मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना मुतखड्याचा त्रास होत असतो. त्यासाठी आज काही उपाय आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत. सर्वात आधी बघूयात हा मुतखडा का होतो? झाल्यास कोणती काळजी घ्यावी आणि पाहूयात काही घरगुती उपाय. आपल्या शरीरातील विषारी व निरुपयोगी खान हे मूत्रपिंडाद्वारे शरीराबाहेर फेकले जाते. या नैसर्गिक प्रक्रियेदरम्यान दोन्ही किंवा एक किडनीमध्ये काही कडे बनतात आणि ही प्र’क्रिया सुरळीत होत नाही.
किडनी स्टोन गंभीर नसले तरीदेखील वेदनादायी असतात. आपल्या शरीरातील कॅल्शियम, यूरिक ऍसिड किंवा स्ट्रुव्हाईट असे घटक एकाएक वाढल्याने किंवा तीन ऍसिडच्या गळतीमुळे अनेक खनिजे एकाच ठिकाणी साचून असे खडे निर्माण होतात. बऱ्याचदा अनुवंशिकतेमुळे देखील असा त्रास उद्भवू शकतो.
सतत लघवी होणे, प्रत्येक वेळेला थोडीशीच लघवी होणे, लघवीचा वास रंग बदलणे यावरून किडनी स्टोन तयार होत आहेत असे कळू शकते. यासाठी योग्य त्या चाचण्या आणि खड्यांचे अनुमान लावण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रास वाढत गेल्यास बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया देखील करावे लागते. मूतखडे अजिबात होऊ नये यासाठी काही उपाय जे आपल्या हातात असतात ते करा.
जसे भरपूर प्रमाणात पाणी पिणे, आहारात मिठाचे प्रमाण कमी घेणे, खाण्याच्या साचून शरीराला त्रास होईल असे अन्नपदार्थ टाळा. लहान मुतखड्यासाठी काही सोपे उपाय आहेत, तसे खूप पाणी प्या जेणेकरून तुमच्या लघवीच्या प्रवाहासोबत हे खडे देखील पडतील असे डॉक्टर सांगतात. पूर्वी झालेल्या प्रकारचे खडे परत होऊ नये याकरता आपल्या दैनंदिन आहारात बदल करा. आपलं वय आणि उंची लक्षात घेऊन शरीराचे वजन मापात ठेवा.
लघवी मार्गात संसर्ग दोष निर्माण होऊ नये यासाठी हायजीन ची काळजी घ्या. पाहूया घरगुती उपाय, यासाठी आपल्याला लागणार आहे एक मसाला विलायची, एक चमचा बारीक वाटलेली खडीसाखर, एक चमचा खरबूज बी (मगज), एक ग्लास पाणी. एका ग्लासात पाणी घेऊन वरील गोष्टी एक एक करत घाला. रात्री झोपताना हे करा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे भिजून फुगलेले दिसेल.
या गोष्टी तुम्ही चावून खा आणि वरून त्यासोबत ते पाणी प्या. हा उपाय सलग सकाळी रिकाम्या पोटी सात दिवस करून बघा. तुमचा मुतखडा कधी तुटून निघून जाईल तुम्हाला देखील कळणार नाही. एक चमचा आवळा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करा. हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यावे.
हा उपाय करतेवेळी तुम्हाला दिवसभरात त्याच ग्लासाचे सुमारे आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचे आहे. कमीत कमी पाच लिटर पाणी पोटात गेलेच पाहिजे. एक चमचा ऑलिव्ह ऑइल वाटीत घ्या. यात अर्ध लिंबू चा रस ( एक ते दोन लिंबू रस ) घाला. हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. हा उपाय देखील तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटीच करायचा आहे.
हा उपाय केल्यानंतर लगेच खूप पाणी पिऊ नये कमीत कमी पंधरा मिनिटे थांबावे. यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.