फक्त हे तीन पदार्थ चेहऱ्यावर असे लावा, चेहरा चंद्रा प्रमाणे चमकू लागेल, चेहऱ्यावरचे डाग पूर्ण नाहीसे करेल हा उपाय.!

आरोग्य

प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. त्वचा सतेज असावी, चेहऱ्यावर मुरूम व पुटकुळ्या वांगाचे डाग नष्ट व्हावेत,आपला चेहरा नितळ व्हावा असं प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो, ब्युटीपार्लरमध्ये जातो. आणि अशा क्रीम्स चा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. स्किन खराब होते.

आज आपण पाहणार आहोत एक फेशियल पॅक कसे बनवायचे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्वरित चमक येईल. तेही घरगुती साधनांपासून.! आपण अत्यंत सोपे असे फेशियल पॅक कसे बनवायचे कसे लावायचे आणि नितळ, सुंदर त्वचा कशी मिळवायची आहे हे बघणार आहोत. हा उपाय आयुर्वेदिक नैसर्गिक असल्याने याची कोणतीही हानी होणार नाही झाला तर फायदाच होईल.

स्त्रियांप्रमाणे पुरुषही या फेशियलचा उपयोग करू शकतात. ब्युटी पार्लर प्रमाणे हे फेशियल देखील आपल्याला तीन स्टेप मध्ये करायचे आहे. स्टेप 1 : क्लीनसिंग: कोणत्याही ब्रँडेड कंपनीची 1 चमचा कॉफी घ्या. कॉफीमध्ये अँटीओक्सिडेंट गुण असतात त्यामुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह वाढतो. त्वचा तजेलदार होते. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, वांग, मुरमाचे काळे डाग घालवण्यासाठी ही कॉफी परिणामकारक आहे.

हे वाचा:   चहा करताना त्यात टाका फक्त एक काडी, सर्व चरबी जळून जाईल.!

त्यात दोन चमचे दूध घाला. ते मिक्स करून घ्या. आपल्या चेहऱ्यावर सर्क्युलार मोशन मध्ये साधारण दोन ते तीन मिनिट हलक्या हाताने मसाज करा. अशाप्रकारे क्लिंझिंग केल्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील धूळ माती व चेहऱ्यावर असलेले प्रदूषण निघून जाते. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. स्टेप 2 : फेशियल मसाज: अर्धा चमचा कॉफी, 2 चमचे कोरपड गर, चिमूटभर हळद घ्या.

मिश्रण एकत्र करून घ्या. अश्या या जेल ने पुन्हा एकदा चेहऱ्यावरती सरक्यूलर मोशन मध्ये दहा मिनिटे मसाज करायचा आहे. यामुळे चेहऱ्यावरील वांगाचे डाग, पिंपल्स चे डाग,काळी वर्तुळे निघून जातील. त्वचा उजळेल आणि मसाजमुळे तुमच्या चेहर्‍यावरील रक्तप्रवाह वाढतो. चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

स्टेप 3 : फेस पॅक: 3 चमचे कॉफी, 2 चमचे बेसन, 2 चमचे दही, 3 चमचे बटाट्याचा रस घेऊन मिश्रण बनवा. हा झाला आपला फेस पॅक तयार. असा हा फेसपॅक संपूर्ण चेहर्‍यावर व्यवस्थित लावून घ्या. 15 मिनिट हा फेसपॅक तसा ठेवावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आपले फेशियल पूर्ण झाले. आम्हाला फक्त विश्वासच नाही तर खात्री आहे अशा प्रकारे तुम्ही फेशियल पॅक लावल्याने तुमचा चेहरा उजळून निघेल. तुम्ही स्वतःचा चेहरा पाहून आश्चर्य होऊन स्वतःच्या प्रेमात पडाल..!

हे वाचा:   जिमला जाणाऱ्या मुलांनी एकदा नक्की वाचा.! प्रोटीनचा खरा खजाना कशाला म्हटले जाते.? आज दूर होईल सर्वात मोठा गैरसमज.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *