घरच्या घरीच उगवा कोथिंबीर, हिरवीगार, लुसलशीत कोथिंबीर घरच्या घरी मिळेल.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, सेंद्रिय पद्धतीने हिरवेगार कोथिंबीरीची लागवड कशी करायची याबद्दलची माहिती.! अंगणातील अगदी छोट्याशा जागेत, कमी खर्चात,कमी मेहनतीत तुम्ही उगवू शकता हिरवेगार कोथंबीर. स्वयंपाकात अगदी पाहिजे तेव्हा ताजी घरी पिकवलेली कोथंबीर आता तुम्ही वापरू शकता.

यासाठी तुम्हाला धने हवेत. अखंड धणे दोन तुकड्यांमध्ये फोडून घ्यावेत.(कुटू नयेत.) अखंड धणे लावले तरीसुद्धा कोथंबीर उगवेल पण त्याची वाढ हे हळूहळू असेल. म्हणून आपण दोन तुकडे केलेले धणे घ्यावे. आणि एक तासाभर पाण्यात भिजवून ठेवावे. असं केल्याने धन्यापासून कोथंबीर लवकर उगवते. आता आपण पाहू या कोथंबीर लागवडीसाठी लागणारी माती कसे तयार करायची?

त्यासाठी ७०% नेहमीची माती ३०% गांडूळ खत मिक्स करून घ्यावे. एका पॉट /ट्रे / कुंडीत हे मिश्रण टाकून तयार करावे. आता त्याच्या वरती आपण ते भिजवलेले धणे हळूहळू पसरवून टाकणार आहोत. धने टाकून झाल्यानंतर वर पुन्हा एकदा एक थर आपण मिक्स केलेल्या त्या मातीचा द्यावा. जेणेकरून आपले धणे-कोथंबीर बिज झाकले जातील. आणि आपल्या कोथिंबिरीची वाढ लवकर सुरू होईल.

हे वाचा:   केस काळे करण्यासाठी डाय करणे सोडून द्या घरगुती उपाय ज्यामुळे केस काळे करणे सहज शक्य आहे.!

पाणी कसे द्यावे? खूप जास्त पाणी दिल्यामुळे मातीत बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणात पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. थंडीचे दिवस असतील तर एकदमच खूप पाणी न देता थोडे थोडे पाणी देत राहावे जेणेकरून मातीत ओलावा,आर्द्रता कायम राहील. फक्त सात दिवसातच हळूहळू कोथिंबिरीची वाढ सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसेल.

जेव्हा माती हलकीसर वाळायला लागली आहे असे दिसेल तेव्हां पाणी द्यायचे आहे. १५ दिवसांमध्ये सर्वच धने उगवतात. कोथंबीर उगवण्यासाठी डायरेक्ट सूर्यप्रकाश गरजेचा असतो. जर तुम्ही सावलीमध्ये कोथंबीर उगवत असाल तर कोथिंबीरीचे बीज- धणे यांना बुरशी लागू शकते. त्यामुळे सूर्यप्रकाशातच उगवा. साधारण एका महिन्यामध्ये तुम्ही कोथिंबीर कापू शकता. (मुळासकट नाही) आणि त्यामध्ये पुन्हा एकदा गांडूळ खत घालावे.

हे वाचा:   खूप उपाय करून थकलात, आता एव्हढे एक काम जेवण केल्यावर करावे, दुपटीने होईल वजन कमी.!

असं केल्याने कोथिंबीरीच्या मुळांची पुन्हा एकदा वाढ होते. असे तुम्ही एकाच वेळा सारख्याच मुळांपासून दोन वेळा कोथंबीरचे उत्पादन घेऊ शकता. तुम्हाला दिलेली ही टीप नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंगणात कोथिंबिरीची लागवड करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *