तुम्ही अनेकदा काही ठिकाणी एखाद्याच्या अंगात देवी साकारलेली बघितलीच असेल. अंगात देवी संचारण्याचे हे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले तसेच पाहिले सुद्धा असेल. परंतु खरच अंगात देवी किंवा देवता अंगात संचारत असते का? हा प्रश्न नेहमी आपल्या मनात असतो.
अंगात देवी देवता संचार करणे किंवा अंगात येणे यामागे खरे तर विज्ञान आहे. हे सर्व विज्ञानाच्या काही गोष्टी मुळे होत असते. यामागे नेमके कोणते कारण असते हे आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. आमचा या लेखाद्वारे धार्मिकतेला किंवा धार्मिक भावना दुखवण्याचा उद्देश नाही.
विज्ञान या अशा घटनांना मेंटल डिसऑर्डर मानतात. मेडिकल भाषेत विचार केला तर या आजाराला ‘स्कीझोफरेनिया’ असे म्हटले जाते. हा आजार ज्या व्यक्तीला होत असतो त्या व्यक्तीच्या मनाभोवती हा विचार सुरू होतो की आता देव माझ्या अंगात संचरणार आहे.
हे असे त्या लोकांमध्ये दिसून आले आहे की जे लोक पूजापाठ मध्ये जास्त विश्वास ठेवतात. सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की अंगात देवी येणे काय आहे? तर अशा लोकांना असे वाटत असते की आता माझ्या अंगात देवी देवता संचारली आहे. आणि आता मीच देवी किंवा देवता आहे.
असे होऊ लागल्यानंतर तेथे हे लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना करू लागतात. विचित्र हावभाव करू लागतात. हे तुम्ही अनेक ठिकाणी आणि अनेक वेळा बघितले असेल आणि महत्वाचे म्हणजे हे केवळ एकाच धर्मा पुरते मर्यादित नसून बऱ्याचशा धर्मात हे घडताना दिसत असते.
बरेचसे लोक यावर विश्वास ठेवतात पण बरेचसे लोक यावर विश्वास ठेवत नाही. डॉक्टरांचे तर म्हणणे आहे की हे एक सायकॉलॉजीकल डिसऑर्डर आहे. याबरोबरच असे सांगितले जाते की याचा वेळेत उपचार करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.