ही एक जादुई वस्तू केसांना लावा.! केस वाढतच राहतील.! पंधरा दिवसात घनदाट केस बनतील.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक औषधोपचार करत असतो जर आपले केस गळत असतील किंवा आपल्या केसांमध्ये कोंडा झाला असेल. आपले केस पांढरे होत असतील किंवा केस वाढत नसतील अशा प्रकारच्या अनेक त्रासांना कंटाळून आपण अनेक औषधोपचार करतो महागडे शाम्पू वापरणे, डॉक्टर आणि जवळ जाऊन औषधे घेणे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण करत असतो यामध्ये आपले भरपूर पैसे देखील वाया जात असतात.

तरी देखील आपले केस चांगले दिसावे चमकदार दिसावेत म्हणून राहावेत म्हणून आपण हे प्रयत्न करत असतो. म्हणून आज आपण असा आहे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला एवढा खर्च किंवा आता जास्त ताण घेण्याची गरज भासणार नाही कारण आजचा आपल्या घरगुती उपायांमुळे आपले हे सर्व प्रॉब्लेम्स कायमचे दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया या साठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कशाप्रकारे बनवला जाणार आहे.

यासाठी आपल्याला सर्वप्रथम मेथी घ्यायची आहे. मेथी ही आपल्या केसांसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदातही मेथीचा वापर करण्यात आला आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, जस्त आणि भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते. यात अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.

मेथी मध्ये असणारे औषधी गुणधर्म आपल्या केसांना अधिक मजबूत आणि सॉफ्ट आणि शायनी बनवायला मदत करतात. त्यानंतर आपल्याला इथे वापरायचे आहेत कले तीळ.काळ्या तिळामध्ये आयर्न, झिंक, फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचा आणि केसांच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतात. काळे तीळ हे पौष्टिकतेने समृद्ध अन्नपदार्थ आहे. काळे तीळ देखील आपल्या केसांना मजबूत करण्यासाठी मदत करतात त्यामुळे आपल्याला इथे काळया तीळ यांचादेखील वापर करायचा आहे.

हे वाचा:   ही लहानशी चूक जीवावर बेतू शकते.! दुर्लक्ष कराल तर होईल खूप मोठे नुकसान.! किडनी कायमची होईल निकामी.!

त्यामुळे एका वाटीमध्ये तीन चमचे मेथीदाणे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तीन चमचे काळे तीळ रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. रात्रभर भिजत ठेवल्या नंतर आपल्याला दुसर्‍या दिवशी या काळ्या तीलांमधील पाणी एका दुसऱ्या पात्रांमध्ये गाळून घ्यायचे आहे त्याच पात्रांमध्ये आपल्याला मेथी दाण्यातील पाणीदेखील गाळून घ्यायचे आहे. रात्रभर या दोन्ही गोष्टी पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे यामधील सर्व औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये येतील त्यामुळे हे पाणी आपल्या केसांसाठी एका टोनर सारखे काम करेल.

या पाण्याचा वापर आपण केसांवर करू शकतो हे पाणी एका स्प्रे बॉटल मध्ये आठवडाभर भरून ठेवून आपण वापरू शकतो या पाण्याचा वापर फक्त आपल्याला आठवडाभर करायचा आहे एकदा काढून घेतलेले पाणी आपण फक्त आठवडाभरात वापरू शकतो. जर तुम्हाला ता पेक्षा वापरायचे आहे तर तुम्ही दुसऱ्या आठवड्यात दुसरे पाणी तयार करू शकता. हे पाणी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

त्यामुळे दिवसा हे पाणी आपल्या केसांवर स्प्रे करून एक ते दोन तासांसाठी ठेवून त्यानंतर जर केस धुतले तर आपले केस अगदी मऊ आणि चमकदार बनतील. त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की आपण भिजवून घेतलेले मेथीदाणे आणि काळे तीळ मिक्सर मध्ये टाकून या दोघांची देखील आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार करून झाल्यानंतर यामध्ये अजून कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची नाही आहे.

फक्त मेथी दाने आणि काळे तीळ यांची पेस्ट आपल्याला आपल्या केसांमध्ये लावायची आहे जेणेकरून आपले केस अधिक मजबूत होण्यास मदत होईल सोबतच यामध्ये वापरले गेलेले काळे ते आपल्या केसांना काळेभोर आणि मजबूत करण्यास मदत करते. जेव्हा ही आपल्याला असे वाटेल की आपल्याला केस धुवायचे आहेत त्या आधी एक ते दोन तास ही पेस्ट आपण आपल्या केसांमध्ये लावून ठेवू शकतो.

हे वाचा:   छातीचे हाड खूप दुखणे का? वारंवार छातीत कफ तयार होतो का..? हा रामबाण उपाय सगळ्यांची सुट्टी करेल.!

त्यानंतर थंड पाण्याने किंवा साध्या कोमट पाण्याने आपल्याला केस धुऊन घ्यायचे आहेत. शक्यतो पहिल्या वॉश मध्ये शाम्पू चा वापर करु नये. तिसरा उपायासाठी म्हणजेच काळे तीळ आणि मेथी दाण्यांचे बनविण्यासाठी आपल्याला एक चमचा मेथी दाणे आणि एक चमचा काळे तीळ घेऊन त्यांना कुठून त्यांचे बारीक पावडर तयार करायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल वापरायचे आहे आणि त्याला हलकेसे गरम करून त्यानंतर त्यांचा वापर आपल्या केसांसाठी करू शकतो.

जर तुम्हाला मेथीदाणे आपल्या केसांमध्ये जायला नको असतील तर हे तेल आपण गाळून वापरू शकतो. याचा वापर आपण आठवड्यातून तीन वेळा देखील करू शकतो हे तिन्ही उपाय एवढे गुणकारी आहेत त्यांचा वापर सातत्याने केल्यामुळे आपल्या केसांची लांबी देखील वाढेल त्याचबरोबर केस गळती थांबेल आणि सोबतच आपले केस मऊ मुलायम होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.