उन्हात गेले की चेहरा काळा का पडतो.? नेमके काय असते यामागे कारण.? जाणून घ्या नेमके काय करायला हवे यासाठी.!

आरोग्य

आपली त्वचा आपल्या शरीरावरील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. त्वचा मुलायम कोमल व सुंदर दिसण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असणारे अनेक उत्पादने आपण वापरत असतो. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जण स्वतःचे आयुष्य जीवनमान वाढवण्यासाठी घरगुती उपाय देखील करत असतात. प्रत्येक जण आपल्या त्वचेला जीवापाड जपत असतो.

आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी आहेत जी आपली त्वचा उन्हा मध्ये गेल्यावर काळी पडू नये किंवा त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊ नये याकरिता उन्हामध्ये जाण्याचे टाळतात. अनेकजण खूप कमी प्रवास करतात. असे सुद्धा अनेक जण आहेत जे बाहेर प्रवास करत असताना आपल्या त्वचेला सन स्क्रीन क्रीम लावत असतात जेणेकरून सूर्याच्या प्रखर तेजामुळे त्यांच्या शरीरावर व त्वचेवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी घेत असतात.

आपल्या शरीरावरील त्वचा आपल्या प्रत्येक अवयवांची काळजी घेण्याकरिता सक्षम असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की,आपल्या त्वचेमध्ये मेलेलीन नावाचे घटक उपलब्ध असते. हे घटक सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून किंवा किरणांपासून संरक्षण करत असते. आपल्या शरीरावरील त्वचेचा रंग हा देखील मेलेलीन नावाच्या तत्त्वांवर अवलंबून असतो. जर तुमच्या शरीरामध्ये मेलेनिन चे प्रमाण जास्त असेल तर अशा वेळी तुमची त्वचा सावळी दिसत असते.

जर तुमच्या त्वचा मध्ये मेलेनिन चे प्रमाण कमी असेल तर अशा वेळी तुमची त्वचा गोरी दिसून येते. सुर्याच्या किरणांमध्ये अल्ट्रा वायलेट किरण असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवर थेट या किरणांचा परिणाम होतो. या किरणांमुळे आपल्या शरीरातील मेलेलीन चे प्रमाण कमी होते अशा वेळी शरीरातील अन्य पेशी मेलेलिन यांचे प्रमाण वाढवण्यासाठी कार्य करू लागतात. या सगळ्या हालचालीमुळे आपल्या शरीराचा रंग बदलतो आणि आपण काळे दिसू लागतो.

हे वाचा:   घरात एसी नाही का.? चिंता नको.! हा देशी जुगाड घरात करा.! घर इतके थंड होईल की थंडी वाजू लागेल.!

या सगळ्या प्रक्रियेला सर टॅन किंवा सन बर्न असे देखील म्हणतात. बहुतेक वेळा शरीरातील मेलॅनिन चे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे देखील आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच शक्यतो जेव्हा तुम्ही कधी बाहेर पडणार असाल तर अशावेळी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला योग्य ते पावले उचलणे गरजेचे आहे. हल्ली वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे.

उष्णता वाढलेली आहे. प्रत्येकाला त्वचा संदर्भातील वेगवेगळे आजार देखील उद्भवत आहे. अश्या वेळी आपल्याला आपली त्वचा नैसर्गिकरीत्या कशा पद्धतीने चांगली राहील याची काळजी देखील घ्यायला पाहिजे. जर तुम्ही घरच्या घरी देखील काही आयुर्वेदिक शास्त्राचा वापर करून काही उपाय केले तर तुमची त्वचा उन्हामध्ये गेल्यानंतर देखील काळी पडणार नाही.

आपल्याला आपल्या आहारामध्ये असे अनेक पोषक तत्त्वांचा समावेश करावा लागेल, ज्यामुळे त्वचानिरोगी राहील. त्वचा मधील मिलेनियम जास्त प्रमाणात टिकून राहील. बहुतेक वेळा सूर्याच्या थेट किरणांपासून त्वचेला वाचवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कपड्यांचा देखील उपयोग करायला हवा. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, शरीर पूर्णपणे झाकलेले राहील याची काळजी घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टींमुळे सूर्याची किरणे थेट शरीरावर पडणार नाही परिणामी तुमचे शरीर नेहमी गोरे राहील.

हे वाचा:   अशा प्रकारे झोपणारे लोक शंभर वर्षाच्या वर जगतात.! आजच तुमच्या झोपेच्या पद्धतीत बदल करा आणि अनेक रोगापासून व्हा मुक्त.!

सूर्याच्या किरणांचा थेट परिणाम केसांवर देखील होतो. केसांच्या मुळाशी असलेले मिलेनियम सूर्याच्या किरणांमुळे कमी होऊ लागते. या किरणांच्या परिणामामुळे आपले केस पांढरे होते म्हणूनच अनेकदा काही लोकांना केसांचे अकाली पांढरे पण येऊ लागते. अनेकांचे केस वयाच्या आधीच सफेद होऊ लागतात. अशा वेळी जर तुमचे केसांचे आरोग्य मजबूत ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्या केस उन्हामध्ये झाकले जातील याची काळजी देखील घ्यायची आहे.

असे केल्याने तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहणार आहे ,परिणामी तुमची त्वचा देखील चांगली राहील. आपले केस व त्वचा आपल्या सौंदर्याचा अविभाज्य घटक आहे. जर या दोन्हीचे आरोग्य चांगले असेल तर आपले व्यक्तिमत्व चारचौघांमध्ये उठून दिसते म्हणूनच आता भविष्यात जर कधी तुम्ही उन्हामध्ये बाहेर पडणार असाल तर अशा वेळी आपले केसांचे आरोग्य व त्वचेचे आरोग्य व नैसर्गिक रित्या चांगले राहील याची काळजी अवश्य घ्या.

त्याचबरोबर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात यामुळे आपली त्वचा नेहमी तजेलदार व टवटवीत चांगली राहते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *