आपले सौंदर्य चांगले बनवण्यासाठी आपले दात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जर तुमचे दात स्वच्छ पांढरे शुभ्र असतील तर तुमचे हास्य देखील सुंदर असते. बहुतेक वेळा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना दाताच्या समस्या त्रास देत असतात. दात दुखणे, दाढ ठणकणे, हिरड्या मधून र’क्त येणे ,दातांवर पिवळा थर जमा होणे यासारख्या समस्या उद्भवल्या वर जीव नकोसा होतो.
दातांच्या वेदना ह्या अत्यंत भयंकर असतात. या वेदनेपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला रूट कॅनल किंवा दात काढण्याचा सल्ला देत असतात. बहुतेक वेळा आपण केलेली हलगर्जीपणा दातांच्या विनाशासाठी कारणीभूत ठरते. आपल्यापैकी अनेक जण रात्री झोपताना दात घासत नाही, तसे पाहायला गेले तर दिवसभरातून दोन वेळा दात घासायला हवे व दिवसभरातून दोन ते तीन वेळा गुळण्या देखील करायला पाहिजे.
आपण रात्री अन्न पदार्थ खातो, ते दातांमध्ये चिटकून राहतात आणि रात्रभर तसेच राहिल्याने सूक्ष्मजीवांची वाढ सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते म्हणून सूक्ष्मजीव जमा झाल्याने आपले दात आतून पोखरले जातात व परिणामी दात व दाढा काळे पडू लागतात. दातांमध्ये बॅक्टेरिया झाल्यावर, किंवा दातांमध्ये मोठमोठे खड्डे झाले की दातांमधून घाण वास येतो, हिरड्या सुजतात ,हिरड्या मधून र’क्त येते.
या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक शास्त्रातील एक फळाचा वापर करायचा आहे. या फळाचे नाव आहे रींगणी (काटेरी) फळ. हे फळ आपल्या दातांच्या समस्या दूर करते. दातांच्या समस्या दुर करण्यासाठी हे फळ रामबाण उपाय आहे.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला रिंगणी ची फळे घ्यायची आहेत. हे फळ जर सूकलेले उपलब्ध झाले तर अती उत्तम आहे. जर तुम्हाला सूके फळ नाही मिळत असतील तर तुम्ही कच्च्या फळांना देखील तुम्ही सुकवून वापरू शकता. या फळांचा वापर तुम्ही वर्षभर देखील करू शकता. चला तर पाहू मग जाणून घेऊया फळाचा वापर कसा करायचा. सर्वप्रथम सुकलेल्या फळांमधून बारीक तोडून त्यातील बिया काढून घ्यायचे आहे त्यानंतर एक रिकामी बॉटल घ्यायची आहे.
यासाठी तुम्ही बिसलेरी/कोल्ड्रिंग ची बॉटल घेऊ शकतात. या बॉटल चा खालचा भाग कापून टाका (बॉटम) त्यानंतर आपल्याला एक कोळशाने भरलेली छोटी वाटी घायची आहे त्यामध्ये या फळांच्या बिया टाकायचे त्यावर आपण जी कापलेली बॉटल ठेवली आहे ती थोड्याच वेळ कोळशाच्या वाटी वर ठेवायची आहे. असे केल्याने बॉटल चा वरच्या भागातून धूर यायला सुरुवात होईल.
आता बॉटल मधून येणाऱ्या धुराला तुमच्या तोंडामध्ये घ्यायचे आहे पण हे करताना एक लक्षात ठेवा कि हा धूर तुमच्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्या. या धुरामुळे आपल्या तोंडामध्ये असलेले बॅक्टेरिया नष्ट होतील. जर आपल्या दातातून रक्त येत असेल, हिरड्या सुजल्या असतील तर लगेच ठीक होऊन जाईल.हा उपाय आपल्याला वापर सलग तीन दिवस करायचा आहे.
हा उपाय तुमच्या दाताच्या समस्या दूर होतील. तुम्ही या फळांच्या बिया काढूनही ठेवू शकता. जास्त त्रास असल्यास हे केल्यावर मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाचा वास निघून जातो. हा उपाय तुम्हाला आवडला असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .धन्यवाद!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.