जेवण केल्यावर योग्य पचन होत नाही.? आजच करा हे जबरदस्त उपाय.! खाल्ल्यानंतर लगेच बाथरूम ला जाणारे एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. मानवाला जगण्यासाठी अन्नाची फार गरज असते. मात्र चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध व पौष्टिक अन्न ग्रहण करणे गरजेचे आहे. या धावत्या जगात माणसाकडे वेळ नसतो व त्याला फास्ट फूड खाण्याची सवय लागते. हे अन्न खाण्यास रुचकर जरी असले तरी ही आपल्या पाचन तंत्रावर याचे वाईट परिणाम दिसून येतात. खाण्याच्या चुकीच्या पद्धतीने जसे जास्त खाणे, जास्त मसालेदार पदार्थ खाणे, तळलेले पदार्थ खाणे.

बाहेरचे जंकफूड खाणे, चुकीच्या पद्धतीने खाणे या सगळ्यामुळे आपल्या पचनावर वाईट परिणाम होतो आणि आपले पाचन हळूहळू खराब होऊ लागते. यामुळे आपल्याला जेवण पचवण्यात समस्या येतात. या समस्येला आपण अपचन असेही म्हणतो. अपचनाची समस्या एकदा व्हायला सुरू झाली की त्यानंतर अनेक आजार आपोआपच होऊ लागतात. जस एलर्जी, ऑर्थराईट्स, ऑटो इम्यून डीसिज, स्किन इन्फेक्शन, पिंपल्स, थकवा, मूड डिसऑर्डर, पोटामध्ये गॅस होते, अल्सर, भूक न लागणे, कफ, उलटी येणे.

पोट दुःखी व पोट नेहमी भारी वाटणे. जर तुम्ही देखील या समस्यांपासून त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे चला तर जाणून घेऊया हा उपाय. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे आपल्याला अपचनाची समस्या होते. झोप पूर्ण न झाल्याने व जास्त तणावामुळे सुद्धा आपली पचनसंस्था खराब होते. जास्त गरम पाणी पिणे व जास्त थंड पाणी पिणे यामुळेही पचनसंस्थेवर परिणाम होतो.

ज्यामुळे आपल्याला जेवण पचण्यात समस्या येते. जेवणामध्ये जास्त फायबर आणि साखरेच प्रमाण जास्त असल्याने आपल्याला अपचनाची समस्या होते. पोषक त तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते यामुळेही अपचानाची समस्या होते. एकदा आपल्याला अपचनाचा त्रास होऊ लागला की आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेऊ लागतो ज्यामधे ॲसप्रिन व प्रिलोसेक चे प्रमाण जास्त असत जे आपल्या पचनसंस्थेसाठी हानिकारक असते.

हे वाचा:   सलग सात दिवस रात्री झोपते वेळी अशाप्रकारे गुळ खाल्ल्यानंतर जे झाले ते आश्चर्यकारक होते.! जाणून घ्या गुळ सेवनाचे फायदे..!

त्यासाठी केमिकल वाली औषधे न घेता आयुर्वेद पद्धतीने उपाय करावा. मित्रांनो आता जाऊन घेऊया आपल्या पचनसंस्थेला सुरळीत कार्य करण्यासाठी काय लागते किंवा कशाची आवश्यकता असते. आपल्या पोटामध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या पाचशे प्रजाती आहेत जे अन्न पचवण्यात मदत करतात. त्याचबरोबर या बॅक्टेरिया हार्मोन्सना संतुलित ठेवण्यातही मदत करतात व टॉक्सिंसना शरीराच्या बाहेर काढतात.

आपल्याला अपचनाचा त्रास तेव्हा होतो जेव्हा आपल्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण कमी होऊन वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. असे झाल्यानंतर आपल्याला पोटाचे विकार होऊ लागतात.
मित्रांनो आता जाऊन घेऊया आपल्या पचनसंस्थेला सुरळीत कार्य करण्यासाठी उपयोगी घरगुती उपाय. जे आपल्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवते होऊन वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण कमी करते व आपल्या अपचनाच्या समस्या दूर करतात.

पहिला उपाय आहे बडीशेप. आपल्याला जेवणानंतर बडीशेप आणि गुळाचे सेवन करायचे आहे. आपल्याला हवं तर आपण बडीशेपचा काढा करून पिऊ शकता यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होतात. मित्रांनो दुसऱ्या उपायमधे दह्याचा वापर करायचं आहे. दह्यामध्ये ओवा टाकून खाल्ल्याने फक्त अपचनाचीच समस्या दूर होत नाही तर यामुळे आपली पचनसंस्थासुद्धा सुरळीत ठेवते. त्याचबरोबर दह्यामध्ये जिरेपूड, काळे मीठ व काळी मिरी टाकून सुद्धा याचे सेवन करू शकता.

यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात जे अन्नाला लवकर पचवण्याासाठी मदत करतात. यामुळे खाल्लेलं आपल्या शरीराला लागतं. तिसऱ्या उपयासाठी आपल्याला अननसाच्या तुकड्यावर काळ मीठ व काळी मिरी पावडर टाकून त्याचे सेवन करायचे आहे. चौथ्या उपयसाठी आपल्याला एक कांदा कापून त्यावर लिंबाचा रस लावून रोज जेवणासोबत खायचे आहे. परंतु रात्री कांदा खाऊ नये.

हे वाचा:   शुगरच्या गोळ्या खाणारे लोक आता या फळाने अनेक लोकांना शुगर मुक्त केले आहे.! त्यासाठी करावे लागते हे एक काम.!

पाचव्या उपायसाठी एक चमचा ओवा घेऊन त्याची पावडर करायची आहे आणि त्यामधे थोडस सेंधव मीठ मिक्स करून रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने आपल्याला खूप फायदा होतो व या उपायामुळे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आपली भूक देखील वाढते. पाचव्या उपयासाठी आपल्याला दोन लवंग घेऊन त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि अर्ध्या कप पाण्यामधे टाकून ते उकळवून घ्यायचे आहे व थंड झाल्यावर ते प्यायचे आहे.

हा उपाय रोज केल्याने आपल्या पचनाशी संबंधित बऱ्याच समस्या निघून जातील. मित्रांनो हे सर्व उपाय घरगुती आहेत. यामधे कोणत्याही केमिकल पदार्थाचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे आपल्या पचनसंस्थेला किंवा शरीराला यामधील एकाही उपायामुळे हानी होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला पचनासंबंधी त्रास असतील तर यामधील एकतरी उपाय नक्की करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.