का काही लोक गरीब राहतात व काही लोक खूप श्रीमंत होतात.? महालक्ष्मीने इंद्राला दिलेले उत्तर.!

अध्यात्म

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व मानसन्मान वाढत रहावा व आपल्यावर महालक्ष्मी मातेची अनंत कृपा राहावी असे सगळ्यांना वाटत असते. प्रत्येक जण महालक्ष्मी मातेची आराधना करत असतो व तिला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साकडे घालत असतो. असे असले तरीही आपण आपल्या समाजामध्ये व आजूबाजूला बघतो काही लोक अगदी गडगंज श्रीमंत आहेत तर काही लोक दारिद्र्यामध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आयुष्य काढत आहेत.

जर सर्वच लोक महालक्ष्मी मातेची आराधना करतात तर असा भेदभाव का असतो.? या प्रश्नाबद्दल विचारपूस करण्यासाठी इंद्रदेव स्वतः महालक्ष्मी मातेकडे गेले व त्यांनी मातेला प्रश्न विचारला की, ‘जर सगळेजण तुमची मनोभावे पूजा करतात, तर काही लोक अतिशय गरीब व काही लोक खूप श्रीमंत कसे काय बनत असतात?’ असे का होते.?

यावर महालक्ष्मी मातेने दिलेले उत्तर तुम्हाला सांगायचे आहे,महालक्ष्मी मातेने इंद्र देवांना सांगितले की, “व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील श्रीमंती किंवा गरिबी ही त्याच्या कर्मामुळे व त्याच्या संचितामुळे मिळत असते.

हे वाचा:   नवरात्राचे नऊ दिवस कांदा आणि लसूण खाऊ नये, पण का? काय असते असे यात.?

सर्व लोक महालक्ष्मीची पूजा मनोभावे करतात, मात्र काही लोकांच्या नशिबी गरिबी व काही लोकांच्या नशिबी ऐश्वर्य येते. याचे एकमेव कारण म्हणजे ज्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते, कुटुंबातील लोक एकमेकांचा सन्मान करतात व घरामध्ये सर्वजण गोडीगुलाबीने एकत्र राहतात.

कुठलाही वाद होत नाही, अशा घरांमध्ये चैतन्य रूपाने राहण्यास महालक्ष्मीला आवडते. मात्र काही लोक महालक्ष्मीची आराधना करतात. परंतु त्यांच्या घरामध्ये कायमच कलह भांडण वाद-विवाद तंटे होत असतात अशा कलह पूर्ण घरांमध्ये महालक्ष्मी कधीही थांबत नाही.

महालक्ष्मी मातेने हे देखील सांगितले की, अन्नाच्या रुपामध्ये देखील महालक्ष्मी असतात. मात्र काही लोक जेवताना भांडण झाले तर अन्नावर राग काढून जेवणाच्या थाळीला लाथ मारतात किंवा जेवण वाया घालवतात. अशा लोकांचा महालक्ष्मीला राग येतो व त्यांच्यावर महालक्ष्मीची अपकृपा होते.

जे लोक धनाचा अपव्यय करत नाही व सत्कारणी धनाचा वापर करतात, त्या लोकांना महालक्ष्मी कधीही काहीही कमी पडू देत नाही. मात्र जे लोक चुकीच्या कामासाठी पैशाचा अपव्यय करतात व पैसा वारेमाप उधळतात, अशा लोकांवर महालक्ष्मी नाराज होते.

हे वाचा:   घरात या दिशेला काढा स्वास्तिक..पैश्यांनी घर भरून जाईल..घरात सैदव सुखशांती राहील.!

जुगारी, व्यसनी लोक पैशाची उधळपट्टी करतात, त्यामुळे त्यांच्याकडील लक्ष्मी हळूहळू कमी होते व त्यांची परिस्थिती गरीबीची होते. धनाची देवता असलेली महालक्ष्मी ही व्यक्तीच्या वागण्यावर व व्यवहारावर देखील त्यांच्यावर कृपा बरसवत असते.

जर व्यक्तीच्या मनामध्ये सहज भाव  सरळ व निर्मळ असेल तर महालक्ष्मी माता त्याच्यावर प्रसन्न राहिल्याशिवाय राहत नाही. मात्र जे लोक पैशाचा अपव्यय करतात व पैशाचा वापर गैरकामांसाठी करतात त्या लोकांवर महालक्ष्मीची अपकृपा होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *