मित्रांनो, आजची माहिती अत्यंत खास आणि जबरदस्त आहे. आज आम्ही तुम्हाला अत्यंत दुर्मिळ जडीबुटी सोबत परिचय करून देणार आहोत. जी सहज उपलब्ध होत नाही. तुमच्या आसपास जर मोठी नदी असेल तर नदीकिनारी ही वनस्पती तुम्हाला मिळू शकते. परंतु ही वनस्पती सामान्यतः सगळीकडे आढळून येत नाही. भ्रूगू ऋषींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. असं म्हणतात त्यांनी या वनस्पतीचा शोध लावला होता.
या वनस्पतीचे नाव आहे भारंगी. या वनस्पतीला बागफुल असेही म्हणतात. संस्कृत मध्ये ब्राह्मणी असे वनस्पतीला म्हणतात. भारंगी वनस्पती पाण्याच्या आसपास आढळते. भारंगीची फुलं निळी आणि गुलाबी रंगाची असतात. जी दिसायला अत्यंत आकर्षक आणि मनमोहक असतात. उन्हाळ्यात या वनस्पतीवर फुले उगवतात. या फुलांचा हलकासा सुगंध येतो. पावसाळ्यात या वनस्पतीवर फळ सुद्धा येतात.
आयुर्वेदिक गुणांबद्दल बोलायचे झाले तर ही वनस्पती कफ व पित्त वात नाशक असते. पचन आणि रक्त वाढीत फायदेशीर असते. अंडकोश ची सूज, गाठी होणे, फोड, अंगदुखी, डोकेदुखी गुडघे दुखी, पाठ दुखी, ताप ठिक करण्यावर उपयोगी असते. आजकालच्या धकाधकीच्या बिघडलेल्या जीवनशैलीमध्ये डोकेदुखी ही अत्यंत सर्वसाधारण समस्या बनली आहे.
ज्या लोकांना सतत डोकेदुखी होत राहते त्या लोकांसाठी भारंगी ही अत्यंत प्रभावशाली वनस्पती आहे. भारंगी ची मुळं धुऊन वाटून डोक्यावर लेप लावल्यास डोकेदुखीत आराम मिळतो. सोबतच या वनस्पतीच्या पानांमध्ये अँटीसेप्टीक anti-inflammatory गुणधर्म असतात. तुम्हाला फोड येत असतील तर याच्या पानांचा वाटून रस फोडावर लावल्याने फोड बसतो. आणि त्रास होत नाही.
कान दुखी होत असेल तर भारंगीची मूळ पाण्यासोबत वाटून कानात एक थेंब घातल्याने आराम मिळतो. पण हा प्रयोग तुम्ही जाणकार वैद्याच्या निगराणीत च करावा. जर तुम्हाला अंडकोषावर सूज येण्याची समस्या असेल तर तुम्ही भारंगी ची मूळ आणि खोडाची साल पाण्यासोबत वाटून ते गरम करून बांधल्याने अंडकोशावरील सुज कमी होऊन ठीक होते.
ताप सर्दी खोकला यांची समस्या असेल पाच ग्रॅम या वनस्पतीच्या मुळांचा काढा बनवून सकाळ संध्याकाळ रोग्याला पाजल्यास सर्व समस्या चुटकीसरशी गायब होतील. कंबर दुखी पाठ दुखी सांधे दुखी यांसारख्या समस्यांवर या वनस्पतींच्या मुळाचा काढा 10ml रोज पिल्याने रोग्याला त्वरित आराम मिळतो. पान सुद्धा प्रयोग तुम्हाला जाणकार वैद्याच्या निगराणीखाली केला पाहिजे.
अशा आहे आज आम्ही दिलेली अनोखी माहिती ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.