कितीही घाण भांडे असू द्या.! दहा मिनिटात चमकू लागेल भांडे.! ही ट्रिक फार कमी लोकांना माहिती आहे.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांच्या घरी स्टील, पितळ, ॲल्युमिनियम च्या वस्तू असतात. या वस्तूंना साफ करण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते. आपल्या घरातील मंडळी स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या स्टील,पितळ, अल्युमिनियम च्या भांड्यांना साफ करताना खूपच कंटाळून ,वैतागून जातात. अनेकदा घरातील महिलांची चिडचिड देखील होते. बहुतेक वेळा घरातील भांडे जास्त दिवस न वापरल्यामुळे या भांड्यांवर काळे डाग निर्माण होतात.

तसेच अनेकदा जास्त वापर झाल्यामुळे देखील त्या भांड्यांची चमक निघून जाते, अशा वेळी जर तुमच्या घरातील जुने भांडे व वापरात नसलेले भांडे आपल्याला चमकवायचे असेल तर आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील भांडे अगदी दुकाना प्रमाणे नवीन दिसणार आहे, त्याचबरोबर घरातील भांडी धुण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही.

या उपायामुळे मेहनत कमी स्वरूपाची असल्याने तुम्हाला दुसरा कामांमध्ये जास्त वेळ देता येईल. पाण्याची बादली किंवा पाण्याचा हंडा अनेकदा आतून ,बाहेरून खराब होऊन जातो की बहुतेक वेळा पाणी आपण साठवून ठेवल्याने भांड्याच्या तळाशी गाळ साचलेला असतो किंवा पाण्याचे डाग निर्माण होतात अशा वेळी आपण एक सोपी ट्रिक वापरून आपले भांडे अगदी स्वच्छ करणार आहोत.

हे वाचा:   तुमच्या किचन मध्ये लपले आहे वजन कमी करण्याचे राज, हे काही पदार्थ तुमचे वजन झटपट कमी करेल.!

असा आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लास्टिकची वाटी घ्यायची आहे. या वाटी मध्ये एक चमचा मीठ टाकायचे आहे. आता आपल्याला एक चमचा लिंबू चे सत्व घ्यायचे आहे म्हणजेच लिंबूचा रस घ्यायचा आहे.लिंबू आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो. लिंबू मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर लिंबू अँटी ब्लिचिंग चे देखील काम करतो म्हणजेच या मध्ये असणारे ऑक्सीडेंट पदार्थ भांड्यांवर त्वरित रसायन प्रक्रिया करतात.

आपले भांडे स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आता आपल्याला एक ते दोन चिमूटभर खायचा सोडा वापरायचा आहे आणि त्यानंतर एक ते दोन चमचा व्हिनेगर वापरायचा आहे. हा पदार्थ आपण अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये करत असतो आणि म्हणूनच व्हिनेगर चा वापर करून देखील आपल्याला भांडे चमकण्यासाठी सहजरीत्या करता येऊ शकतो. आता आपल्यालाही तयार झालेली पेस्ट स्क्रब, काथा च्या साह्याने बादली वर लावायची आहे.

सुरुवातीला बादली आपल्याला त्या मिश्राने पूर्णपणे बाहेर आणि आतून व्यवस्थित ओली करून घ्यायची आहे. हे मिश्रण बदलीवर आत मध्ये लावल्यानंतर पाच ते दहा मिनिटे आपल्या तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर पुढील प्रोसेस करायची आहे, आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे वॉशिंग पावडर. आपण कोणताही ब्रँडची वॉशिंग पावडर वापरू शकतो यावर वॉशिंग पावडर ने आपल्याला बादली घासायची आहे.

हे वाचा:   ओल्या नारळाचा तुकडा अशाप्रकारे खा; वातावरण बदलामुळे आलेला खोकला सर्दी ताप अंगदुखी झटकन बरा होईल.!

त्यानंतर तुम्हाला दिसून येईल की जे काही डाग होते ते वर आलेले असतील आणि आपली बादली अगदी नैसर्गिक रित्या तुम्हाला स्वच्छ झालेली पाहायला मिळेल. बादली चा रंगदेखील बदललेला असेल. बादली आपल्याला आतून व बाहेरून व्यवस्थितरीत्या घासून घ्यायची आहे यामुळे बादलीवर असलेले डाग दूर होऊन जातील आणि तुमची बदली अगदी चमकू लागेल.

बाजारामध्ये नवीन बातमी देताना ज्या पद्धतीने रंग आलेला असतो त्याच पद्धतीची रंग तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे हा उपाय तुम्ही सहज रित्या पाच ते दहा मिनिटांमध्ये करू शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *