अनेक वेळा दाढ दुखी ची समस्या जाणवल्यानंतर आपण खूपच वीक होऊन जात असतो. कारण दाढ दुखू लागली किंवा दात दुखू लागले तर आपल्याला काहीही खाता येत नाही व यामुळे अन्न पाणी पूर्णपणे बंद होत असते. यामुळे आपल्याला भयंकर असा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे आपण यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतो.
परंतु चिंता करण्याची काही गरज नाही दाढ दुखत असेल तर तुम्ही आता हा छोटासा सोपा असा उपाय करायला हवा. हा उपाय केल्याने तुम्हाला रात्रीतून आराम मिळेल. दाढ दुखत असेल किंवा दात दुखत असेल तसेच दातामध्ये कीड लागलेली असेल तर अशी कीड देखील यामुळे पूर्णपणे नष्ट होत असते. हा उपाय यासाठी पूर्णपणे वाचा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये उपलब्ध असलेली काही पदार्थ घ्यायचे आहे. यापैकी पहिला पदार्थ आहे खाण्याचा चुना. आपल्याला हा उपाय करण्यासाठी खाण्याचा चुना थोडासा घ्यायचा आहे. याबरोबरच यामध्ये थोडीशी तुरटी देखील घ्यायची आहे. तुरटी चे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे सांगितले जातात.
दात दुखी च्या समस्येसाठी तुरटी फारच उपयुक्त ठरेल म्हणून आपल्याला या उपायासाठी थोडीशी तुरटी देखील घ्यायची आहे. हे दोन्ही पदार्थ बारीक करावे व त्यानंतर याला एकत्र करून घ्यावे. यामध्ये थोडेसे पाणी टाकावे. पाणी टाकत असताना याची काळजी घ्यावी की ही पेस्ट खूप पातळ होणार नाही. याची थोडीशी पेस्ट बनवून घ्यावी.
आता एक कापसाचा बोळा घेऊन तो बोळा या मिश्रणामध्ये बुडवायचा आहे. त्यानंतर किडलेल्या दातावर ठेवायचा आहे व तोंडातून लाळ खाली काढायची आहे. असे केल्याने दातामध्ये असलेली ठणक कीड पूर्णपणे नष्ट होत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.