नमस्कार, मित्रांनो आपण सर्वच घरामध्ये दिवा लावतो. परंतु या दिव्यामुळे जर माशा, मच्छर, झुरळ, पिसवा, इत्यादी उपद्रवी कीटक नाहीसे झाले तर? त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक परिपूर्ण आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने सर्वच उपद्रवी कीटक नष्ट होतील. त्याचबरोबर तुमचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहील.
आपण जे चूर्ण दिव्यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे तुमचा मेंदू आणि मज्जातंतू उत्तेजित होतो. मानसिक ताण तणाव, थकवा, सतत चिडचिड होणे सर्व समस्या आपोआप नष्ट होतील. आपण घरामध्ये डास घालवण्यासाठी जे उत्पादन वापरतो ते रासायनिक असल्याकारणाने हानीकारक असतात. ते आपल्या श्वास श्वासाबरोबर आपल्या शरीरात जाऊन आपल्याला इजा पोहोचवतात.
हे चूर्ण दिव्यामध्ये टाकल्यावर उपद्रवी कीटक तर नष्ट होतीलच परंतु आपल्या शरीराला ही असंख्य फायदे होतात. चूर्ण बनवण्यासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे वेखंड चूर्ण. वेखंड चूर्ण औषधी आणि सुगंधी असते. हे मानसिक विकृती वर अत्यंत उपयुक्त असते. वेखंडाच्या चूर्णच्या वासाने डास, झूरळे, माशा ढेकूण, इत्यादी कीटक नष्ट होतात. सोबतच वेखंड हे कृमिनाशक आहे.
तसेच यामुळे सर्दी, कफ, खोकला, पडसे आणि डोकेदुखी नाहीशी होते. असे हे बहुगुणी एक चमचा वेखंड चूर्ण घ्यावे. दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे साजूक तूप. स्मरणशक्ती, बुद्धी, शुक्रधातू आणि ताकद वाढवण्यासाठी साजूक तूप हे सर्वोत्तम असते. रोज तुपाचा दिवा लावल्यास मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. असे हे एक चमचा साजूक तूप घ्यावे.
एक चमचा साजूक तुपामध्ये एक चमचा वेखंड चूर्ण मिक्स करावे. असे हे चूर्ण दिव्या मध्ये टाकून दिवा पेटवायचा आहे. या मिश्रणापासून लावलेला दिवा अत्यंत प्रभावी असतो. वेखंड व तुपाचा हा दिवा लावल्यावर काही वेळातच घरातील कीटक नाहीसे होतात. असा हा दिवा रोज लावल्याने मानसिक शक्ती वाढते. आणि सर्व मानसिक आजार दूर होतात तर असा हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.