वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांचा तसेच घरामध्ये असलेल्या काही वस्तूंचा प्रभाव हा आपल्या जीवनावर देखील पडत असतो. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की आपल्या घराच्या आजूबाजूला असे झाडे असायला हवेत ज्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येत राहील.
असे का तर घराच्या आसपास काही अशा प्रकारचे झाडे असतात ज्याचा असर खूपच वाईट असतो यामुळे घरात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होताना दिसत असतात. पैशासंबंधीच्या समस्या असू द्या किंवा आरोग्य संबंधीच्या समस्या अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे आपण आपल्या घराच्या शेजारी असे झाडे लावायला हवीत.
तुळशीचे झाड: अनेक पुराणांमध्ये तुळशी बद्दल भरपूर अशी माहिती सांगितलेली आहे. तुळशी बद्दल चे महत्व सांगण्याची काही गरज नाही कारण सर्व जणांच्या घरी तुळस ही असतेच. तुळशीचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व सांगितले गेले आहे. ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी भगवान विष्णूचा वास असतो. तसेच अशा घरांमध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसत असते.
केळीचे झाड: केळीच्या झाडाला अनेक प्रकारच्या धार्मिक मान्यता प्राप्त आहेत. गुरूवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते याचा वापर अनेक प्रकारच्या पूजा पाठ करण्यात येतो. हे अत्यंत शुभ देखील असते. यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचीही कृपादृष्टी असते.
बेलाचे झाड अनेक धार्मिक मान्यता नुसार असे सांगितले जाते की भगवान शिव यांचे बेल चे झाड अत्यंत आवडीचे होते. त्यामुळे भगवान शंकराची कुठलीही पूजा असू द्या त्यामध्ये बेल हे लागतेच. त्यामागे हेच एक कारण सांगितले गेले आहे. अशा प्रकारचे हे वृक्ष तुमच्या घरा शेजारी असतील तर तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तसेच तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर त्या देखील कायमचा नष्ट होतील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.