एकदा नक्की करून पहा विजेचे बिल कमी करण्याचे हे उपाय, दुप्पट पैसा वाचेल.!

सामान्य ज्ञान

आजच्या काळात अन्न वस्त्र निवारा आणि वीज हे या अतिमहत्त्वाच्या गरजा मानल्या जातात. आजकाल इलेक्ट्रिक वस्तुंचा व उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे मानवी जीवन सुकर झाले आहे. आजकाल प्रत्येक कामासाठी विजेचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक उपकरणांमुळे आपले जीवन आरामदायी व सुसह्य झाले आहे.

मात्र इलेक्ट्रिक साधनांचा वापर केल्यामुळे आपल्याला भरपूर वीजबिल येते. आपल्याला सरकारने ठरवून दिलेला युनीट दर तर कमी करता येत नाही, मात्र विजेचा वापर करताना काय काळजी घेता येईल हे तर आपल्याच हातात आहे.

खूप जास्त वीजबिल आल्यामुळे आपल्याला टेन्शन येते, मात्र वीज बिल येण्याची कारणे आपण शोधत नाही. आपल्या वीज वापराच्या काही वाईट सवयी असतात ज्यामुळे वीज बिल वाढते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे वीज बिल कमी करण्यासाठी कोणत्या सवयी किंवा कोणते उपाय करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

एलईडी लाईटचा वापर – जर आपल्याला विज बिल कमी हवे असेल तर सगळ्यात अगोदर आपण घरात वापरणारे बल्ब, ट्युब्स बदलून त्या जागी आधुनिक एलईडी लाईटचा वापर करावा. एलईडी बल्ब थोडेसे महाग असतात, मात्र यांचा वापर केल्यामुळे विजेची बचत होते.

हे वाचा:   लोकांच्या बोलण्यावरूनच त्यांना ओळखा लोक स्वार्थी आहेत की निस्वार्थी.!

एअर कंडिशनरची सर्विसिंग – उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या घरातील एसीची सर्विसिंग करून घ्यावी, तसेच तापमानाची सेटिंग करून घ्यावी. त्यामुळे आपल्याला एसीच्या वापरामुळे बिल कमी येईल.

घरामध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था करणे – जर आपल्या घरामध्ये हवा खेळती नसेल व सुर्यप्रकाश नीट येत नसेल तर आपल्याला दिवसभर पंखा व लाईट लावून बसावे लागते. याकरता घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळती राहील अशा प्रकारे दारे व खिडक्यांची व्यवस्था करावी.

वॉशिंग मशीन – वॉशिंग मशिनचा पुन्हा पुन्हा वापर केल्यामुळे वाशिंग मशीन आपल्या क्षमतेपेक्षा जास्त लाईट वापरते. ज्यामुळे लाईट बिल वाढते.क्षमतेनुसारच वॉशिंग मशिन वापरावे.

प्लंबिंग – जर आपल्या घरातील कोणत्याही पाण्याचा पाईप लिक असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा, कारण लिक असलेल्या पाईप मुळे पुन्हा- पुन्हा पाणी कमी होते व आपण ऊठसूट पाण्याची मोटर लावतो. पाण्याच्या मोटरमुळे वीज जास्त खर्च होते. ज्यामुळे आपले वीज बिल वाढते.

हे वाचा:   जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांमध्ये नेमका काय फरक असतो.? फक्त १% लोकांनाच माहितेय हे सत्य.!

सौर ऊर्जेच्या उपकरणांचा वापर करणे – तसे पाहिले तर सोलर उर्जेवर चालणारी उपकरणे खूपच महागडी असतात. मात्र या उपकरणांमुळे आपला विजेचा वापर कमी होईल व अर्धीच वीज आपण वापरू त्यामुळे विजेचे बिल देखील कमी येईल.

घरातल्या लाइट्स बंद करणे – जर आपल्याला घरात विजेचा काही वापर करायचा नसेल तर लाईटचा स्विच बंद करणे योग्य असते. कारण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना अगोदरच्या खोलीतील लाईट बंद करावी. बरेचदा आपण वापर नसतानादेखील लाइट पंखे चालू ठेवतो त्यामुळे वीजबिल वाढते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *