दहापैकी कोणताही एक उपाय करा, घरात एकही मुंगी दिसणार नाही, मुंग्यांचे काम तमाम करणारे दहा घरगुती उपाय.!

आरोग्य

मित्रांनो आज काल घराघरात मुंग्यांचे असणे ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. या समस्यांमुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुंग्या दिसायला तर खूप छोट्या असतात परंतु असंख्य मुंग्या एकाच वेळी एका जागी येऊन त्रासदायक ठरतात. साधारणपणे आपण दोन प्रकारच्या मुंग्या नेहमी बघतो एक लाल आणि काळी.

जिथे गोड आहे तिथे मुंग्या येणे सुरुवात होतेच. गोडा व्यतिरिक्त मीठ आणि चपातीच्या डब्यावर देखील मुंग्या आढळतात. छोट्या असूनदेखील खूप त्रास देतात. परंतु काळजी करू नका आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असेच घर घरगुती उपाय ज्यामुळे होईल मुंग्यांची समस्या समाप्त.

१. घराघरात असणारी दालचिनी मुंग्या पळवून लावण्यात आपली मदत करते. दालचिनीच्या वासामुळे मुंग्या घरात किंवा स्वयंपाक घरात प्रवेश करत नाहीत. एक कप पाण्यामध्ये दोन चमचे दालचिनीचे तेल घालून कापसाच्या मदतीने जिथे मुंग्या येतात त्या जागी लावावे. जोपर्यंत मुंग्या जात नाही तोवर हा प्रयोग करत राहावा.

२. लिंबाच्या रसापासून देखील मुंग्या दूर पळतात. लिंबाचा रस स्प्रे बॉटल मध्ये घालून जिथून मुंग्या येतात त्या जागेवरच स्प्रे फवारावा. किंवा त्या जागेवर लिंबाच्या साली तुकडे ठेवावे. ३. मुंग्या पळवून लावण्यासाठी पुदिना देखील फायदेशीर ठरतो. दहा थेंब पुदिन्याचे तेल अथवादेण्याच्या पानांचा रस 1 कप पाण्यामध्ये मिसळा. मुंग्या असलेल्या ठिकाणी याचा स्प्रे फवारा.

हे वाचा:   फक्त एका रात्रीत गुडघेदुखी थांबणार म्हणजे थांबणार, याहून सोपा उपाय बघितला नसेल.!

वाळलेल्या पुदिन्याच्या पानांचे चूर्ण देखील या जागेवर तुम्ही ठेवू शकता. घरामध्ये पुदिन्याचे रोप लावल्याने देखील मुंग्या येत नाहीत. ४. मित्रांनो काय तुम्हाला माहिती आहे का लाल मिरची आपल्यातील गुणधर्मामुळे मुंग्यांचे रसायनिक संकेत देण्याची क्षमता नष्ट करते. त्यामुळे मुंग्या पळून जाण्यास प्रवृत्त होतात. त्यासाठी तुम्ही लाल मिरची पावडर व हळद समप्रमाणात घेऊन मुंग्यांनी प्रभावित जागी भुरभुरावी.

५. लवंग देखील मुंग्यांना पळवून लावण्यामध्ये आपल्या कामी येते. साखरेच्या अथवा कोणत्याही डब्यामध्ये मुंग्या फिरकत असतील तर त्यामध्ये तीन ते चार लवंगा ठेवा. मुंग्या काही तासातच गायब होतील. याशिवाय लवंग पावडर मुंग्या येणाऱ्या जागी टाकली असता मुंग्या होतील गायब. ६. बोरिक पावडर सुद्धा या कामात आपले मदत करते. बोरिक पावडर मध्ये पाणी आणि साखर मिसळून घोळ बनवा. हे मिश्रण मुंगा असलेल्या जागी ठेवा.

या मुळे मुंग्या याकडे आकर्षण जातील आणि बोरिक पावडर मुळे त्या मर’तील. अशाप्रकारे तुमच्या घरातून मुंग्या होतील छूमंतर. ७. व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणात घेऊन मुंग्यांनी प्रभावीत असलेल्या जागी फडक्याने पुसून घ्या. हा उपाय केल्याने कमीत कमी एक आठवडा मुंग्या त्या जागी फिरकत नाहीत.

हे वाचा:   लाखोंचे औषधे करू शकत नाही ते ही वनस्पती करून दाखवते.! एका वापराने अनेक लोकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

८. कॉफी पावडर देखील तुम्ही मुंग्या येणाऱ्या जागी भुरभुरा. असं केल्याने मुंग्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मुंग्यांना कॉफीचा वास अजिबात सहन होत नाही. ९. कदाचित तुम्हाला माहित नसेल परंतु कापराचा वास देखील मुंग्यांना सहन होत नाही. म्हणून त्या जागी कापराच्या पावडरीचा शिडकाव करा जिथे खुप मुंग्या आहेत. त्यामुळे मुंग्या पळून जातील.

१०. हळदीचा वापर मुंग्या पळवून लावण्यासाठी सर्रास प्रत्येक घरात केला जातो. जास्त मुंग्या असलेल्या जागी हळदी पावडर फवारा. मुंग्या त्वरित पळ काढतील. तर हे होते मुंग्या घरातून पळवून लावण्याचे दहा अत्यंत सोपे उपाय. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *