मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बाहेरचे फास्ट फूड जंक फूड अशा विभिन्न प्रकारचे शरीराला बाधक असे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोट साफ न होणे ही एक जटिल समस्या बनली आहे. प्रत्येक घरात हे सगळीकडेच बघायला मिळते. याशिवाय व्यायामाचा अभाव असल्याने देखील पोट साफ होत नाही. यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे महागडी औषधे देखील उपलब्ध आहेत.
केवळ फक्त आणि फक्त पोट साफ न झाल्यामुळे शरीरामध्ये ८०% आजार जडतात. ज्यामध्ये केसांच्या तक्रारी, त्वचेच्या समस्या, उष्णता वाढणे, शरीरामध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, लठ्ठपणा वाढत जाणे, हृदयविकाराचा धोका इत्यादी प्रकारचे नाना आजार निर्माण होतात. अनेक जण सकाळी उठल्यानंतर पोट साफ होण्यासाठी त्रस्त असतात. बद्धकोष्टता गॅसेस मूळव्याध असे अनेक प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात.
यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही कितीही औषध गोळ्या घेत असतात आणि पोट साफ होत नसेल तर आजचा हा खास उपाय फक्त तुमच्यासाठीच आहे. लक्षात घ्या वेळच्यावेळी पोट साफ होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा तुमचा दिवस संबंध खराब जाऊन याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील होतो. तुमच्या स्वभावातील चिडचिडेपणा देखील वाढतो.
या पाण्याचा वापर केल्यानंतर तुमच्या आतड्यांचे कार्य क्षमता दुपटीने वाढून पाचनशक्ती सुधारते. शरीरामधील लहान आतडे किंवा मोठे आतडे असूदेत सर्व जुनी घाण बाहेर पडण्यास मदत होते. या सोबतच तुम्हाला पित्ताचा त्रास असलेल्या वारंवार वेळोवेळी औषधे करूनदेखील इतर कमी होत नसेल तर हा उपाय तुम्ही देखील अवश्य करून बघा. शरीरातील उष्णता अकारण भडकत जाते त्यामुळे हा उपाय केल्याने तुम्हाला अवश्य लाभ होईल.
यासोबत तुमचं वजन कमी होऊन दातांचा समस्या देखील कमी होऊ लागतात. आता पाहुयात या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे. आणि हा उपाय कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती. या उपायासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे बाळहिरडा. हा सर्वत्र कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज माफक दरात उपलब्ध होतो.
आपल्या शरीराला संजीवनीचे काम करणारा बाळहिरडा यामध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात, शरीरात अनेक विषारी घटक असतील तर ते बाहेर काढण्यासाठी हा घटक अत्यंत फायदेशीर ठरतो. यामुळे आपले पाचनशक्ती सुधारुन वर्षानुवर्षे शरीरात साठवलेली जुनी चिवट घाण देखील बाहेर पडण्यासाठी बाळहिरडा अत्यंत लाभदायी आहे असे आयुर्वेद सांगते.
यासोबतच दात दुखणे घसा दुखणे केस गळती च्या किंवा सफेद केसांच्या तक्रारी यामध्ये देखील बाळहिरडा अत्यंत फायदेशीर आहे. पित्त वाढणे उष्णता वाढणे यावर बाळ हिरडा म्हणजे वरदानच होय. या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे एरंडाचे तेल. आयुर्वेदामध्ये केसातील कोंडा, केसगळती च्या तक्रारी, केसांच्या वाढीसाठी तसेच त्वचेसाठी देखील एरंडाचे तेल अत्यंत गुणकारी ठरते.
त्याचप्रमाणे पोटातील घाण मल विसर्जनाचा मंदावलेला वेग वाढवण्यासाठी, दोनही आतडे घासून पुसून साफ करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एरंडेल तेल अत्यंत गुणकारी मानले जाते. चार चमचे एरंडेल तेल एका भांड्यामध्ये घाला. त्यामध्ये बाळ हिरडा घालून तो व्यवस्थित तळून घ्या. त्याचा आकार दुप्पट होतो. तळून घेतल्या नंतर गरम असतानाच हे मिक्सर मधून बारीक करून घ्या.
गार करुन बारीक करायला गेल्यास मिक्सरमध्ये हे व्यवस्थित बारीक होत नाही. हे चूर्ण आपले महत्त्वाचे औषध तयार झाले. संध्याकाळी झोपायच्या वेळेस एक चमचा असे चूर्ण तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा गरम पाण्यात घालून पिऊ शकता. सकाळी उठल्यानंतर कितीही आवरले तरी देखील तुमचे पोट साफ अवश्य होईल. अत्यंत चांगल्या रीतीने तुमचे पोट साफ होईल. हा उपाय सलग पंधरा दिवस तुम्ही करून बघा.
पाच दिवस आराम घ्या त्यानंतर पुन्हा सात दिवस हा उपाय करा. अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचे पोटासंबंधी तक्रार असेल तर ती दूर होईल. तुम्ही स्वतःच फरक अनुभवाल! हा अत्यंत लाभदायक उपाय तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.