भारतातील युवकांचे हृदय एवढे कमकुवत का आहे? हृदय विकारांच्या समस्या कधी कोणाचा पाठलाग करतील हे आपल्यापैकी कोणालाही माहित नाही. आज-काल जगातील लोकसंख्येच्या किती तरी पटींनी लोकं ही हृदय विकाराच्या झटक्याने मरत आहेत हे आपण जाणता. यात चिंतेची बाब म्हणजे लोकांना कमी वयात हार्ट अटॅक येणे. का ३० ते ४० वयातच हार्ट अटॅक येऊन लोकं या जगाला कायमचा रामराम करत आहेत?
कान आपले मानवी शरीर जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही? की आणिक काही वेगळे कारण आहे? काही दिवसांपूर्वीच सिद्धांत शुक्ला ची हृदय विकाराच्या झटक्याने निधनाची बातमी आली होती. उतारवयात होणारी ही हृदय विकारांची समस्या तरुण वयातच का होत आहे? ही एक चिंतेची बाब आहे. एक स्टॅटिस्टिकल अभ्यासानुसार, भारतात कमी वयामध्ये येणारे हार्ट अटॅक चे प्रमाण दर प्रतिदिन वाढत आहे.
काही दिवसांपूर्वीची घटना आहे, दिल्लीत राहणाऱ्या अंकित चे वय केवळ २९ वर्ष होते. जो आपल्या घरात AC मध्ये झोपलेला होता. सकाळचे ४ वाजले होते अचानकच त्याच्या छातीत दुखू लागले आणि इतकं दुखत होत की जाग आली, खूप घाम आला होता. घरात कोणीच नव्हते की त्यावेळी त्याला दवाखान्यात घेऊन जाईल. म्हणून अंकितने कसं तरी करून स्वतःला सांभाळलं आणि तासाभरात दुखणं कमी झालं तेव्हा झोप लागली.
झोपून उठल्यावर अंकित ची तब्येत पहिल्यापेक्षा बरी होती. म्हणून त्यानी डॉक्टरकडे जाण्याचे टाळले. पण दुसऱ्या दिवशी अंकितला चालण-फिरणं, रोजची कामं करण्यात त्रास होऊ लागला तेव्हा अंकितने डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतला. डॉक्टरकडे गेल्यानंतर, त्यांनी इको कारडिओ ग्राम करण्याचा सल्ला दिला. ज्यात ३६ तासापूर्वी झालेलं दुखणं हे दुसरं तिसरं काही नसून हार्ट अटॅक होता.
एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक कसा होऊ शकतो? अंकित ला धक्का बसला. कडू आहे पण सत्य आहे भारतात कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेच्या एका रिसर्च जरनल मध्ये छापलेल्या एका लेखानुसार साल २०१५ भारतात ६.२ करोड लोकांना हृदयासंबंधीत रोग आहेत. यापैकी ३.२ करोड लोकांचे वय ४० पेक्षा कमी आहे. म्हणजे ४०% लोकं कमी वयाची आहेत.
मित्रांनो हे अंक खरंच धक्कादाय आहेत. एक्स्पर्ट लोकांचे म्हणणं आहे भारतात हे आकडे खूप तीव्र गतीने वाढत आहेत. २०१५ च्या रिसर्च स्टडी नुसार अकाल मृत्यू विनाकारण होतात त्यात हृदय विकार तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि हेच कारण २०१६ मध्ये पहिल्या नंबर वर आले. आजकाल १०-१५ वर्षांपूर्वी जेंव्हा लोकांना अटॅक येत तेव्हा वय ५० च्या घरात असेल असा अंदाज बांधला जाई. आता असं बिलकुल नाहीये.
छोटी छोटी लहान मूल सुद्धा ह्रदयसंबंधी च्या तक्रारिंचा सामना करत आहेत. जगप्रसिद्ध कार्डीयॉलॉजिस्ट पद्मश्री डॉ. एस. सी. मनचंदा सांगतात की भारतातील युवकांचे हृदय कमजोर झाले आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपली आधुनिक जीवनशैली. Lifestyle disorder.याची पाच कारण ते सांगतात. पहिलं कारण : तणाव (stress)
हृदय कमकुवत करते. दुसरं कारण : खाण्याच्या चुकीच्या सवयी.
हे सर्वच युवकांत दिसते. कॉम्प्युटर /इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिवापर माणसाचं शरीर आतून कमजोर बनवत आहे. चौथ कारण आहे तंबाखू सिगारेट सारख्या गोष्टीच्या सवयी. पाचव आणि महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरणात असलेलं प्रदूषण.
हे सगळे मिळून माणसाला आतून कमजोर बनवत आहे.यामुळे हृदयविकार असलेल्यांची संख्या वाढत आहे.
सुरुवातीला ज्या अंकित बद्दल सांगितले होते त्यालाही वय वर्षे बावीस पासून सिगरेट ओढायची सवय होती. म्हणजे हार्ट अटॅक येण्याचं मोठं कारण स्मोकिंग होत जे अंकित रोज करायचा. तणाव बद्दल सांगायचे झाले तर शाळेपासूनच अभ्यासामुळे आपल्याला तणावाची सवय लागते. अभ्यास, प्रेमात असफलता यांसारख्या अनेक करणांनी तणाव येतो. तणाव आणि डिप्रेशन सारख्या गोष्टी ही कमी वयात दिसू लागल्या आहेत.
खाण्यापिण्याच्या सवयी सुरुवातीला स्वादिष्ट मारतात परंतु फास्ट फूड सारखे अन्न चवीने खाण्याची मुलांना सवय लागते. परिणामी हृदयविकाराचा धोका बळावतो. डिजिटल जमान्यात ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून दूर राहणं अशक्यच हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. पण लॉन्ग टर्म मध्ये याचा काय परिणाम होणार हे आपल्याला नंतरच कळते. तणाव वाढतो. शारीरिक हालचाल संपते. लठ्ठपणा वाढतो साहजिकच अनेक रोगांना निमंत्रण मिळते.
आज आपण जे आयुष्य जगत आहोत ते आपल्याला प्रत्येक दिशेने चुकीचं आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा २०-२२ वर्ष असतानाच लोकं हार्ट अटॅकचे पेशंट बनतील. हे टाळायचं असेल तर आपल्याला स्वस्थ जीवन जगले पाहिजे. खाण्यापिण्याच्या सवयी, सर्व प्रकारच्या नशांचा त्याग, कामापुरतं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर यावर आजपासूनच फोकस केले पाहिजे. मोकळ्या हवेत बाहेर गेले पाहिजे. चला तर मग एक स्वस्थ आयुष्य जगूया.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.