार आहे. आपण जे काही कार्य आज करणार आहोत त्यात आपल्याला यश आणि सफलताच मिळेल. मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो. कोणत्या ना कोणत्या मार्गान आपल्याला पैसे जरूर मिळतात. आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे त खूपच शुभ असते. मुंगूस आणि साप यांचे भांडण दिसणेही शुभ असते.

हे वाचा:   या चार राशीच्या जीवनामध्ये होणार आहे खूप बदल, जाणून घ्या तुमची तर रास नाही ना.!

ज्या घरात मुंगूस असते तेथे साक्षात श्रीहरी विष्णू भगवंतांचा देवी लक्ष्मी सहवास असतो. म्हणून आजकाल काही विशिष्ट प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतात. तर ज्या प्राणी किंवा वनस्पती कडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो, तो प्राणी किवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतात, असा ढोबळ अर्थ लावला जातो. प्रत्येक उपाय करताना त्यात त्या प्राण्याचा किवा वनस्पतीचा काही ना काहीतरी स्कारात्मक परिणाम असतोच.

चला तर जाणून घेऊया की मुंगुसाचा धनसंपत्ती आणि सफलता मिळवून देण्यासाठी काय उपाय आहे. हा उपाय जर आपण कुठे बाहेर जायला निघालो आणि अचानक जर आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस गेल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती घेऊन लगेच घरी परतावे. घरी येऊन त्या मातीत आणखी थोड़ी माती मिक्स करावी आणि एका वाटीत ठेवावी.

ती वाटी देवघरासमोर ठेवून बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा आणि जोपर्यंत ती बत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करीत बसावे आणि त्यानंतर आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडलो होतो त्या कामाला निघून जावे. यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. आपली अडलेली कामे मार्गी लागतील, सर्व अडीअडचणी आणि त्रासापासून आपली सुटका होईल.

हे वाचा:   घरापुढे केळीची झाडे शुभ की अशुभ.? केळीचे झाड वास्तू शास्त्राच्या अनुसार कोणत्या दिशेस लावले गेले पाहिजे.?

जी कामे आपण करण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत, परंतु त्यात अपयशच येत होते, ते कामही मार्गी लागेल आणि त्यात यशही मिळेल. ज्या काही नकारात्मक घटना घडत होत्या, त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील. नोकरी व्यवसायात फायदा होईल. म्हणजे सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणाम मिळते.

हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे. मातीची वाटी आपल्या इच्छा असेल तोपर्यंत घरात ठेवावी आणि त्यानंतर ती माती झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यावी. हा उपाय, करा आणि आपले जीवन सकारात्मकतेने व धनसंपत्तीने परिपूर्ण करा. मित्रांनो, हा लेख तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लेख आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा.