सावधान…! तुम्ही मीठ म्हणून प्लास्टिक तर खात नाही ना, जीवाचे हाल होण्याआधी एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

दररोज आपण जेवण तर करतच असतो, कोणताही पदार्थ असला तरी त्यात मीठ हे टाकावेच लागत असते. जर आपण दिवसभरात काही गोड खाल्ले नसेल तर एकवेळ चालते पण जर अन्नात मीठ नसेल तर त्याची कमतरता खूप चुकते. मीठाचे महत्त्व केवळ अन्नापुरते मर्यादित नाही, तर आरोग्यासाठीही ते खूप महत्वाचे आहे. आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक खाद्यपदार्थात भेसळ होत आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे.

मीठ देखील या भेसळीला अपवाद नाही. नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च, तामिळनाडू यांनी केलेल्या अभ्यासानुसार, 100 ते 200 प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स अन्न मीठात आढळले आहेत. मायक्रोप्लास्टिक्स प्रत्यक्षात खूप लहान कण किंवा प्लास्टिकचे तुकडे असतात. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार पाच मिलिमीटरपेक्षा कमी आहे. वातावरणातील प्रदूषणामुळे ते हवेत असतात. नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च तामिळनाडूने संशोधनासाठी गुजरात आणि तामिळनाडू येथून मीठाचे नमुने घेतले होते.

हे वाचा:   कोण म्हणते की तीळ आणि म्हस कायमची जात नाही.! त्यासाठी करावा लागतो असा उपाय.! कुठल्याही ठिकाणी असू द्या म्हस जाणार म्हणजे जाणार.!

संशोधनानुसार, गुजरातमधून घेतलेल्या 200 ग्रॅम मीठाच्या नमुन्यात मायक्रोप्लास्टिकचे सुमारे 46-115 कण सापडले आहेत. त्याचवेळी, तामिळनाडूमधून घेतलेल्या 200 ग्रॅम मीठाच्या नमुन्यात सुमारे 23-110 मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत. पॉलीथिलीन, पॉलिस्टर आणि पॉलीविनाइल क्लोराईड सारखी अत्यंत धोकादायक रसायने देखील या नमुन्यांमध्ये आढळली आहेत, जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चच्या सहाय्यक प्राध्यापक विद्या साकर यांनी सांगितले आहे की, संपूर्ण संशोधनात सापडलेले कण शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. मीठ खरेदी करत असताना चांगल्या प्रतीचे मीठ खरेदी करावे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   कापूराचा एक तुकडा अनेक आजारांवर भारी ठरतो.! अनेक लोकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा बघून थक्क होऊन जातात.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *