मित्रांनो, आपल्या शरीराचा सर्व भार हा आपल्या टाचेवर असतो. यामध्ये व्यक्तीचे वजन जास्त असेल तर टाच दुखी जाणवते. तकाहींना जुनाट दुखणी असतात. त्यात मान, पाठ, कंबर, गुडघे, सांधे वारंवार दुखतात. तर काहींना सूज येऊन कळ येते, वेदना जाणवतात. हात आणि पायाच्या नसा दबलेल्या असतील सोबतच गुडघ्यावर सूज असेल खूप वेदना जाणवत असतील तर आजचा हा उपाय तुमच्यासाठीच आहे.
अशा प्रकारच्या वेदनादायक दुखण्यामध्ये आपण अनेक प्रकारचे औषध घेतली असतील. तरीही फरक पडत नाही. किंवा हे दुखणे मुळापासून जात नाही पुन्हा उद्भवते. असे असल्यास हा जादुई प्रयोग तुम्ही करून बघा. जादूई यासाठी हा उपयोग फक्त एक रात्र करून बघा तुम्हाला रिझल्ट लगेच मिळेल. शिवाय हा उपाय करण्यासाठी फक्त दोन घटक लागणार आहेत ते देखील सहज उपलब्ध होतात.
जाणून घेऊयात कोणता आहे तो उपाय. या उपायासाठी प्रथम घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मोहरीचं तेल. याचे कारण मोहरीच्या तेलामध्ये आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुळे सांधेदुखी, वात, गाठी, सुज यांसारख्या समस्या दूर होण्यात आपली मदत होते. या तेलामुळे हाडांच्या दुखण्यावर नियंत्रण राहते. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने शरीराला मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो.
आणि हाडाचे दुखणे सांधेदुखी थांबण्यास मदत होते. पुढील घटक लागणार आहे ती म्हणजे लांडगा वनस्पतीची पाने लागणार आहेत. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला सगळीकडे आढळते. या वनस्पतीचे पान स्वच्छ धुवून पुसून घ्या. मोहरीचे तेल या पानांच्या दोन्ही बाजूस लावा. त्यानंतर हे पाने लोखंडी तव्यावर भाजून घ्या.
व ही पाने गरम असतानाच टाच दुखी असल्यास टाचेवर लावा आणि त्यावर सुती कपडा घट्ट बांधावा. जेणेकरून गरम पानांचा शेक बसेल. रात्रभर हे असेच राहू द्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकून त्या पाण्याचा टाचेला शेक द्या. याच पद्धतीने गुडघे, कंबर पाठ ज्या ही जागे दुखणे असेल त्या जागी प्रयोग करावा. अशाप्रकारे सलग अकरा दिवस प्रयोग तुम्ही केल्याने तुम्हाला उत्तम फरक जाणवेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.