नमस्कार, ‘An apple a day keeps a doctor away’ ही म्हण आपल्यापैकी बर्याच जणांनी ऐकली असेल. सगळ्या लोकांनी स्वस्थ राहण्यासाठी दररोज एकातरी ताज्या फळाचे सेवन केले पाहिजे. फळे खाण्यासाठी स्वादिष्ट तर असतातच, सोबत दैनिक कार्यासाठी ऊर्जा आणि इतर पोषक तत्व हे आपल्याला फळातूनच मिळतात. परंतु फळांत नैसर्गिक साखर असते.
मधुमेही लोकांना यामुळे रक्तशर्करा वाढू शकते किंवा इन्शुलिन रेसिस्टन्सला प्रभावित करतं. त्यामुळे असं काही मधुमेहिंना नाही खाल्ल पाहिजे. मग प्रश्न असा येतो की मधुमेह असलेल्यांनी फळे खावीत की नाही? मधुमेह हा एक जटील प्रश्न आहे पण हा नियंत्रित राहू शकतो. मधुमेह रोग्यांनी काही ठराविक ताजी फळे खावीत परंतु फळांचा ज्यूस/ रस खाऊ-पिऊ नये.
मधुमेह असलेल्यांनी कमी ग्लाइसेमिक इंडेक्स व कमी ग्लाइसेमिक लोड वाले फळांचे सेवन करायला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल हा ग्लाइसेमिक इंडेक्स व ग्लाइसेमिक लोड सगळा काय प्रकार आहे ग्लाइसेमिक इंडेक्स हे रक्तशार्करा स्तरावरील कार्बोहायड्रेट च्या प्रभावाचे एक माप आहे. आणि ग्लाइसेमिक लोड म्हणजे जेवणात उपस्थित असलेले कार्बहायड्रेट चे माप आहे.
कमी ग्लाइसेमिक इंडेक्स व कमी ग्लाइसेमिक लोड असलेली फळे मधुमेह रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. संत्र्यात व्हिटॅमिन सी चा खजिना आहे. कमी कॅलरी असते. फायबर पोटाशियम, थिया मीन भरपूर प्रमाणात असते. मधुमेह रोग्यांसाठी हे सुपर फ्रूट आहे. वाढलेल्या रक्तातील साखरेला संत्रातील घटके नियंत्रणात ठेवतात. सांत्र्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स ४० व ग्लाइसेमिक लोड ५ असतो. ज्यूस पिऊ नये. फळ चावूनच खावीत.
स्ट्रॉबेरी : यात ग्लाइसेमिक इंडेक्स ४०व ग्लाइसेमिक लोड १ असतो. स्ट्रॉबेरी फळ मधुमेह रोग्यांसाठी एक ग्रेट चॉईस आहे. कमी कॅलरी, कमी शुगर हे या फळाचे वैशिष्ट्य आहे. विटामिन सी,अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्याने रक्त शर्करा नियंत्रणात राहते. शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो.
पेरू (अमरुद ) : पेरूत ग्लाइसेमिक इंडेक्स २४ व ग्लाइसेमिक लोड ५ असतो. फॉलिक ऍसिड,विटामिन सी, लायकोपीन, पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असते. हार्मोनल संतुलनासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. मधुमेह रोग्यांना पोट साफ नसणे हे कॉमन गोष्ट आहे. परंतु पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनाने मधुमेह रोग्यांचे पोट साफ होण्याच्या तक्रारी कमी होतात.
बद्धकोष्टता यावर पेरू उपयुक्त आहे. शुगर नियंत्रित करण्यासाठी दररोज एक पेरू खाण्याचा प्रयत्न करावा. पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा मधुमेहामध्ये खूप लाभकारक ठरतो. पेर : याचा ग्लाइसेमिक इंडेक्स ३८ व ग्लाइसेमिक लोड ५ आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम,लोह, पोटॅशियम असते. कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी असते. हे सगळे पोषक गुण मधुमेह रोग्यांसाठी आवश्यक आहेत. हे फळ तुमच्या गोड खाण्याच्या इच्छेला संतुष्ट करते. (Sweet cravings)
किवी : ग्लाइसेमिक इंडेक्स ५०व ग्लाइसेमिक लोड ३ असतो. कमी कॅलरी असलेल्या या फळात कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. भरपूर फायबर असलेले हे फळ नाश्ता सोबत खाल्ले पाहिजे. किवी मध्ये असलेले फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चा स्तर कमी होतो.
पपई : ग्लाइसेमिक इंडेक्स ५८ व ग्लाइसेमिक लोड ३ असतो. मधुमेह असलेल्यांनी पपईचे सेवन दररोज केलेच पाहिजे. यात कॅरोटीन आणि पेपेन एंजाइम असते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम किडनी हृदयाच्या समस्या पासून वाचवते.
चेरी : ताज्या चेरीत ग्लाइसेमिक इंडेक्स २० व ग्लाइसेमिक लोड ५ असतो. चेरीचे सेवन केल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेवर फार काही फरक पडणार नाही. यात एंथोसाइन नावाचं रसायन इन्शुलिन उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत वाढ होते. ज्यामुळे रक्त सरकारांचे प्रमाण नियंत्रित राहते. यातील अँटिऑक्सिडंट मुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
सफरचंद : ग्लाइसेमिक इंडेक्स ३९ व ग्लाइसेमिक लोड ५ असतो. यात सोल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यात असणारे पॉलीफेनॉल पॅंक्रिया ला इन्शुलिन बनवायला मदत करतात. सफरचंदाचा ज्यूस पिऊ नका.
कोणती फळे खावीत हे तर आपण पाहिले पण ते किती प्रमाणात खावे यालाही तितकेच महत्त्व आहे. दिवसातून तीन वेळेस आपण फळे खाऊ शकतो. वर दिलेल्या फळांपैकी जी फळे उपलब्ध असतील त्यांचे तुकडे करून एक मूठ फळं (२०ग्रॅम सुमारे )आपण एका वेळेस खावे. आशा आहे दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.