एका रात्रीत कसलेही दुखणे गेलेच म्हणून समजा, गुडघे, तळपाय, कंबर सर्व काही अगदी झटकन होईल बरे.!

आरोग्य

आता पावसाचे दिवस असल्यामुळे आपण बाहेर फिरत असतो त्यावेळी अचानक कधीतरी आपला पाय मुरगळतो किंवा काहीतरी आपल्या पायाला होते किंवा हात दुखत असेल अशा अनेक गोष्टी घडत असतात. या दिवसांमध्ये थोडेफार वातावरण थंड असल्यामुळे आपले दुखणे जर आपल्याला जास्तच भासते त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्यामुळे आपला हाताचे दुखणे व पायांचे दुखणे कायमचे बरे होईल.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनविण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे. सर्वप्रथम हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला पिठाची गरज भासणार आहे. हे पीठ जर गव्हाचे असेल तर ते अधिक चांगले. या पिठाला मळून एक गोळा करून घ्यायचा आहे.

हा गोळा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे. मध्यम प्रकारे हा पिठाचा गोळा मळून तयार करायचा आहे. त्यानंतर एक कढई किंवा कोणतेही पात्र गॅसवर ठेवून त्यामध्ये मोहरीचे तेल दोन चमचे टाकायचे आहे. तेल टाकून झाल्यावर त्यामध्ये एक ते दोन चमचे ओवा टाकायचा आहे. आपण इथे ओव्याचा वापर यासाठी करत आहोत कारण ओवा आपल्या हाडांच्या दुखण्यासाठी जालीम उपाय आहे.

हे वाचा:   दुधात हा एक पदार्थ टाकून पिल्यास हे सात आजार कायमचे दूर जातात, महिलांनी तर एकदा वाचायलाच हवे.!

त्याचबरोबर राईचे तेल देखील आपल्या दुखण्यावर रामबाण उपाय मानले जाते त्यामुळे हे तेल आपल्याला गरम करायचे आहे. जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर हे तेल आपल्याला त्या भांड्यामध्ये गरम करायचे आहे. दोन ते तीन मिनिटांनंतर यामध्ये दोन चमचे यामध्ये हळद टाकायची आहे. हळद ही अँटिबायोटिक असते त्याचबरोबर हाडांना मजबूत करण्यासाठी आणि ‌आपले दुखणे कमी करण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो.

त्यामुळे दोन चमचे हळद टाकून हे मिश्रण मंद आचेवर थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. हे मिश्रण गरम करून झाल्यानंतर याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. हे मिश्रण अगदी थंड करून घ्यायचे नाही. थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे आणि तोपर्यंत दुसरा एका तव्यावर आपल्याला आपण जो गोळा बनवून तयार केला होता त्या पिठाच्या गोळ्याला गोलाकार पद्धतीने लाटून घेऊन भाजायचे आहे.

आता जेव्हा आपण हा पिठाचा गोळा लाटणार आहोत तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्या पिठाच्या गोळ्याचा आकार आपल्याला एवढा ठेवायचा आहे जेणेकरून समजा आपला गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर लावण्यासाठी तो पुरेल. जर पाय दुखत असेल तर थोडासा लांबट असला पाहिजे या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तशा प्रकारे तो लाटून तयार करायचा आहे आणि तव्यावर त्याला एका बाजूने भाजून घ्यायचे आहे.

हे वाचा:   सगळ्या चुका करा पण ह्या वस्तू खरेदी करण्याची चूक करू नका.! तुम्हाला माहिती आहे का तुम्ही संकटाना देत आहात रोज आमंत्रण.! पण कसे.?

त्यानंतर पांढरी पट्टी घेऊन त्यावर आपल्याला ही भाजून घेतलेली जी पोळी आहे ती ठेवायची आहे आणि त्यावर आपण बनवून घेतलेले मिश्रण टाकायचे आहे. हे मिश्रण टाकल्यावर त्यावर अजून एक चमचा हळद टाकून, सुखी हळद टाकून हे मिश्रण आपल्याला प्रभावित ठिकाणी लावायचे आहे. प्रभावित जागेवर थोडा वेळ शेकायचे आहे आणि नंतर त्या ठिकाणी कपड्याने घट्ट बांधून घ्यायचे आहे. कपडा बांधून झाल्यावर त्यावर आपण एखादी प्लास्टिक पिशवी बांधून घ्यायची आहे.

जेणेकरून रात्री झोपे मध्ये तुमच्या कोणत्या कपड्याला हळद लागणार नाही आणि तुमचे कोणतेच कपडे खराब होणार नाही.हे मिश्रण रात्रभर लावून ठेवायचे आहे आणि सकाळी कापडाची पट्टी काढून टाकायची आहे. तुम्हाला एका वापरामध्येच फरक जाणून येईल. जर पायाला सूज आली असेल, जर पाय दुखत असेल तर ती वेदना देखील कमी होईल. लेखात सांगितलेला उपाय केल्यानंतर थोड्या दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसून येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.