जगात अशा अनेक मनोरंजक गोष्टी आहेत ज्या लोकांना हैराण करत असतात. तुम्हाला आम्ही एक अशाच हैराण करून सोडणाऱ्या एका घटनेविषयी माहिती सांगणार आहोत. तुम्हाला त्या महिलेबद्दल माहिती आहे का जीने जगभर टायफाइड ताप पसरविला आहे? आज आम्ही तुम्हाला अशाच काही मजेशीर मनोरंजक पण हैराण करून सोडणाऱ्या गोष्टींविषयी माहिती देणार आहोत, हे जाणून घेताना तुम्ही नक्कीच चकित व्हाल.
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या लहान मोठ्या मुंग्या निघत असतात परंतु आपल्याला त्याबाबत काही गोष्टी माहिती नसते. तुम्हाला मुंग्याविषयी ही एक गोष्ट माहीत आहे का? तुम्ही हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की पृथ्वीवर उपस्थित असलेल्या सर्व मुंग्यांचे एकूण वजन मानवांच्या एकूण वजनाइतके आहे. ही मजेशीर माहिती तुम्हाला माहित होती का?
अनेकदा आपल्याला दिसेल की लहान मुले खूप प्रश्न विचारतात. आपण कदाचित मूले किती प्रश्न विचारू शकतात हे मोजू शकत नाही, परंतु एका संशोधनानुसार मुले एका दिवसात सुमारे 300 प्रश्न विचारतात. आपल्याला माहिती आहे का? की मधमाश्या काहीवेळा इतर मधमाश्याना डंक मारतात. होय, हे आश्चर्यकारक आहे, परंतु हे अगदी खरे आहे.
तुम्हाला कुत्र्या बाबत हे माहिती आहे का? कुत्री प्राण्यांचे सर्वात आज्ञाधारक आणि निष्ठावान मानले जातात. त्यांना मानवांनी शिकवलेल्या गोष्टी फार लवकर समजतात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की कुत्री जवळजवळ 165 शब्दांचा शब्दसंग्रह ओळखू शकतात, ज्यात बर्याच इंग्रजी शब्दांचा समावेश आहे.
अनेकदा आपल्याला अनेक आजारांची लागण होत असते, त्यापैकीच एक आजार म्हणजे टायफॉइड. तुम्हाला टायफॉइड बाबतची ही माहिती नसेल ‘टायफायड मेरी’ एक वास्तविक ऐतिहासिक स्त्री होती. मेरी मल्लन नावाची आयरिश महिला 1880 च्या दशकात अमेरिकेत स्थलांतरित झाली. तेव्हा तिला टायफाइडची कोणतेही लक्षणे नव्हते.
तरी, तिच्या रक्तात टायफाइड बॅक्टेरिया होता. डॉक्टरांनी तिला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिला ताप नव्हता म्हणून ती ते स्वीकारण्यास तयार नव्हती. तिने एका ठिकाणी एक स्वयंपाकी म्हणून काम केले. असे म्हणतात की तिने बर्याच लोकांना टायफॉइड बॅक्टेरियाची लागण केली होती, त्यातील बर्याच जणांचा मृ’त्यू ही झाला.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.