या घरगुती उपायांमुळे हात पाय दुखणे, गुडघ्यांचे दुखणे हे सर्व आजार क्षणात बरे होतील. भरपूर प्रमाणात शारीरिक फायदे होतील त्याचबरोबर शरीराला तरतरीतपणा येईल. आज आपण जो दुधाचा नवीन प्रकार जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे दूध वापरू शकता. गाय किंवा म्हैस च्या दुधांचे देखील वापर तुम्ही येथे करी शकता त्यानंतर आपल्याला इथे चार चमचे बडीशेप घ्यायची आहे.
बडीशेप आपल्या शरीरासाठी थंड असते. जेवण पचण्यासाठी देखील बडीशेप अत्यंत उपयोगी असते. तोंडाला येणाऱ्या वासावर देखील ही मात करते. त्याच बरोबर आपल्याला सुस्ती म्हणजेच आळस आला असेल किंवा आपल्याला थकवा आला असेल तरीदेखील आपण बडीशेपचे सेवन करू शकतो म्हणूनच आपल्याला इथे चार चमचे बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे.
या उपायांमध्ये आपल्याला बडीशेप आणि भिजवलेले पाणी देखील वापरायचे आहे. दुसरी गोष्ट या उपायासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे डिंक. डिंक आपण लाडू बनवण्यासाठी किंवा अजून खाद्य पदार्थांसाठी देखील वापरतो. गरमीच्या दिवसांमध्ये डिंकाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. डिंक आपल्याला बाजारामध्ये सहजपणे मिळुन जाईल. डिंक आपल्या हाडांसाठी अत्यंत उपयोगी असतो.
सांधे दुखी देखील डिंकाचे सेवन केल्याने दूर होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुधामध्ये किंवा पाण्यामधून डिंकाचे सेवन केले जाते. यामध्ये फायबर, कॅल्शियम मॅग्नेशियम औषधी गुणधर्म असतात. म्हणून तो आपला हाडांसाठी अधिक उपयोगी असतो. आपल्याला चार ते पाच तुकडे डिंक रात्रभर भिजवून ठेवायचे आहे. चार पाच तुकडे जरी तुम्ही पाण्यात भिजवले तरी देखील सकाळी तुम्हाला त्याच्या तिप्पट फुगलेले मिळेल.
हे भिजवलेले डिंक तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला येथे बदाम घ्यायचे आहेत. बदामाचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांनाच माहीत असते. बुद्धी चपळ करण्यासाठी, डोळ्यातील चमक परत आणण्यासाठी,सांधे दुखी पासून आराम मिळण्यासाठी बदामाचा वापर केला जातो. कधीही बदाम भिजून त्यानंतरच खाल्ले पाहिजेत. जर तुम्ही बदामाचे सेवन कसे कराल तर त्यामुळे आपल्या शरीराला गरमी देण्याचे काम बदाम करते.
बदाम कच्चे खाल्ले तर शरीरासाठी गरम व तेच बदाम आपण भिजवून खाल्ले तर ते शरीरासाठी थंड असतात. म्हणून जेव्हा आपण चार चमचे बडीशेप घेणार आहोत त्या सोबत आपल्याला दहा ते बारा बदाम घ्यायचे आहेत. बदामाचा वापर आपल्याला सोलून करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चार वेलची घ्यायच्या आहेत. आपल्याला वेलची चा वापर सालासकट करायचा आहे.
आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत ठेवलेली बडीशेप पाण्यासोबत टाकायची आहे. कारण बडीशेप भिजवून ठेवलेले पाणी देखील तेवढेच औषधी असते. त्यानंतर यामध्ये बदाम आणि वेलची टाकून थोडेसे पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे करून झाल्यावर आपल्याला या तिन्ही गोष्टींचे एक बारीक मिश्रण एक बारीक पेस्ट तयार झालेली मिळेल. याचा वापर आपण फ्रीजमध्ये ठेवून एक आठवड्यापर्यंत करू शकतो.
आता आपण एक ते दोन ग्लास जसे तुम्हाला हवे असेल त्या मापा मध्ये दुध गरम करायला ठेवायचे आहे. या दुधाला हळुवार उकळी यायला लागली की त्यामध्ये दोन चमचे बडीशेप चे तयार केलेले मिश्रण टाकायचे आहे आणि या मिश्रणाला या दुधामध्ये एक मिनिटे शिजू द्यायचे आहे. आपल्याला ही प्रक्रिया करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बडीशेप असे मिश्रण दुधामध्ये जास्त वेळ शिजवू नये त्यामुळे या मिश्रणामध्ये असलेले औषधी गुणधर्म नष्ट होतील.
शिजून एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून दूध थंड होऊ द्यायचे आहे. दूध थंड झाल्यावर त्यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेला डिंक एक ते दोन चमचे या दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता हे दूध पिण्यासाठी तयार झालेले आहे. गरमीच्या दिवसांमध्ये हे दूध आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरते. आणि या दुधामुळे आपली हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.
यामध्ये वापरल्या गेलेल्या सर्व गोष्टी घरगुती असल्यामुळे आपल्या शरीराला यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.