गाडीत आता पेट्रोल भरताना या गोष्टीकडे देखील लक्ष्य द्या.! होय तुमची रोज होतेय फसवणूक.!

सामान्य ज्ञान

भारतात आज कालच्या धावत्या जगात सोन्या पेक्षा देखील कोणती मौल्यवान गोष्ट असेल ती म्हणजे पेट्रोल. इतर देशांमध्ये पेट्रोलचे व डिझेलचे भाव नियंत्रणात आहेत परंतू आपल्या भारतात हे दिवसें दिवस नवीन उंची गाठताना आपल्याला दिसतात. वाहनाचा शोध हजारो वर्षां पूर्वी मानवाने दळण वळणासाठी लावला. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान अथवा स्वतः जाण्यासाठी वाहनाचा वापर केला जायचा.

मात्र आता प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचे एक खाजगी वाहन असतेच. आता कोणी ही रस्त्यावर पाय ठेवत नाही. होय पाच मिनिटे देखील आपण गाडीशिवाय कुठे जात नाहीत. आपल्या सर्वांना माहित आहे गाडी ही पेट्रोल अथवा डिझेल वर धावते. गाडीची परिस्थिती चांगली असेल महिन्याला तुम्ही गॅरेज मध्ये जावून तिचा रेग्युलर जनरल चेक अप करत असाल तर गाडी कमी पेट्रोल मध्ये जास्त अंतर कापू शकते आणि सोबतच गाडीची चांगली कंडिशन म्हणजे परिसरात प्रदूषणाची मात्रा कमीत कमी होत असते. याच्या अगदी उलट म्हणजे जर गाडी नीट नसेल तर पेट्रोल देखील जास्त खाते व परिसरात जास्त प्रमाणात कार्बन मोनो ऑक्साइड जास्त सोडला जातो.

पेट्रोल भरण्यासाठी आपण पेट्रोल पंपावर जातो. तुम्ही पेट्रोल भरताना सर्वात आधी मशीन मध्ये काय पाहता..? याचे उत्तर सहाजिकच आहे की आपण सर्वात आधी पाहतो की मशीन 0 वर आहे की नाही. होय पेट्रोल भरताना याचे भान असणे फार महत्त्वाचे आहे. मात्र पेट्रोल पंपावर अजून ही काही गोष्टी पाहणे फार महत्त्वाचे आहे. आज आपण या लेखात याच काही गोष्टींचा आढावा घेणार आहोत.

हे वाचा:   कधीही आपला जीवनसाथी निवडताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल.!

गाडीत पेट्रोल टाकताना या घटकात बाबत सर्वांना माहित असेलच पाहिजे. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. म्हणूनच हा लेख अगदी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. मित्रांनो पेट्रोल भरताना पेट्रोलची घनता म्हणजेच डेंसिटी पाहणे फार गरजेचे आहे. आपण या गोष्टीकडे कधीच लक्ष्य देत नाही. मशीन वर 0 असणे तर आवश्यक आहे मात्र जर तुम्हाला योग्य डेंसिटीचे पेट्रोल उपलब्ध होत नसेल तर काहीच दिवसात तुमच्या गाडीचे इंजिन हळू हळू खराब होते व गाडी सारखी बंद पडू लागते.

मित्रांनो अनेकांना या बाबत काहीच माहिती नसते पण आपल्या सरकारने देखील पेट्रोलच्या व डिझेलच्या घनतेचे एक युनिट फिक्स केलेल आहेत. डेंसिटी म्हणजे याचा थेट संबंध हा पेट्रोल अथवा डिझेलच्या शुद्धतेशी येतो. मग विचार करा 110 रुपये लीटर एवढे महाग पेट्रोल आपण आपल्या गाडीत भरतो आणि जर ते शुद्धच नसेल तर ही आपली निव्वळ फसवणूक आहे.

मित्रांनो आता पाहूया आपण आपल्या वाहनात टाकत असलेल्या पेट्रोल तसेच डिझेलची डेंसिटी कशी चेक करावी. डेंसिटी म्हणजे पदार्थाचा घट्टपणा. कोणत्या ही पदार्थात घट्टपणा हा त्यात असणार्‍या घटकांमुळे तयार होतो. जर यात असणारे बेसिक आणि ॲडीटीव्हस जर योग्य प्रमाणात असतील तर पदार्थ योग्य व घट्ट तयार होतो. यात कोणत्या ही प्रकारची अशुद्धता राहत नाही तसेच यात कोणत्या ही प्रकारची भेसळ केली गेलेली नसते. पेट्रोल किंवा डिझेलचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी अशी भेसळ केली जाते.

हे वाचा:   इंटरव्ह्यू मध्ये विचारला विचित्र प्रश्न, शरीराचा असा कोणता अवयव आहे ज्याला घाम येत नाही.!

म्हणून पेट्रोल भरताना डेंसिटीची नक्कीच पडताळणी करा. पेट्रोलची डेंसिटी ही 730 ते 800 क्युबिक पर मि.ली. मिटर असते आणि डिझेलची डेंसिटी ही 830 ते 900 क्युबिक पर मि.ली. मिटर असते. आता तुम्ही विचार करत असाल की पदार्थांच्या डेंसिटी मध्ये 70 क्युबिक पर मि.ली. मिटर एवढा फरक का असतो..? याचे कारण म्हणजे तापमानातील बदल असतो. तापमान जर जास्त असेल तर पदार्थांच्या डेंसिटी मध्ये पातळपणा येतो.

मात्र भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल आपण आपल्या गाडीत टाकत असाल तर याने तुमच्या गाडीचे आरोग्य लवकरच विस्कळीत होऊ शकते. असे वाहन आपल्या आजू बाजूच्या परिसरातसाठी देखील खूपच हानिकारक असते. म्हणून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अथवा डिझेल भरताना मशीन वर असलेल्या अंकांसोबत डेंसिटीची तपासणी करणे विसरू नका.