घरामध्ये जर असेल कायमच आर्थिक चणचण तर वापरा या काही वास्तु टिप्स; घरामध्ये कधीही राहणार नाही पैशाची कमी.!

अध्यात्म

आजकाल महागाई वाढत चालली आहे. वस्तूंचे भाव तर गगनाला भिडत चालले आहेत. ज्याच्याकडे आर्थिकबळ चांगले असते तोच आज जगात प्रसिद्ध होतो आणि पैशाच्या बळावर हवे ते मिळवू शकतो. लोक घरामध्ये पैसा टिकून राहावा व घरामध्ये आर्थिक सुबत्ता यावी म्हणून दिवसरात्र काबाडकष्ट करतात. काही लोक खुप मेहनत करुन देखील घरात पैसा संपत्ती टिकत नाही.

काही लोकांच्याबाबतीत तर पैसा कधी येतो आणि खर्च होऊन जातो याचा पत्ताही लागत नाही. असे लोक अनेक उपाय करुन धनलक्ष्मी व कुबेर महाराजांना प्रसन्न करण्याकरता शोधत व आजमावत असतात. कारण धनाची देवता असलेली महालक्ष्मी व कुबेर देव हे ज्या व्यक्तीला प्रसन्न असतात त्या व्यक्तीला कोणत्याही ऐश्वर्य व सुखाची कमतरता राहत नाही. सर्व सुखसोयी त्या व्यक्तीच्या पायाशी लोळण घालतात.

कष्ट आणि अनेक प्रयत्न करूनही आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर आम्ही आज आपल्याला यावर उपाय म्हणुन काही वास्तू टिप्स देणार आहोत! त्या टिप्स वापरुन आपण आपली आर्थिक परिस्थिती नक्की सुधारु शकता  व आपल्यावर माता महालक्ष्मी व कुबेर देवाची कृपा होईल. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला काही वास्तू टिप्स देणार आहोत त्या पुढील प्रमाणे.

हे वाचा:   घरामध्ये चिमणी येणे काय असतात संकेत शुभ की अशुभ : चिमणी घरात आल्यास काय होते एकदा नक्की वाचा काय असतात शुभ संकेत ….!!

१. स्वस्तिक आणि ॐ चिन्ह – घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर महालक्ष्मीचे प्रतिक असलेले स्वस्तिक किंवा ॐ काराचे चिन्ह जर आपण लावले तर माता महालक्ष्मी व कुबेर देव आपल्यावर अत्यंत प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये धनाचा ओघ सुरू होतो.

२. पिरामिड – घरातील सर्व सदस्य ज्या खोलीमध्ये एकत्र येऊन गप्पा मारतात व जिथे घरातील सदस्यांचा सगळ्यात जास्त वावर असतो, अशा खोलीमध्ये चांदी, पितळ किंवा तांबे यांपासून बनवलेला पिरामिड स्थापित केला पाहिजे. यामुळे घरामध्ये धनसंपत्तीची आवक सुरू होते. महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.तसेच घरातील सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाढू लागते. कुटुंबात ऐक्य निर्माण होते.

३. उत्तर दिशेला पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवणे – जर आपल्याला घरामध्ये आर्थिक संपत्ती आणि उत्कर्ष हवा असेल तर आपण घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले मातीचे भांडे म्हणजेच माठ किंवा एखादी पाण्याने भरलेली मातीची सुरई ठेवावी. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनदेवता माता महालक्ष्मी आगमन होते व घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहते.

हे वाचा:   गुरूवारच्या दिवशी या चुका अजिबात करू नका; अन्यथा तुमच्यावर येऊ शकते खूप वाईट वेळ.!

४.धातूची कासव किंवा माशाची प्रतिमा – वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये कासव किंवा माशाची धातूची प्रतिमा ठेवल्यास आपल्याला धनवृद्धी होते तसेच धनलाभ देखील होतो. माता महालक्ष्मी यामुळे आपल्यावर प्रसन्न होते.

५. वास्तू देवतेचे चित्र किंवा प्रतिमा – घरामध्ये वास्तू देवतेचे चित्र किंवा प्रतिमा स्थापित केल्यामुळे वास्तु देवाची आपल्या वर कृपा राहते व वास्तुदेवता आपल्यावर प्रसन्न होते. यामुळे घरामध्ये धनसंपत्ती, शांती, ऐश्वर्य व सुख संपदा लाभते. तसेच घरामध्ये आर्थिकस्थिती सुधारून घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा व सलोखा टिकुन राहतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *