पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूला खूपच मच्छर होत असतात. याचे विविध कारणे असू शकतात. घराच्या आजूबाजूला खूपच जास्त प्रमाणात गवत उगले जाते. यामुळे देखील घरात मच्छर येऊ शकतात व आपल्याला तसेच घरामध्ये असलेल्या लहान मुलांना, ज्येष्ठ नागिकांना आजारी बनवू शकतात. अनेक वेळा पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूला काही असे भांडे किंवा वस्तू ठेवलेले असतात त्यामध्ये पाणी साचले जात असते.
या भांड्यामध्ये काही काळानंतर बारीक अळ्या निर्माण होतात. याचा अळ्या पुढे मच्छराचे रूप धारण करून आपल्याला त्रास देण्यास येत असतात. त्यामुळे आपण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. आजूबाजूला जर कोठे पाणी साचले जात असेल तर ते नष्ट करावे. जर करता येत नसेल तर त्या पाण्यामध्ये एक चमचा रॉकेल अथवा पेट्रोल टाकावे. यामुळे साचलेल्या पाण्यातली सर्व अळ्या, कीटक म’रून जातील.
मच्छर चावल्यानंतर शरीरावर काही घाव निर्माण होत असतात. काही लोकांची त्वचा ही खूपच नाजूक असते विशेष करून लहान मुले व महिलांची. यामुळे संपूर्ण शरीरावर काही वेळा लाल रंगाचे पुरळ हे उमटले जात असतात. अशा वेळी आपण नेमके काय करायला हवे हे सुचत नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
डासांच्या चाव्यावर मध लावल्याने सूज आणि खाज कमी होते. मधात अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत जे इतर जखमा देखील बरे करू शकतात. डासांच्या चाव्यावर उपचार करण्यास मध हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु घराबाहेर असताना डासांच्या चाव्यावर मध वापरू नका.
जर तुमच्या घरी एलोवेरा जेल किंवा कोरफड वनस्पती असेल तर खाज थांबवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. डास चावलेल्या ठिकाणी कोरफड जेल वापरा. कोरफड लावल्याने त्या ठिकाणी थंड वाटेल. यामुळे त्वचेवर उमटणारे लाल पुरळ देखील नष्ट होतात. लाल रंगाचे काही फुटकुळ्या मच्छर चावल्यानंतर उमटल्या जात असतात. या देखील यामुळे नष्ट होत असतात.
तुळशीच्या पानांमध्ये एक रसायन असते जे खाजलेल्या भागात आराम मिळवू शकते. तुळशीची वनस्पती पवित्र मानली जाते. ही वनस्पती घरांमध्ये सहज उपलब्ध असते. आपण ताजी पाने बारीक करून डासांच्या चावलेल्या ठिकाणी चोळू शकता. याशिवाय, तुळशीची पाने सुमारे 15 ग्रॅम दोन कप पाण्यात उकळा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात एक कापड बुडवून डासांच्या चाव्याच्या ठिकाणी लावा. असे केल्याने आराम मिळतो.
तर अशाप्रकारे डास चावलेल्या ठिकाणी तुम्ही हे काही उपाय करू शकता. हे उपाय तुम्हाला आवडले का हे कमेंट मध्ये लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.