आज-काल एक समस्या खूप वेग धारण करत आहे ही समस्या सामान्य असली तरी यामुळे अनेक शारीरिक त्रास निर्माण होत असतो. ही समस्या आहे सांधेदुखी, कंबर दुखी, पाठ दुखी, या अगोदर ही समस्या फक्त वृद्ध नागरिकांमध्ये दिसून येत असे. परंतु आता च्या काळामध्ये ही समस्या अगदी तिशीच्या पुरुषांमध्ये व महिलांमध्ये दिसून येऊ लागली आहे.
आपल्याला कधीकधी चालावे वाटत नाही, एखाद्या ठीकाणी पायर्या चढू वाटत नाही, कोणतेही काम करू वाटत नाही, अंगदुखी दररोज सतावत राहते, गुडघे हात कंबर या ठिकाणी सूज आलेली असेल. ज्या ठिकाणी जोड आहे त्या ठिकाणी त्रास होत आहे. असे काही तुमच्या बरोबरही होत असेल तर ही खूपच चिंताजनक बाब आहे.
अनेक लोक यासाठी वेगवेगळ्या दवाखान्यात जात असतात. वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार करून बघतात. वेगवेगळ्या प्रकारचे तेल यासाठी वापरले जाते. जेणेकरून सांधे दुखी कंबर दुखी चा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. परंतु काही वेळा याचा काहीच फायदा होत नाही. त्रास हा दिवसेंदिवस वाढला जातो.
आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या सर्व समस्यांवर एक खूपच सोपा व साधा सोपा उपाय सांगणार आहोत. हा उपाय अतिशय सोपा असून घरी सहजपणे केला जाऊ शकतो. यामुळे वरील सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होतील. शरीरामध्ये होणारा सर्व त्रास यामुळे नष्ट होईल.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोण कोणत्या पदार्थांची आवश्यकता भासेल हे जाणून घेऊया. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम मेथीदाणे लागणार आहे व 100 ग्रॅम हळकुंड लागेल व 100 ग्रॅम सुंठ लागेल. या तिन्ही पदार्थांना चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यावे. या तिन्ही पदार्थांना बारीक अतिशय पावडर सारखे बनवून घ्यावे.
याचे सेवन सकाळी व सायंकाळी दुधाबरोबर करायचे आहे. केवळ एक चमचा पावडर ही दुधामध्ये एकत्र करून मग त्याचे सेवन करायचे आहे. दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला याचा परिणाम दिसून येऊ लागेल. शरीरामध्ये निर्माण होणारा सर्व त्रास यामुळे नष्ट झालेला दिसेल. हा उपाय खूपच लाभदायक उपाय असणार आहे.