सर्दी खोकला चा विषय संपवून टाकेल हा आयुर्वेदिक उपाय, घरीच करा शून्य रुपयात होईल खूप मोठा फायदा.! हाडे होतील लोखंडासारखे टणक.!

आरोग्य

शरीराला मजबूत आणि डोक्याला मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आमची आजी पूर्ण परिवारासाठी एक खास रेसिपी बनवून ठेवायची. आज हीच रेसिपी आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत. या उपायाने तुमचे शरीर होईल एकदम धडधाकट. मेंदू होऊन जाईल तल्लख आणि अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल.

या उपायांमध्ये रेसिपी मध्ये बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव कप बारीक डिंक ( डिंकाचे खडे खलबत्त्यात वाटून घ्या ). असा हा बारीक डिंक मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पावडर बनवून घ्या. डायरेक्ट मोठे डिंकाचे खडे मिक्सरमध्ये घातल्यास मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. पाव कप डिंकाला पाव कप वितळलेले साजूक तूप घ्या.

डिंकाची बारीक पावडर एका भांड्यामध्ये काढून त्यात पाव कप साजूक तूप मिसळावे. हे चमच्याने मिक्स करून घ्या. हे मिश्रण एक तासासाठी असेच राहू द्या. डिंक खाण्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. अनेक लोकांना कंबरदुखीची समस्या असते त्यात देखील आराम मिळतो डिंक खाण्यामुळे!

अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड, अर्धा टरबुजाचे बी या सर्व गोष्टी एकत्र मिक्सर मध्ये भरड सर वाटून करून घ्या. आपल्या मेंदूसाठी या गोष्टी अत्यंत चांगल्या आहेत. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्यावे. एक कप किसलेले सुके खोबरे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. खूप भाजून याचा रंग बदलेल असे करू नका.

हे वाचा:   रोज रोज मधाचे पाणी पिणाऱ्या लोकांबरोबर नेमके काय झाले बघा.! असे करणे कितपत योग्य असते.! याबद्दल डॉक्टरांचे काय आहे म्हणणे.?

एका कढईमध्ये तूप व डिंकाचे मिश्रण घालून मंद आचेवर व्यवस्थित शिजवा जेणेकरून डिंक कच्चा राहणार नाही याची काळजी घ्या. डिंक फुलेल. या मध्ये अर्धा लिटर दुध घाला. मिश्रण सतत ढवळत रहा. मध्यम आचेवर हे केले तरी चालेल. यामधील मॉईश्चर जाऊन मिश्रण घट्ट होईल. यामध्ये आता अर्धा कप खडीसाखर घाला.

या मिश्रणात आता भाजून घेतलेला खोबर्‍याचा किस घाला. यानंतर जे ड्रायफ्रूट्स वाटून ठेवले होते ते झाला. चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून घ्या. मंद आच करून यामध्ये एक चमचा विलायची पावडर, एक चमचा जायफळ पावडर, दोन चमचे सुंठ पावडर, दोन चमचे खसखस घाला. मिश्रण नीट मिक्स करून दोन ते तीन मिनिटे शिजवा. आपला पदार्थ तयार. फ्रीज च्या बाहेर देखील आठ ते दहा दिवस हे चांगले राहते.

हे वाचा:   नसांमध्ये कमजोरी, सूज, नसा ब्लॉक होणे, सर्व समस्या असतील तर चिंता करू नका.! हे एक काम करा, आठ दिवसात सगळं काही आपोआप ठीक होईल.! जाणून घ्या कसे.!!!

फ्रिज मध्ये 20 दिवसांपर्यंत टिकते. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा जरूर खा. डिंक खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढेल. थंडीमध्ये शरीराला ऊर्जा आणि उब देण्यासाठी डिंक व तुपाचे सोबत सेवन करणे फायदेशीर ठरते. डिंक आपल्या पाठीच्या हाडाला मजबूत बनवते . आपली पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुध्दा अनेक लोक डिंकाचं सेवन करतात.

या रेसिपी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स देखील वापरले आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता भरून निघेल. विभिन्न प्रकारच्या तक्रारी अपोआप होतील दूर. तेंव्हा मस्त खा आणि स्वस्थ रहा.! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *