एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन केल्यास काय होत असते? अनेकांना हे माहिती नाही.!

आरोग्य

अनेकदा आपल्याला डॉक्टरांकडून सांगितले जाते की एक्सपायर झालेले कोणतेही औषध कधीही खाल्ले नाही पाहिजे. त्यामुळे आपण अनेक वेळा मेडिकल मधून औषधे गोळ्या घेत असतो तेव्हा त्यावर असलेली एक्सपायरी डेट पाहूनच घेत असतो. जर गोळ्यांवरील एक्सपायरी डेट झालेले असेल तर असे औषध आपण घेत नाही तसेच असे औषधे घेतले देखील नाही पाहिजे.

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की अशा प्रकारे एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन केले तर नेमके काय होत असते. जर एखादा व्यक्ती एक्सपायर झालेला गोळ्या किंवा औषधे खाईल तेव्हा नेमके काय घडेल. अनेकांना याबाबतची कोणतीही माहिती नसते आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला ही सर्व माहिती सांगणार आहोत.

गोळ्या औषधांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल मॉलिक्युल असतात जे आपल्या शरीरावर कार्य करत असतात. परंतु या मॉलिक्युल ची देखील लाइफ असते तसेच कार्यकाळ असते. कोणत्याही प्रकारचे औषधे जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये बनवले जातात तेव्हा त्याची पोटेन्सी टेस्ट घेतली जाते. या टेस्टद्वारे त्यांना हे समजत असते की ते औषध या काळानंतर काम करणे बंद करणार आहे.

हे वाचा:   रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन काजू खाऊन झोपा; एका आठवड्यामध्ये शरीरामध्ये झालेला फरक पाहून हैराण व्हाल.!

आपल्याला एक्सपायर झालेले गोळ्या औषधे खाण्यास का मनाई केली जाते कारण असे सांगितले जाते की अशा गोळ्यांमध्ये फक्त 25 टक्केच कार्य करण्याची क्षमता उरत असते. याचा असा अर्थ आहे की या गोळ्या औषधांचा साईड-इफेक्ट खूप जास्त होऊ शकतो. यामागे हेच कारण असते म्हणून एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन आपण टाळायला हवे.

असे अनेक औषधे देखील असतात जे एक्सपायर झाल्यानंतर टॉक्सिक म्हणजेच विष बनत असतात. एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन केल्याने अनेकांची जीवदेखील गेले आहेत. त्यामुळे तुम्ही एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन करणे टाळा. मेडिकल मधून जेव्हा आपण गोळ्या औषधे खरेदी कराल त्यावर असलेली एक्सपायर डेट नक्की बघत जा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *