नमस्कार मित्रांनो, जस की आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मेंदू आपल्या पूर्ण शरीराला कंट्रोल करतो त्याचप्रमाणे शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हृदयाची आवश्यकता आहे. हृदय आपल्या शरीराचा असा अवयव आहे जो आपल्या जन्मापासून आपल्या शेवटपर्यंत कार्यरत असतो. हृदयाचे धडधडनं थांबलं की आपला शेवट जवळ येतो. पण आपण हृदयाचे काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅक यायला वेळ लागत नाही.
आजकाल दर वर्षी जगातील ७ दशलक्ष लोकं हा हार्ट अटॅक आणि ह्रदय संबंधित आजारांनी मृत्यू पावत आहेत. अशात तुम्ही कधी विचार केलाय का, का येत असेल हृदय विकाराचा झटका? याचं यायचं नेमक कारण काय आहे? नसेल केला तरी हरकत नाही. या लेखात आपण हार्ट अटॅक संबधी माहिती घेणार आहोत जे जाणून तुम्ही हैराण व्हाल.
हृदयाचं खरं काम ऑक्सिजनेड रक्त पुरवठा शरीराला करण्याचं असत. हृदय शरीरातून नॉर्मल रक्त गोळा करते आणि आकुंचन व प्रसरण (पंप ) करून ऑक्सिजनेटेड रक्ताचा पुरवठा करते. परंतु याच्या कार्यात काही बिघाड झाल्यास माणसाचं आरोग्याला उतरती कळा लागते. सगळं ठीक आपण थोडा वेळ जरी श्वास रोखून धरला तरी आपला मृ’त्यू जवळ येतो. अशात ज्या लोकांना हृदय विकरांनी श्वास गुदमरण्याचा त्रास होतो त्यांचं काय होतं असेल?
मित्रांनो हृदयाकडे वेळीच लक्ष देणं खूप गरजेचे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायूला त्याच योग्य अचूक काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आपलं हृदय सुद्धा एकप्रकारे एक स्नायूच आहे. म्हणून हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा हार्ट अटॅक येतो त्यावेळी हृदयात स्नायूना ऑक्सिजन मिळत नाही आणि म्हूणन हृदयाच कार्य थांबत.
तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की हृदयविकाराच्या झटके दरम्यान हा रक्त पुरवठा कसा थांबतो? शरीराला ऑक्सिजन नेटेड रक्तपुरवठा करणाऱ्या वेसल्स ना धमन्या(artery )म्हणतात. इतर अवयवानं प्रमाणे हृदयाला सुद्धा ऑक्सिजनेड रक्त लागते.हे रक्त हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे पुरविले जाते.
जेव्हा आपण जास्त जेवण करतो किंवा असं अन्न खातो ज्यात लिपिड जास्त असते.
परिणामी,आपल्या कॉरोनरी मध्ये ऍसिड आणि लिपिड जमा होतात ज्या मुळे त्यात ब्लॉकेज यायला सुरुवात होते. जसंजस आपलं वय वाढत आणि आपण अन्नाचा खुराक वाढवतो तसंतस या ब्लॉकेजेस मध्ये वाढ होते. मित्रांनो तुम्ही असा विचार करू नका की तुमच्या Coronary Artery मध्ये एक प्रकाचे ब्लॉकेज तयार नसेल होत. आपल्याही शरीरात असे ब्लॉकेजेस असतील पण त्याची वाढ आपल्या उलटसुलट खाण्यावर अवलंबून असते.
तुम्ही बघितलं असेल जेवढे पण जाड-लठ्ठ लोकं असतात, जे उलट सुलट खातात त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. आपण अमेरिकन कल्चर बघितलं तर ते आपल्या प्रमाणे डाळ- भात, चपाती,भाजी खात नाहीत. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट पिझ्झा बर्गर ने होते. म्हणूनच या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते.
त्यांच्या करणाऱ्या coronary artery मध्ये ब्लॉकेज व्हायला सुरुवात होते ज्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होत नाही. आणि जेव्हा हे ब्लॉकेजेस वाढतात त्याचा परिणाम हा हार्ट अटॅक मध्ये दिसून येतो. पाण्याला अडवलं तर ते काही वेळापूरते अडवलं जात पण नंतर आपला रस्ता बनवतं, त्याचप्रमाणे रक्त पण आहे. जे छोट्या-छोट्या ब्लॉकेजेस असले तरी आपला रस्ता शोधते. पण समस्या अशी आहे की ते किती वेळात रस्ता बनवू शकते.
कारण जर ब्लॉकेज मुळे कमी रक्त हृदयाकडे पोहोचलं तर सौम्य हृदय विकाराचा झटक्या (minor heart attack) ची समस्या होऊ शकते. ज्यामुळे जीव तर जात नाही पण हे जास्त वेळ सुरु राहिले तर ब्लॉकेजेस वाढू शकतात त्यामुळे रक्त अजिबातच हृदयापर्यंत पोहोचतच नाही परिणामी माणसाला त्याचा जीव गमवावा लागू शकतो. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक ची काही लक्षण सांगणार आहोत ज्यामुळे आपण सतर्क राहाल.
सतत छातीत दुखणं. गॅस झाला समजून आपण दुर्लक्ष करू शकतो पण सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं. लवकर थकवा येणं. हार्ट अटॅक इतका अचानकपणे येत नाही जितका चित्रपटातून आपण बघतो. चक्कर येणं हे ही एक लक्षण आहे. मित्रांनो डायबेटिस च्या कोणत्याही रोग्यामध्ये हार्ट अटॅक चे लक्षणं बघायला मिळत नाही. हार्ट अटॅक च्या उपचारासाठी अस्पिरिन नायट्रोग्लीसरीन औषधांचा वापर होतो.
अस्पिरिन रक्त पातळ करते. जेणेकरून ब्लॉकेज होतच असतील तर रक्त पातळ असल्याकारणाने ते हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आपला रस्ता बनवू शकेल. नायट्रोग्लिसरीन ब्लॉकेज ओपन करण्याचं काम करतात. हार्ट अटॅक वर इलाज करण्यासाठी डॉक्टर सर्वप्रथम ईसीजी चा वापर करतात. Electro cardio graph -ECG. हे एक असे यंत्र आहे की ज्यामुळे हृदयाच कार्यावर लक्ष ठेवता येते. डॉक्टर रक्त तपासणी करायला सांगतात.
ज्यामुळे प्रॉब्लेम समजून उपचार लवकर करता येतील. हार्ट अटॅक उपचारांमध्ये डॉक्टर फुग्याच्या मदतीने ब्लॉकेजेस कमी करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे coronary artery पूर्ववत ओपन होतात. काही केसेस मध्ये डॉक्टर हृदय विकाराच्या पेशंट ला वाचवण्यासाठी मेटल – पॉलिमर ने बनवलेला स्टॅन्ड सुद्धा पेशन्ट च्या coronary artery मध्ये टाकतात, जेणेकरून ते ओपन होईल. काही क्रिटिकल coronary artery केसेसमध्ये पेशंटची बायपास सर्जरी करावी लागते.
ज्यामध्ये पेशंटच्या कोणत्या दुसऱ्या अवयवाची artery (धमनी ) कापून coronary artery च्या जागी लावली जाते. या अशा प्रकारच्या टेक्निक चा वापर करून डॉक्टर पुनःहृदयाकडे रक्त पाठवतात. यांनतर आपलं हृदय पुनःकार्य करण्यास सुरुवात करते. ज्या केस मध्ये ऑपरेशन होत नाही त्या केसमध्ये ब्लॉकेजेस वाढून पेशन्ट दगवण्याची शक्यता वाढते. हे सगळ टाळण्यासाठी आपण आज पासून सकस पोषक आहार घेण्यास सुरुवात करावी.
म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कोणत्याच प्रकारची कसलीही समस्या होणार नाही. आपले हृदय निरोगी ठेवा. काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.