खाणारे दोन भाकरी जास्त खातील, जर तुम्ही चिकन बनवताना ही चूक टाळली तर, अनेक लोक तर वासानेच वेडे होतील.!

आरोग्य

चिकन म्हंटले की आपल्या पुढे दिसू लागते लाल रंगाची तरी आणि चिकन मस्त भाकरी बरोबर त्याचे कॉम्बिनेशन एक नंबर लागते.! चवीष्ट खाणे खायला आपल्या सगळ्यांनाच आवडते मात्र चवदार जेवण बनवणे हे देखील सर्वांना जमते का ? आज आम्ही या लेखा द्वारे तुम्हाला एक चविष्ट चिकन रस्सा बनवण्याची एक पद्धत सांगणार आहोत. ही अत्यंत सोपी पद्धत आहे याच्या मदतीने तुम्ही दहा मिनिटांत चवदार चिकन बनवू शकता.

या रेसिपीसाठी प्रथम आपल्याला येथे चिकन घ्यायचे आहे. आता एक पातेली किंवा कढई घेऊन, ३ चमचे तेल छान गरम करून घ्यायचे आहे. तेलामधून थोडी वाफ येऊ लागल्यावर एक तेजपत्ता, ४ लवंग, एक छोटी वेलची टाकायची आहे. आता एक चमचा हळद टाकून ते हलवून घ्यायचे आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचे आहे आणि आता त्यामध्ये चिकन टाकून ४ ते ५ मिनिटे मध्यम आचेवर नीट परतून चिकन शिजवून घ्या. मधे-मधे चिकन हलवत रहायचे आहे.

नीट शिजल्यानंतर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवरच १ मिनिटभर शिजवून घ्यायचे आहे. चिकनचा रंग हळूहळू बदलू लागेल. आता एका ताटामध्ये ते चिकन काढायचे आहे. आता चिकन काढून झाल्यावर त्याच भांड्यामधे ३ चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचे आहे. तेल नीट गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचे आहे आणि तेलामध्ये खडेमसाले टाकायचे आहेत. १ चमचा काळीमिरी, ३ लवंग, २ छोट्या वेलच्या, १ जायफळाचा छोटा तुकडा, ४ सुख्या लाल मिरच्या

हे वाचा:   सकाळी सकाळी एवढे एक काम करा.! वजन आठवड्यात दुपटीने कमी झालेले दिसेल.! विश्वास नसेल तर एकदा करून बघा.!

एक दालचिनीचे पान व १ चमचा शाही जिरा हे सर्व टाकल्यावर, थोड्या लसणीच्या पाकळ्या सोलून टाकायच्या आहेत. आता हे सर्व नीट परतून घ्यायचे आहे. नीट परतल्यानंतर ४ मध्यम आकाराचे कांदे बारीक उभे कापून यामध्ये टाकायचे आहे. गॅस मध्यम-जास्त आचेवर ठेवून कांदा लालसर होईपर्यंत ते फ्राय करायचे आहे. आता एक अख्खी लसूण नीट धुवून त्यामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे.

ही लसूण नीट शिजल्यानंतर त्याची रस्स्यायला छान चव येते. ४ ते ५ मिनिटे हे सर्व परतून घेतल्यानंतर आता २ चमचे आलं व लसणीची पेस्ट टाकायची आहे आणि हे टाकल्यानंतर १ मिनिट हे शिजू द्याचे आहे. आता सुखे मसाले टाकायचे आहेत. आता गॅस मंद आचेवर ठेवून घ्यायचे आहे. २ चमचे कोथिंबीर पावडर, २ चमचे भरून कश्मिरी रेड चिल्ली पावडर टाकायचे आहे.

रेड चिल्ली पावडर जास्त तिखट नसते त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार हे कमी जास्त करू शकता. आता अर्धा चमचा हळद आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचे आहे. मीठ आपण याआधी चिकन फ्राय करताना देखील टाकले होते त्यामुळे थोडे कमी मीठ टाकायचे आहे. हे सर्व नीट मिक्स करून त्यामध्ये थोडे पाणी टाका. गॅस मंद आचेवर ठेवून आता त्या भांड्यावर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे ते मसाले नीट मिक्स होऊ द्यायचे आहेत.

हे वाचा:   ना केला व्यायाम, ना डाएट.! तरी महिन्यात कमी झाले पंधरा किलो वजन.! वजन कमी करण्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला.! कोणी नाही सांगणार.!

आता झाकण काढून गॅस मध्यम आचेवर ठेवून कांदा व लसूण स्मॅश करून घ्यायचे आहे. लसणीच्या तुकड्याला स्मॅश करू नये. आता २ चमचे चिकन मसाला टाकून मिक्स करायचे आहे. चिकन मसाला नसल्यास गरम मसाला टाका. तेल बाजूने वेगळे होऊ लागल्यावर फ्राय करून घेतलेले चिकन त्यामध्ये टाकायचे आहे. चिकनला मसाले नीट लागण्यासाठी २ मिनिटे मध्यम-जास्त आचेवर ते असेच त्यामधे परतून परतून शिजू द्यायचे आहे.

आता थोड्या वेळाने त्यामधे पाणी टाका. पाण्याचे प्रमाण जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर पाणी जास्त ठेवा आणि जर ग्रेव्ही हवी असेल तर पाणी कमी टाका. चिकन आधीच शिजवून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून गॅस मध्यम आचेवर ठेवून एक झाकण ठेवून १५ मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. झाकण ठेवण्याआधी ग्रेव्हीला एक उकळी येऊ द्यायची आहे. १५ मिनिटे झाल्यानंतर झाकण खोलून पाणी थोडे कमी होऊ द्यायचे आहे.

आणि सजविण्यासाठी व चवीसाठी वरून कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि झाले तुमचे चवदार चिकन तयार. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.