आपण दररोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा वापर करत असतो पण आपल्यापैकी अनेक जणांना टोमॅटो चे महत्व माहीत नसते. टोमॅटो हा त्वचेकरिता अत्यंत लाभदायी आहे. टोमॅटोचा वापर चेहऱ्यासाठी केल्यास पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या एवढेच नव्हे तर चेहऱ्यावर एक चमक यायला मदत होते. चला तर मग जाणून घेऊया या टोमॅटोचा वापर आपण कसा करू शकतो त्याबद्दल.
सर्वप्रथम आपल्याला अर्धा टोमॅटो घेऊन त्याला किसून घ्यायचे आहे. त्यानंतर गाळणीचा वापर करून त्यामधून आपल्याला टोमॅटोचे पाणी म्हणजेच रस काढायचे आहे. आता या पाण्याचा म्हणजेच रसाचा उपयोग आपण दोन प्रकारे करणार आहोत. सर्वप्रथम एका वाटीमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे हा टोमॅटोचा रस घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकायचे आहे.
टोमॅटोमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. आणि दुधामध्ये कॅल्शियम त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हे अत्यंत सुंदर प्रकारे काम करते. आता दूध आणि टोमॅटोच्या रसाच्या मिश्रणाला आपल्याला टिशू किंवा कापसाच्या मदतीने त्वचेवर किंवा चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने पाच ते दहा मिनिटे लावून मसाज करायचा आहे. हे केल्यानंतर याच्या पहिल्या वापरामध्ये तुम्हाला तुमच्या चेहरा मध्ये फरक झालेला दिसून येईल.
ही क्रीम तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता. आपली त्वचा सुंदर ठेवण्यासाठी आपण अजून एक दुसरा प्रकार जाणून घेणार आहोत तो म्हणजे आपल्याला येथे एका वाटी मध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस घ्यायचा आहे. आता आपल्याला दोन चमचे दूध टाकायचे आहे. त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ टाकायचे आहे. अर्धा चमचा मध टाकायचा आहे.
या मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. हा उपाय देखील तुम्ही आठवड्यातून तीन वेळा तुमच्या चेहऱ्यावर करू शकता. ही क्रीम देखील तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.या क्रीमच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. आणि चेहऱ्यावर एक चमक येईल. तिसरा उपाय म्हणजे टोमॅटोचा रस काढून झाल्यानंतर राहिलेला टोमॅटो चा भाग आपण स्क्रब म्हणून देखील वापरू शकतो.
या टोमॅटोच्या उरलेल्या भागामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकून मिक्स करून आपण आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करून वीस मिनिटे ठेवून नंतर साबणाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हे सर्व उपाय केल्यानंतर तुम्हाला बदामाच्या तेलाने किंवा तुमच्या रोजच्या मोश्चरायझिंग क्रीमने मसाज करून रात्रभर ठेवू शकता. या उपायाने देखील तुमच्या चेहऱ्या मध्ये खूप जास्त प्रमाणात चांगला फरक झालेला दिसून येइल.
जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मोश्चरायझिंग क्रीम बनवायची असेल तर एका वाटीमध्ये एक छोटा चमचा व्यासलीन त्यामध्ये चार चमचे एलोवेरा जेल आणि चमचा बदामाचे तेल टाकून मिक्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता. अशाप्रकारे आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय आपण नेहमी केल्याने तुमच्या चेहऱ्या वरील सगळ्या समस्या दूर होऊन जातील.
चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील, चेहरा तेलकट झाला असेल या सगळ्या समस्या आवश्यक दुर होतील म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.